Friday, August 12, 2022
Home भारत भीषण भूस्खलनात 24 जणांचा मृत्यू तर 38 जण अजूनही बेपत्ता, Live Video

भीषण भूस्खलनात 24 जणांचा मृत्यू तर 38 जण अजूनही बेपत्ता, Live Video


मणिपूर 02 जुलै : मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात रेल्वेच्या बांधकामाच्या ठिकाणी भूस्खलनामुळे मोठी दुर्घटना घडली आहे (Manipur Landslide). यात मृतांची संख्या शनिवारी 24 वर पोहोचली आहे. यामध्ये टेरिटोरियल आर्मीच्या 18 जवानांचा समावेश आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने गुवाहाटीतील लष्कराच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने सांगितलं की, अद्याप 38 लोक बेपत्ता आहेत. मदत आणि बचाव कार्याला गती देण्यासाठी आणखी काही पथकं तैनात करण्यात आली आहेत.
लष्कर, आसाम रायफल्स, टेरिटोरियल आर्मी, एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे जवान ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, मणिपूरमध्ये घटनास्थळाजवळ आणखी एक भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली आहे.

पोलीस होण्याचं स्वप्न अर्धवट राहिले, सरावादरम्यान दोघांना अज्ञात वाहनाने चिरडले
पीटीआयच्या वृत्तानुसार लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितलं की, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी वॉल रडारचा वापर केला जात आहे. याशिवाय स्निफर डॉगचे पथकही तैनात करण्यात आलं आहे. आतापर्यंत 13 टेरिटोरियल आर्मीचे जवान आणि 5 नागरिकांना बाहेर काढण्यात आलं आहे. आतापर्यंत 18 टेरिटोरियल आर्मीचे जवान आणि 6 नागरिकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ते म्हणाले की, प्रादेशिक लष्कराचे 12 सैनिक आणि 26 नागरिक अजूनही बेपत्ता आहेत, त्यांचा शोध सुरू आहे.

प्रवक्त्याने सांगितलं की, या अपघातात प्राण गमावलेल्या लष्कराच्या जवानांमध्ये एक कनिष्ठ आयोग अधिकारी (जेसीओ) देखील आहे. हवाई दलाची दोन विमानं आणि लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे जेसीओसह १४ जवानांचे मृतदेह त्यांच्या घरी पाठवण्यात आले आहेत. मृतदेह पाठवण्यापूर्वी त्यांना इंफाळमध्ये पूर्ण सन्मानाने लष्करी निरोप देण्यात आला.

दिल्लीहून उड्डाण घेताच SpiceJet विमानाच्या केबिनमध्ये आग, पाहा VIDEO
मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनीही शुक्रवारी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याची माहिती घेतली. मणिपूरच्या इतिहासातील हा सर्वात भीषण अपघात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मणिपूरच्या नोनी जिल्ह्यातील तुपुल रेल्वे स्टेशनजवळील भारतीय लष्कराच्या १०७ टेरिटोरियल आर्मी कॅम्पजवळ बुधवार-गुरुवारी रात्री हे भूस्खलन झालं. इथे जिरीबाम ते इंफाळ दरम्यान रेल्वे मार्ग तयार केला जात आहे. हे सैनिक त्याच्या संरक्षणासाठी तैनात होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#भषण #भसखलनत #जणच #मतय #तर #जण #अजनह #बपतत #Live #Video

RELATED ARTICLES

आत्मचिंतन केलं असतं, तर आत्मक्लेष करायची वेळ आली नसती, उदयनराजेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला!

Udayanraje Bhosale : प्रत्येकालाच सत्ता हवी असते, पण आत्मचिंतन केलं असत, तर आत्मक्लेष करायची वेळ आली नसती, असा...

आशिया खंडातील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर झळकलं दगडी चाळ 2 चं पोस्टर

मुंबई, 12 ऑगस्ट-   मराठी चित्रपटांची सध्या चांगलीच हवा दिसून येत आहे. नुकतंच 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चित्रपटाचं पोस्टर चक्क विमानावर झळकलं...

पालिकेच्या वॉर्ड पुनर्रचनेत बदल, शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार 

Shivsena : शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर मुंबई महानगर पालिकेच्या (mumbai municipal corporation) वॉर्ड पुनर्रचनेत बदल करण्यात...

Most Popular

आत्मचिंतन केलं असतं, तर आत्मक्लेष करायची वेळ आली नसती, उदयनराजेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला!

Udayanraje Bhosale : प्रत्येकालाच सत्ता हवी असते, पण आत्मचिंतन केलं असत, तर आत्मक्लेष करायची वेळ आली नसती, असा...

जम्मू-काश्मीरमधील हत्येचं सत्र थांबेना; आणखी एका युवकाची गोळी झाडून हत्या

श्रीनगर 12 ऑगस्ट : जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी शुक्रवारी आणखी एका प्रवाशाची गोळ्या झाडून हत्या केली. मोहम्मद अमरेज असं 19 वर्षीय मृताचं नाव...

लाल सिंह चड्ढा

आमिर खानच्या नावावर असलेले अनेक चित्रपट हे मुळात इतर भाषांतील चित्रपटांचा रिमेक आहेत किंवा त्या एखाद्या सिनेमाच्या कथानकावरून प्रेरित असलेले आहेत. चोखंदळ असलेला...

ऋषी सुनक घेत आहेत केजरीवाल पॅटर्नचा आधार? ब्रिटनमध्ये वीजबिलावरील व्हॅट कमी करण्याचं आश्वासन

British PM Race : ब्रिटन (UK) पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेले भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak) यांनी एक...

केळ्याची साल खाल्याने होईल कॅन्सरपासून बचाव; अमेरिकी Nutritionist चा दावा

6 Banana Amazing Benefits : केळी खाल्ल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. हे ऊर्जा वाढवणारे फळ आहे. केळं अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये देखील वापरले जाते....

अल्टिमेट खो-खो लीग : खो-खोपटू विजय हजारेची संघर्षगाथा..

संदीप कदम मुंबई : पानपट्टीचा व्यवसाय करणाऱ्या इचलकरंजीच्या सामान्य कुटुंबातील विजय हजारे पहिल्या अल्टिमेट खो-खो लीगमध्ये मुंबई खिलाडीज संघाचे नेतृत्व करणार आहे. प्रतिकूल परिस्थितीत...