Friday, August 12, 2022
Home क्रीडा भारत-श्रीलंका एकदिवसीय मालिका : भारतीय महिला संघाची श्रीलंकेवर सरशी

भारत-श्रीलंका एकदिवसीय मालिका : भारतीय महिला संघाची श्रीलंकेवर सरशी



पालेकेले : दीप्ती शर्माची (२५ धावांत ३ बळी आणि नाबाद २२ धावा) अष्टपैलू कामगिरी व कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (६३ चेंडूंत ४४ धावा) संयमी खेळीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने शुक्रवारी पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेवर चार गडी व १२ षटके राखून विजय मिळवला.

श्रीलंकेने दिलेल्या १७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर स्मृती मानधनाने (४ धावा) पुन्हा एकदा निराशा केली.  सलामीवीर शफाली वर्माने (४० चेंडूंत ३५ धावा) काही आक्रमक फटके मारले, मात्र रणवीराने तिला बाद करत भारताची अवस्था ३ बाद ६१ अशी केली. यानंतर कर्णधार हरमनप्रीतने हरलीन देओलच्या (४० चेंडूंत ३४ धावा) साथीने भारताचा डाव सावरला. मग दीप्ती व पूजा वस्त्रकार (नाबाद २१) यांनी भारताला सामना जिंकवून दिला.

त्यापूर्वी, पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या श्रीलंकेकडून हासिनी परेरा (३७ धावा), नीलाक्षी डीसिल्वा (४३ धावा) आणि हर्षिता मडवी (२८ धावा) वगळता इतर कोणालाही मैदानावर टिकता आले नाही.



अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#भरतशरलक #एकदवसय #मलक #भरतय #महल #सघच #शरलकवर #सरश

RELATED ARTICLES

Raosaheb Danve : मी रेल्वे मंत्री मात्र, माझ्या गावात अजून रेल्वे नाही : मंत्री रावसाहेब दानवे

Raosaheb Danve : 10 वर्ष आमदार (MLA) त्यानंतर 25 वर्ष खासदार म्हणून काम केले. मात्र अद्यापही माझ्या गावात...

सायकल खरेदी करताय! ‘या’ ऑनलाईन साईटवर मिळतेय स्वस्तात, जाणून घ्या

मुंबई : व्यायामासाठी अनेकांना जीमपेक्षा सायकलिंग करावी असे नेहमीच वाटतं असते. मात्र लॉकडाऊन नंतर सायकलचा खप आणि किंमती वाढल्याने अनेकांना बजेटमध्ये सायकल घेणे...

Most Popular

‘रुपी’वरील हातोडा टाळता आला असता?

१९१२ मध्ये स्थापन झालेल्या सहकार क्षेत्रातील या जुन्या बँकेला सहकार क्षेत्रातील अनेक प्रकारच्या गैरव्यवहारांची बळी ठरल्याने ही घरघर लागली आहे. सचिन रोहेकर मराठी माणसांनी सुरू...

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी राहुलकडे नेतृत्व; ‘बीसीसीआय’च्या वैद्यकीय पथकाने तंदुरुस्त जाहीर केल्याने भारतीय संघात निवड

पीटीआय, नवी दिल्ली : अनुभवी फलंदाज केएल राहुलला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वैद्यकीय पथकाने गुरुवारी तंदुरुस्त जाहीर केल्यानंतर आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी त्याची...

पुणे, कोल्हापूरसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट

Maharashtra Rain : सध्या राज्यात जोरदार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत....

प्रफुल्ल पटेल तुमच्यामुळे हे सर्व घडतंय; ‘फिफा’ची भारताला धमकी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

नवी दिल्ली-सध्या भारतीय फुटबॉलमध्ये तणावाचे वातावरण आहे. मैदानात फुटबॉल संघ जागतिक स्तरावर खूप मागे आहे, पण देशाचा फुटबॉल चालवणाऱ्या संस्थांमध्येही गोंधळ सुरू आहे....

विस्ताराला 40 दिवस, आता खातेवाटपही रखडलं! महत्वाची दोन कारणं, ज्यामुळं खातेवाटपाची प्रतीक्षा

Maharashtra Cabinet News : शिंदे-फडणवीस सरकारचा 40 दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार (cabinet expansion) झाला मात्र आता खातेवाटप रखडलं आहे....

पालक आणि मुलांच्या नात्यात ‘या’ 5 गोष्टीमुळे पसरते विष

Clues a Relationship With a Parent Is Toxic : प्रत्येक पालकांना आपल्या मुलांसोबत एक खास नातं हवं असतं. त्यासाठी ते प्रयत्नशील देखील असतात....