Sunday, January 16, 2022
Home क्रीडा भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेची सिरीज होणार की नाही; BCCIने दिली मोठी अपडेट

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेची सिरीज होणार की नाही; BCCIने दिली मोठी अपडेट


मुंबई : भारत पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात संघाला तीन सामन्यांची कसोटी, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची आहे. दरम्यान दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट आल्यापासून, दौरा सुरू होण्यापूर्वीच तो रद्द होण्याची शंका व्यक्त करण्यात येतेय.

जगभरातील सर्व देश दक्षिण आफ्रिकेच्या प्रवासावर बंदी घालण्याचा विचार करत आहेत. भारत अ संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. टीम इंडियाला डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. दरम्यान, या दौऱ्याबाबत बीसीसीआयने अपडेट दिलं आहे.

InsideSportsच्या अहवालानुसार, देशात कोरोनाचे नवीन व्हेरिएंट आल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने हाय अलर्ट लागू केला आहे. अशा परिस्थितीत बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची कोरोना तपासणी केली जात आहे. 

दरम्यान यामध्ये टीम इंडियाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नसल्याचं बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं आहे. “आताच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही. हा दौरा नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि CSAच्या संपर्कात आहोत. अशा कठीण काळात, आपण फक्त आशा करू शकतो की गोष्टी नियंत्रणात असतील.”

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना 17 डिसेंबरपासून जोहान्सबर्गमध्ये खेळवला जाणार आहे. या आठवड्यात दक्षिण आफ्रिकेत कोरोना विषाणूच्या एक व्हेरिएंट दिसला आहे.

नवा व्हेरिएंट जास्त धोकादायक

नवीन ‘B.1.1.529’ व्हेरिएंट दक्षिण आफ्रिका आणि बोत्सवानामध्ये सापडला आहे. सतत म्यूटेशन होत असलेल्या या व्हेरिएंटमुळे WHO सोबतच शास्त्रज्ज्ञही धास्तावले आहेत. हा नवीन व्हेरिएंट डेल्टा पेक्षा जास्त धोकादायक आहे आणि त्यापेक्षा जास्त संसर्गजन्य आहे.

भारताचं दक्षिण आफ्रिका दौऱ्याचं वेळापत्रक

  • 17 डिसेंबर पहिला कसोटी सामना –  जोहान्सबर्ग
  • 26 डिसेंबर दुसरा कसोटी सामना – सेंच्युरियन
  • 3 जानेवारी तिसरा कसोटी सामना – केप टाऊन
  • 11 जानेवारी पहिला एकदिवसीय सामना – पार्ल
  • 14 जानेवारी दुसरा एकदिवसीय सामना – केप टाऊन
  • 16 जानेवारी तिसरा एकदिवसीय सामना – केप टाऊन
  • 19 जानेवारी, 21 जानेवारी, 23 जानेवारी, 26 जानेवारी – टी 20 सामने

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#भरत #वरदध #दकषण #आफरकच #सरज #हणर #क #नह #BCCIन #दल #मठ #अपडट

RELATED ARTICLES

विकीच्या अनुपस्थितीत कतरिनाकडून बेडरूम सेल्फी शेअर, दिसली फक्त शर्टमध्ये

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा विवाह नुकताच पार पडला. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

Carrot Benefits | हिवाळ्यात गाजर खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

 गाजर खाण्याचे (Carrot Benefits) अनेक फायदे आहेत.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...

सक्तीच्या लसीकरणाचा निषेध असो! ‘या ‘देशातील जनता उतरलीय रस्त्यावर; वाचा सविस्तर

देशात सर्वांसाठी लसीकरण सक्तीचं असेल, असा कायदा सरकारने केला आणि त्याला विरोध करण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...

Most Popular

घर भाड्याने दिलं आहे? मग जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी, आहेत अतिशय कळीच्या

मुंबई,  15 जानेवारी :  कमाई वाढवण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यातला एक म्हणजे आपल्या घराचा एक भाग किंवा आपली एखादी जागा भाड्यानं देणे. जेणेकरून आपण...

ब्रिटनमध्ये फेब्रुवारीपासून लसीकरण झालेल्या प्रवाशांसाठी चाचणी आवश्यक नाही

Britain Covid19 Update : जगात कोरोना आणि ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय विमान...

रविवार विशेष : पराभवानंतरचा पंचनामा!

ऋषिकेश बामणे दक्षिण आफ्रिकेतील सर्वात लहान उंचीच्या तेम्बा बव्हुमाने विजयी चौकार लगावला आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघावर मोठी नामुष्की ओढवली. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड...

राज्यात शाळा पुन्हा कधी सुरु होणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य

Maharashtra School : राज्यात वाढत्या कोरोनामुळं पुन्हा शाळा बंद करण्याचा निर्णय सरकारनं घेतला. शाळा बंद करण्याच्या निर्णयाला अनेकांनी...

‘स्टार प्रवाह’ला मोठा झटका, गुळुंब ग्रामपंचायतीने चित्रिकरणाला परवानगी नाकारली

सातारा, 15 जानेवारी : सोशल मीडियावर राजकीय भूमिका मांडली म्हणून 'मुलगी झाली हो' (Mulgi Zali Ho) या मालिकेतील अभिनेते किरण माने (Kiran Mane)...

सक्तीच्या लसीकरणाचा निषेध असो! ‘या ‘देशातील जनता उतरलीय रस्त्यावर; वाचा सविस्तर

देशात सर्वांसाठी लसीकरण सक्तीचं असेल, असा कायदा सरकारने केला आणि त्याला विरोध करण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...