Friday, August 12, 2022
Home क्रीडा भारतीय हॉकी संघ सुवर्णपदकापासून दोन पावलं दूर, अर्जेंटीनाबरोबर कसा आहे रेकॉर्ड पाहा...

भारतीय हॉकी संघ सुवर्णपदकापासून दोन पावलं दूर, अर्जेंटीनाबरोबर कसा आहे रेकॉर्ड पाहा…


नवी दिल्ली : भारतीय महिलांचा हॉकी संघ आता सुवर्णपदकापासून फक्त दोन पावलं दूर आहे. आज भारताची उपांत्य फेरीची लढत होणार आहे. ही लढत जिंकल्यावर भारतीय संघासाठी सुवर्णपदकाचे दार खुले होणार आहे. पण भारतीय संघाची अर्जेंटीनाबरोबर कशी कामगिरी राहीली आहे, त्यावर एक नजर…

भारताने तीनवेळा सुवर्णपददक पटकावलेल्या ऑस्ट्रेलियाला पराभूत करत इतिहास रचला आणि उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. पण ऑलिम्पिकच्या सुरुवातीला भारताची सुरुवात निराशाजनक झाली होती. भारताला सुरुवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला होता. पहिल्याच सामन्यात भारताला नेदरलँड्सने १-५ असे पराभूत केले होते. त्यानंतर जर्मनीने भारतावर २-० असा विजय मिळवला होता. तिसऱ्या सामन्यातही भारताला ग्रेट ब्रिटनडून १-४ असा पराभव पत्करावा लागला होता. सलग तीन सामन्यांमध्ये झालेल्या पराभवानंतर भारताने झोकात पुनरागमन केले होते. चौथ्या सामन्यात भारताने आयर्लंडवर १-० असा विजय मिळवला होता. हा भारताचा पहिला विजय होता. त्यानंतर पाचव्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला ४-३ असे पराभूत केले होते, पण त्यानंतर ग्रेट ब्रिटनने आयर्लंडला पराभूत केल्यामुळे भारताला उपांत्यपूर्व फेरीत मजल मारता आली होती.
अर्जेंटीनाच्या महिला हॉकी संघाने आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये एकही सुवर्णपदक जिंकलेले नाही. पण २०१२ आणि २००० साली झालेल्या ऑलिम्पिकमध्ये अर्जेंटीनाने रौप्यपदकाची कमाई केली होती. पण या ऑलम्पिकमध्ये अर्जेंटीनाने चार सामने जिंकले आहेत तर त्यांना दोन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. दुसरीकडे भारताने या ऑलिम्पिकमध्ये सलग तीन सामने जिंकले आहेत, तर त्यांना पहिल्या तिन्ही सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. भारतीय संघ जेव्हा अर्जेंटीनाच्या दौऱ्यावर गेला होता तेव्हा त्यांना एका सामन्यात विजय मिळता आला होता, तर तीन सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. पण ऑलिम्पिकची गोष्टच वेगळी आहे. कारण भारतीय संघ ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला पराभूत करत उपांत्य फेरीत पोहोचला आहे, त्यामुळे त्यांचे मनोबल कमालीचे उंचावलेले असेल.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#भरतय #हक #सघ #सवरणपदकपसन #दन #पवल #दर #अरजटनबरबर #कस #आह #रकरड #पह

RELATED ARTICLES

मोठी ऑफर : 15 ऑगस्टदिनी या कंपनीचा कमी किमतीत सुपरफास्ट इंटरनेट प्लान

BSNL Broadband Plan Best Offer: आजच्या काळात, इंटरनेटशिवाय एक दिवसही घालवणे अशक्य आहे. तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. ज्यामध्ये तुम्ही 99 रुपयांमध्ये 3000GB...

Raosaheb Danve : मी रेल्वे मंत्री मात्र, माझ्या गावात अजून रेल्वे नाही : मंत्री रावसाहेब दानवे

Raosaheb Danve : 10 वर्ष आमदार (MLA) त्यानंतर 25 वर्ष खासदार म्हणून काम केले. मात्र अद्यापही माझ्या गावात...

सायकल खरेदी करताय! ‘या’ ऑनलाईन साईटवर मिळतेय स्वस्तात, जाणून घ्या

मुंबई : व्यायामासाठी अनेकांना जीमपेक्षा सायकलिंग करावी असे नेहमीच वाटतं असते. मात्र लॉकडाऊन नंतर सायकलचा खप आणि किंमती वाढल्याने अनेकांना बजेटमध्ये सायकल घेणे...

Most Popular

ब्रिटनमध्ये उष्णतेची लाट, जलस्रोतांवर मोठा परिणाम, थेम्स नदीचे पात्रही कोरडे

Thames River : जागतिक तापमानवाढीचा (Global Warming) फटका जगातील अनेक देशांना बसत आहे. अनेक देशांमध्ये उष्णतेची लाट (Heat...

मायेची तिजोरी; लेकाचं यश जेव्हा आई फाटक्या साडीमध्ये गुंडाळून ठेवते….

आईने अंचितच्या आतापर्यंतच्या सर्व ट्रॉफी आणि मेडल्स फाटलेल्या साडीत बांधून ठेवल्या आहेत.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

आम्हाला हलक्यात घेऊ नका; झिम्बाब्वेने दौऱ्याआधीच भारताला दिला धोक्याचा इशारा

हरारे: भारतीय क्रिकेट संघ लवकर झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही संघात ३ सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झिम्बाब्वे संघाचा फार दबदबा...

सांगलीत पुराचा धोका! कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ; पूरपट्ट्यातील नागरिकांना स्थलांतराच्या सूचना

Sangli Flood:संततधार पावसामुळेकृष्णा नदीच्या (Sangli Krushna River) पाणीपातळीत वाढ झाली आहे. सोबतच आज कोयनेतून विसर्ग (Koyna Dam)वाढवण्यात येणार...

जगातील पहिला असा Smartphone,बॉडीला चिकटणारे Earbuds; पाण्यात होणार नाही खराब, किंमत जाणून घ्या

मुंबई : Smartphone News : Ulefone ने किकस्टार्टर वर बिल्ट-इन TWS इअरबड्ससह जगातील पहिला तगडा स्मार्टफोन Ulefone Armor 15 लॉन्च केला आहे. Armor 15 के साथ...

सर्वसामान्य दाम्पत्याची ‘असामान्य’ कहाणी; दत्तक मुलीचा आज सर्वानाच अभिमान

गांधीनगर, 12 ऑगस्ट : अनेकजण विरोध झुगारुन असे काही निर्णय घेतात की कालांतराने ते समाजासाठी एक आदर्श उदाहरण बनतात. ही माणसं समाजात आपली...