Monday, July 4, 2022
Home क्रीडा भारतीय संघाच्या विजयासाठी ज्योतिषाची नियुक्ती; दिले इतके लाख रुपये

भारतीय संघाच्या विजयासाठी ज्योतिषाची नियुक्ती; दिले इतके लाख रुपये


नवी दिल्ली: भारतीय फुटबॉल महासंघाने (All India Football Federation) पुढील तीन महिन्यांसाठी नवी दिल्लीतील ज्योतिष सल्लागाराची निवड केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. भारतीय फुटबॉल संघाला ग्रह ताऱ्यांची अनुकूल साथ लाभावी, असाच बहुदा भारतीय फुटबॉल महासंघाचा विचार दिसत असल्याची टीका यामुळे सुरू झाली आहे.

भारतीय फुटबॉल महासंघावर नुकतीच प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली. प्रशासकांना तीन महिन्यांसाठी ज्योतिष सल्लागार कंपनीची नियुक्ती केल्याचे आढळले. याबाबत विचारणा केल्यावर संघाला सांख्यिकी साह्य उपलब्ध करण्यासाठी ही नियुक्ती झाली, असा दावा करण्यात आला. मात्र, हे काम पाहण्यासाठी यापूर्वीच एका कंपनीकडे ही जबाबदारी आहे, याकडे लक्ष वेधल्यावर आशियाई पात्रता स्पर्धा असल्याने हा निर्णय झाला असल्याचा दावा करण्यात आला. भारताने आशियाई पात्रता स्पर्धेत विजेतेपद जिंकले. आता यासाठी ग्रह ताऱ्यांची किती मदत लाभली, हे सांगणे अवघड आहे; पण या कंपनीला तीन महिन्यांसाठी १६ लाख रुपये देण्यात आले. प्रफुल पटेल अध्यक्ष आणि कुशल दास सचिव असताना हा निर्णय झाला होता. महासंघावरील प्रशासकांनी याबाबत विचारणा सुरू केल्यावर कुशल दास यांनी वैद्यकीय कारण सांगून रजा घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.

वाचा- असे काय झाले की, टीम इंडियाचे ४ जण भारताविरुद्ध खेळणार; जाणून घ्या

दरम्यान, भारतीय संघाला मार्गदर्शन करण्यासाठी ज्योतिषीही नियुक्त होते. त्यांनी संघासोबत तीन सत्रे घेतल्याचे सांगितले जाते. संघातील खेळाडूंना प्रेरित करण्यासाठी त्यांची नियुक्ती केल्याचेही सांगण्यात आले होते. मात्र, कोलकात्यामधील एका खेळाडूने सांगितले, की ज्योतिषांसोबत असे काही सत्र झाल्याचे माझ्या तरी कानावर आलेले नाही. खरे तर मी सराव शिबिरात उशिरा दाखल झालो होतो.

वाचा- “खेळता येत नसेल तर…”; विराटच्या फॉर्मवर दिग्गज कर्णधाराचे ठाम मत

काळ्या जादूमुळे यश?

भारतीय फुटबॉलमध्ये काळी जादू नवीन नाही. दिल्लीतील एका क्लबने यश मिळवण्यासाठी मीरतमधील ‘बाबा’ची मदत घेतली असल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर मोहीम यशस्वी झाल्यावर त्या ‘बाबा’मुळे यश मिळाल्याचेही सांगितले होते.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#भरतय #सघचय #वजयसठ #जयतषच #नयकत #दल #इतक #लख #रपय

RELATED ARTICLES

Maharashtra Floor Test Result : एकनाथ शिंदे पास; दुसरी लढाईही जिंकली, बहुमत चाचणी जिंकली

Maharashtra Politics : आज एकनाथ शिंदे सरकारनं आपली दुसरी परीक्षाही पास केली आहे. विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीच्या लढाईत...

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...

Most Popular

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

Workout Tips: फक्त २ मिनिटांच्या ‘या’ व्यायामाने स्वतःला ठेवा तंदुरुस्त

मुंबई, 4 जुलै: शरीराला तंदुरुस्त (Fit) ठेवण्यासाठी आणि चरबी कमी (Fat Lose) करण्यासाठी व्यायाम (Exercise) ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, हे आपणा सर्वांना...

Maharashtra Floor Test Result : एकनाथ शिंदे पास; दुसरी लढाईही जिंकली, बहुमत चाचणी जिंकली

Maharashtra Politics : आज एकनाथ शिंदे सरकारनं आपली दुसरी परीक्षाही पास केली आहे. विधानसभेत झालेल्या बहुमत चाचणीच्या लढाईत...

‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित ब्रिटिश दिग्दर्शकाचे निधन, जागतिक स्तरावर सादर केले होते महाभारत

लंडन: प्रसिद्ध चित्रपट आणि नाट्य दिग्दर्शक पीटर स्टीफन पॉल ब्रुक (Peter Brook Passes Away) यांचे लंडनमध्ये निधन झाले. ते ९७ वर्षांचे होते. २...

Martin Cooper: जगातील पहिला मोबाइल फोन बनवणारी व्यक्ती फक्त ‘एवढ्या’ वेळ वापरते डिव्हाइस, दिला लाखमोलाचा सल्ला

नवी दिल्ली:Martin Cooper Inventor of Mobile Phone: आज जवळपास सर्वांच्याच हातात स्मार्टफोन पाहायला मिळतो. एकही घर असे नसेल जेथे स्मार्टफोनचा वापर केला जात...

देहविक्री करून सैन्याला आर्थिक मदत करताहेत या महिला; काय आहे नक्की प्रकरण? वाचा

खार्किव : Ukraine Women:अनेक वेळा महिलांना बळजबरीने देहविक्री करावी लागते. आपल्या सन्मानाला सौदा करणे इतके सोपे नाही. अनेक महिलांना या परिस्थितीला मजबूरीने सामोरे...