Friday, August 12, 2022
Home क्रीडा भारतीय महिला हॉकी संघातील सलिमा टेटेचं दुर्दैव, उपांत्य सामना संपूर्ण जग पाहणार...

भारतीय महिला हॉकी संघातील सलिमा टेटेचं दुर्दैव, उपांत्य सामना संपूर्ण जग पाहणार पण कुटुंबिय नाहीत…


नवी दिल्ली : भारताच्या महिला हॉकी संघाने इतिहास रचत उपांत्य फेरी गाठली. त्यामुळे उद्या अर्जेंटीनाबरोबर होणाऱ्या भारताच्या या सामन्यावर संपूर्ण जगाचे लक्ष असेल. पण भारतीय संघातील सलिमा टेटेच्या कुटुंबियांना मात्र हा सामना लाइव्ह पाहता येणार नाही. कारण सलिमा राहत असलेल्या गावात टीव्ही नाही. त्याचबरोबर गावात मोबाईची रेंज नाही तर इंटरनेट येणार तरी कुठून, त्यामुळे सलिमाला जेव्हा संपूर्ण जग पाहत असेल तेव्हा तिच्या घरच्यांना मात्र तिला लाइव्ह खेळताना पाहता येणार नाही. भारताच्या ग्रामीण भागातील लोकं अजूनही कशा अवस्थेत राहतात, याचे हे एक भीषण वास्तव आता सर्वांसमोर आलेले आहे.

सलिमा ही झारखंडमधील बडकिचपार या गावात राहते. हे गाव ४५ कुटुंबांचं आहे. पण गावाची अवस्था फारच बिकट आहे. पण तरीही सलिमाची बहिण महिमाने एक खास संदेश आपल्या बहिणीसाठी दिला आहे. महिमादेखील एक राष्ट्रीय हॉकीपटू आहे. महिला यावेळी म्हणाली की, ” आम्हाला सलिमाचा अभिमान वाटतो. आमच्यासाठी ही फार आनंदाची बातमी आहे. ज्या भारतीय संघाने इतिहास रचला त्या संघाचे ती प्रतिनिधीत्व करत आहे. आम्हाला अशी आशा आहे की, भारतीय संघ ही उपांत्य फेरीदेखील जिंकेल.”

गावातील दुरावस्थेबाबत महिमा म्हणाली की, ” गावामध्ये कोणकडेही साधा टीव्ही नाही, मोबाईची रेंज नाही. काहीवेळेला रेंज आली तर स्पष्ट ऐकूही येत नाही. आम्हाला सर्वांना भारतीय महिला हॉकी संघाचा उपांत्य फेरीचा सामना पाहायचा होता. पण ते शक्य होईल, असे आम्हाला वाटत नाही. पण आम्हा सर्वांच्या शुभेच्छा मात्र नक्कीच भारतीय संघाबरोबर असतील.” एवढी दुरावस्था असूनही सलिमा खचली मात्र नक्कीच नाही. आपल्या आवडीच्या हॉकीचा खेळ तिने मनापासून जोपासला आणि आता थेट ती भारतीय संघाकडून खेळताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता ऑलिम्पिकनंतर घरी आल्यावर तरी तिच्या घरी टीव्ही आणि गावात मोबाईची रेंज येणार का, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#भरतय #महल #हक #सघतल #सलम #टटच #दरदव #उपतय #समन #सपरण #जग #पहणर #पण #कटबय #नहत

RELATED ARTICLES

आशिया खंडातील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर झळकलं दगडी चाळ 2 चं पोस्टर

मुंबई, 12 ऑगस्ट-   मराठी चित्रपटांची सध्या चांगलीच हवा दिसून येत आहे. नुकतंच 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चित्रपटाचं पोस्टर चक्क विमानावर झळकलं...

सर्वसामान्य दाम्पत्याची ‘असामान्य’ कहाणी; दत्तक मुलीचा आज सर्वानाच अभिमान

गांधीनगर, 12 ऑगस्ट : अनेकजण विरोध झुगारुन असे काही निर्णय घेतात की कालांतराने ते समाजासाठी एक आदर्श उदाहरण बनतात. ही माणसं समाजात आपली...

कोयना धरणाचे 6 वक्री दरवाजे दीड फुटांनी उचलले, 10 हजार 100 क्युसेकने नदीत पाण्याचा विसर्ग 

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी 2 हजार 147 फुटांवर गेली असून एकूण पाणीसाठा 85.31 टीएमसी झाला आहे....

Most Popular

‘छोटू भैय्या तू बॅट बॉल खेळ’; पंत आणि उर्वशीमध्ये जोरदार जुंपली

Urvashi Rautela Reply On Rishabh Pant- प्रसिद्ध क्रिकेटपटू ऋषभ पंत याने इन्स्टाग्राम स्टोरीवर उर्वशीचं नाव न घेता, 'ए बहीण माझा पाठलाग सोड' अशी...

Hair Care : केसांना मुळापासून मजबूत बनवा, ‘या’ टिप्स वापरा

Hair Care Tips : आपल्या व्यस्त आणि चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या केसांवरही होताना दिसतो. अनेक जण सध्या केसांच्या...

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी राहुलकडे नेतृत्व; ‘बीसीसीआय’च्या वैद्यकीय पथकाने तंदुरुस्त जाहीर केल्याने भारतीय संघात निवड

पीटीआय, नवी दिल्ली : अनुभवी फलंदाज केएल राहुलला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वैद्यकीय पथकाने गुरुवारी तंदुरुस्त जाहीर केल्यानंतर आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी त्याची...

JEE Advanced साठी अर्ज करण्याची आणखी एक संधी; IIT Bombay नं वाढवली मुदत

JEE Advanced 2022 : इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी बॉम्बे (IIT Bombay) आजपासून जेईई अॅडव्हान्ससाठी अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख...

सांगलीत पुराचा धोका! कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ; पूरपट्ट्यातील नागरिकांना स्थलांतराच्या सूचना

Sangli Flood:संततधार पावसामुळेकृष्णा नदीच्या (Sangli Krushna River) पाणीपातळीत वाढ झाली आहे. सोबतच आज कोयनेतून विसर्ग (Koyna Dam)वाढवण्यात येणार...

12th August 2022 Important Events : 12 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

12th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...