बीजिंग/सिंगापूर: लडाख पूर्वमध्ये दादागिरी दाखवणाऱ्या चीनला त्यांच्याच दारात भारतीय नौदल शक्तिप्रदर्शन करणार आहे. भारतीय नौदलाने चार युद्धनौका पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय नौदलाच्या या युद्धनौका दोन महिन्यांपर्यंत दक्षिण चीन समुद्र आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये असणार आहे. भारतीय युद्धनौका व्हिएतनाम, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, इंडोनेशिया आणि फिलीपाइन्ससोबत युद्धसराव करणार आहेत. या सगळ्या देशांचा चीनसोबत दक्षिण चीन समुद्रातील हद्दीवरून वाद आहे.
चीनकडून तैवानवर हल्ला करण्याची शक्यता असताना या युद्धनौका दक्षिण चीन समुद्रात दाखल होत आहेत. दक्षिण चीन समुद्रात चीनला वर्चस्व ठेवायचे आहे. त्यातून चीन अधिकाधिक समुद्र हद्दीवर दावा सांगत आला आहे. त्यामुळे इतर देशांसोबत चीनचा वाद सुरू आहे. चीनने प्रसिद्ध केला गलवान संघर्षाचा व्हिडिओ; भारतीय जवानांनी ‘असा’ केला प्रतिकार!
अमेरिकेने दिले २४ रशियन राजनयिकांना देश सोडण्याचे आदेश दक्षिण चीन समुद्र सध्या जगातील नौदलाच्या हालचालींचे केंद्र झाले आहे. मागील आठवड्यातच ब्रिटनचे एअरक्राफ्ट कॅरिअर या भागातून गेले होते. इतकंच नाही तर अमेरिकेची महाविनाशक युद्धनौकादेखील या भागातून गेली आहे. त्याशिवाय दक्षिण चीन समुद्रामध्ये चिनी नौदलाकडून युद्धसराव सुरू असतो. त्यामुळे काही वेळेस तणावाची स्थिती निर्माण होते.
चीनला मोठा झटका; फिलीपाइन्स आणि अमेरिकेत झाला ‘हा’ करार! सिंगापूरमधील तज्ज्ञ कोह यांनी सीएनएनला सांगितले की, दक्षिण चीन समुद्रात भारतीय नौदलाच्या युद्धनौका जरी वादग्रस्त भागापासून १२ नॉटिकल मैल दूर असले तरी चीनला योग्य संदेश देण्यास पुरेशा आहेत. भारतीय नौदलाने घेतलेल्या या निर्णयामुळे चीनचा अधिक संताप होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
या तरुणाने स्वतःवरच 20 लिटर पेट्रोल ओतून घेतलं आणि स्वतःलाच पेटवलं. या घटनेत तो गंभीररित्या भाजला. गंभीर अवस्थेच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं,...
मुंबई: आजकाल असे बरेच अॅप्स आले आहेत. ज्यांच्या मदतीने आपण अगदी सहजपणे एखाद्या व्यक्तीचे लोकेशन ट्रॅक करू शकतो. त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष...
मुंबई, 12 ऑगस्ट : स्टार प्रवाह सध्या महाराष्ट्राची सर्वात लाडकी वाहिनी आहे. या वाहिनीवरील सगळ्याच मालिका प्रेक्षकांची मन जिंकत आहेत. टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या...
अन्वय सावंत
मुंबई : गेल्या वर्षी जागतिक महिला सांघिक अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्यांदा रौप्यपदक जिंकण्यापाठोपाठ यंदा बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय महिला संघाने प्रथमच कांस्यपदकाची कमाई...
सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणं एका जोडप्याला चांगलंच भोवलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...