Thursday, July 7, 2022
Home भारत भारतीय अर्थव्यवस्थेत 7.5 टक्के आर्थिक विकास दर अपेक्षित: पंतप्रधान मोदी

भारतीय अर्थव्यवस्थेत 7.5 टक्के आर्थिक विकास दर अपेक्षित: पंतप्रधान मोदी
Brics Summit 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी ब्रिक्सच्या बैठकीत सहभागी झाले होते. चीनने आयोजित केलेली ही बैठक व्हर्चुअल माध्यमात पार पडली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष रामाफोसा आणि ब्राझीलचे अध्यक्ष बोलसोनारो उपस्थित होते. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या भू-राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात म्हटले की, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मी सर्व ब्रिक्स देशांमध्ये आयोजित केलेल्या अद्भूत कार्यक्रमांसाठी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.

कोविडचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज सलग तिसऱ्या वर्षी कोविड महामारीच्या आव्हानांमध्ये आपण व्हर्चुअली भेटत आहोत. जागतिक महामारीचा प्रादुर्भाव पूर्वीपेक्षा कमी झाला असला तरी त्याचे अनेक दुष्परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेत अजूनही दिसून येत आहेत. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, जागतिक अर्थव्यवस्थेबाबत ब्रिक्स सदस्य देशांचे विचार खूप समान आहेत. त्यामुळे आपले परस्पर सहकार्य जागतिक परिस्थितीच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरले आहे. पंतप्रधान म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांत आम्ही ब्रिक्स देशांच्या राजकारणात अनेक संस्थात्मक सुधारणा केल्या आहेत. ज्यामुळे या संघटनेची परिणामकारकता वाढली आहे. आपल्या न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या सदस्यसंख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे. ही आनंदाची बाब आहे. अशी अनेक क्षेत्रे आहेत जिथे आपल्या परस्पर सहकार्याचा थेट फायदा नागरिकांच्या जीवनात होत आहे.

न्यू इंडियाबद्दल काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

भारताच्या अर्थव्यवस्थेचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, 2025 पर्यंत भारतीय डिजिटल अर्थव्यवस्थेचे मूल्य एक ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचेल. आपल्या राष्ट्रीय पायाभूत सुविधांनुसार भारतात 1.5 ट्रिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची संधी आहे. या वर्षी भारतीय अर्थव्यवस्थेत 7.5 टक्के आर्थिक विकास दर अपेक्षित आहे. न्यू इंडियाचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की, ‘न्यू इंडिया’मध्ये प्रत्येक क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत. आम्ही प्रत्येक क्षेत्रात नवनिर्मितीला पाठिंबा देत आहोत. आमचे परस्पर सहकार्य कोविड-19 नंतरच्या जागतिक व्यवस्थेच्या सुधारणेसाठी उपयुक्त योगदान देऊ शकते. आम्ही गेल्या काही वर्षांत ब्रिक्समध्ये संरचनात्मक बदल केले आहेत. त्यामुळे या संस्थेचा प्रभाव वाढला आहे. ब्रिक्सच्या न्यू डेव्हलपमेंट बँकेची सदस्यसंख्या वाढली ही आनंदाची बाब आहे.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#भरतय #अरथवयवसथत #टकक #आरथक #वकस #दर #अपकषत #पतपरधन #मद

RELATED ARTICLES

आज आहे ‘वर्ल्ड चॉकलेट डे’; जगात सगळ्यात जास्त चॉकलेट कोण खातंय माहितेय का?

मुंबई, 07 जुलै : आजच्या युगात कोणताही सण-उत्सव असो, लोकांना चॉकलेट खायला आणि भेटवस्तू म्हणून द्यायला आवडतात. सणांच्या दिवशीही चॉकलेट खाण्याचा ट्रेंड झपाट्याने...

शिंदे कुटुंबीयांसाठी मोठा दिवस, मुख्यमंत्री मुलाचे ऑफिस पाहण्यास बाबा आले

मुंबई, ०७ जुलै: रिक्षाचालक ते मुख्यमंत्रिपदापर्यंत असा प्रवास करणारे एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आज सर्वात मोठा दिवस आहे....

‘राम देव नाही’, ‘मोदी PM झाले तर नागरिकत्त्व सोडेन’; ‘काली’ सिनेमाच्या दिग्दर्शिकेचे जुने Tweets Viral

मुंबई: 'काली' या माहितीपटाचं पोस्टर सोशल मीडियावर (Kaali Film Poster) वादाचं कारण ठरत आहे. यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप माहितीपटाची दिग्दर्शिका 'लीना मणिमेकलई'...

Most Popular

Indian Railways: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा, पुढील महिन्यापासून ही मोठी सुविधा

Indian Railways:  भारतीय रेल्वे वंदे भारत रेल्वेच्या दोन अपग्रेड व्हर्जन आणणार आहे. या दोन्ही नव्या गाड्या सध्याच्या वंदे भारतपेक्षा खूप वेगळ्या असतील. अस्वीकरण: ही...

‘राम देव नाही’, ‘मोदी PM झाले तर नागरिकत्त्व सोडेन’; ‘काली’ सिनेमाच्या दिग्दर्शिकेचे जुने Tweets Viral

मुंबई: 'काली' या माहितीपटाचं पोस्टर सोशल मीडियावर (Kaali Film Poster) वादाचं कारण ठरत आहे. यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप माहितीपटाची दिग्दर्शिका 'लीना मणिमेकलई'...

MS Dhoni : बापरे! वाढदिवसाच्या दिवशी धोनी लंडनच्या रस्त्यावर करतोय ‘हे’ काम

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीचा आज वाढदिवस आहे. आज धोनी 41 वर्षांचा झाला आहे. धोनीचा वाढदिवस केवळ तो आणि...

पावसाळ्यात खाद्यपदार्थ दीर्घकाळ टिकवण्यासाठी काही टिप्स

मुंबई, 6 जुलै : पावसाळ्यात वातावरण गार आणि ओलसर असते. पावसाळ्याची (Rainy Season) मजा तर सर्वजण घेतात. मात्र पावसाळ्यात घरातील अन्न (Food Storage...

Special Report : नाशकातल्या येवला तालुक्यात एका अफगाणी युवकाची गोळ्या झाडून हत्या

Special Report :  नाशकातल्या येवला तालुक्यात एका अफगाणी युवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलीये..संपत्तीच्या वादातून निकटवर्तीयांकडूनच ही हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न...