Saturday, July 2, 2022
Home क्रीडा भारताला आणखी एक 'गोल्ड'; अमेरिका आणि ब्राझीलला मागे टाकले

भारताला आणखी एक ‘गोल्ड’; अमेरिका आणि ब्राझीलला मागे टाकले


नवी दिल्ली: भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये १ सुवर्णासह ७ पदक जिंकून पदकतालिकेत ४८वे स्थान मिळवले. भारताची ऑलिम्पिकमधील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. ऑलिम्पिक स्पर्धा सुरू झाल्यापासून देशात सर्व ठिकाणी खेळाडूंच्या कामगिरीची चर्चा आहे. कधी नव्हे ते देशातील क्रीडाप्रेमीनी गॉल्फ सारखा खेळ देखील पहाटे उठून पाहिला. या शिवाय हॉकीत पुरुष संघाने ४१ वर्षानंतर पदक जिंकले.

ऑलिम्पिकच्या काळात झालेल्या चर्चेसाठी जर पदक असेत तर त्यातील सुवर्णपदक नक्कीच भारताला मिळाले असते. टोकियो ऑलिम्पिक दरम्यान जगातील सर्वात मोठ्या अशा सोशल मीडिया फेसबुकवर सर्वाधिक इन्गेजमेंट मिळवण्याबाबत भारत एक नंबर राहिला.

वाचा- Video:’हे माझे नाही तर संपूर्ण देशाचे पदक, मिळाल्यापासून खिशात घेऊन फिरतोय’

भारतीयांनी या बाबत अमेरिका, ब्राझील आणि फिलिपिन्स या देशातील लोकांना मागे टाकले. सुवर्णपदक जिंकणारा भारताचा नीरज चोप्रा ऑलिम्पिकच्या काळात सोशल मीडियावर चर्चेत राहिलेला नंबर एकचा खेळाडू ठरला. ही माहिती २३ जुलै ते ८ ऑगस्ट या काळात फेसबुक आणि इस्टाग्रामकडून आलेल्या डेटा द्वारे समोर आली आहे.

ऑलिम्पिक दरम्यान फेसबुकवर सर्वाधिक चर्चा करण्याबाबत भारत पहिल्या स्थानावर, अमेरिका दुसऱ्या तर ब्राझील तिसऱ्या स्थानावर राहिला. फिलीपीन्स चौथ्या आणि मॅक्सिको पाचव्या स्थानावर राहिले.

वाचा- मेस्सी ढसाढसा रडत म्हणाला, ५० टक्के पगार कपात करण्याची ऑफर दिली पण त्यांनी ऐकले नाही

ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती ट्रॅक आणि फिल्ड मधील क्रीडा प्रकाराची होय. भारताच्या नीरज चोप्राने भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले. यामुळे भालाफेक अव्वल स्थानी राहिले. तर जिमनॅस्टिक्स दुसरे, रोइंग तिसरे, बॉक्सिंग चौथ्या तर स्विमिंग पाचव्या स्थानावर होते.

मानसिक आरोग्यामुळे अमेरिकेची जिमनॅस्ट सिमोन बाइल्सने अनेक इव्हेंट्समध्ये भाग घेतला नाही. ऑलिम्पिकच्या काळात ती सर्वाधिक चर्चेत राहिली. दुसऱ्या क्रमांकावर नीरज चोप्रा होता.

वाचा- नीरजचे पदक चमत्कारापेक्षा कमी नाही, जाणून घ्या ८ फॅक्ट

या ऑलिम्पिकच्या काळात रेड हार्ट इमेजीचा फेसबुकवर सर्वाधिक वापर झाला. तर टाळी वाजवणारी इमोजी दुसऱ्या आणि चेहऱ्यावर अश्रू असणारी इमोजी तिसऱ्या क्रमांकावर होती.

सात ऑगस्ट ठरला…

नीरज चोप्राने सात ऑगस्ट रोजी सुवर्णपदक जिंकले आणि हाच दिवस ऑलिम्पिकमधील सर्वाधिक चर्चेचा दिवस ठरला. याच दिवशी अमेरिकेच्या बॉस्केटबॉल संघाने सुवर्ण जिंकले होते. भारतीयांनी या दोन्ही घटनेवर भरपुर चर्चा केली.

वाचा- नीरज चोप्रावर बक्षीसांची उधळण; आता इंडियन आर्मीकडून मिळणार मोठे गिफ्ट

बॅडमिंटनमध्ये भारताच्या पीव्ही सिंधूचा उपांत्य फेरीत पराभव करणाऱ्या तैईपेच्या ताइ यू यिंगच्या धन्यवाद पोस्टला ऑलिम्पिकच्या काळात सर्वाधिक इंटरॅक्शन मिळाले. रौप्यपदक जिंकणारी ताईच्या पोस्टला १३ लाख इंटरॅक्शन मिळाले.

ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतलेल्या जगभरातील खेळाडूंना या काळात इस्टाग्रामवर ७.५ कोटी नवे फॉलोअर्स मिळाले. खेळाडूंनी या काळात ३ लाखाहून अधिक इस्टाग्राम स्टोरी पोस्ट गेल्या. सर्वाधिक फॉलोअर्स मिळवण्याबाबत नीरज दुसऱ्या स्थानावर राहिला. त्याचे फॉलोअर्स २६ लाखांनी वाढले. याबाबत रायसा रिल्स पहिल्या स्थानावर राहिली. तिचे फॉलोअर्स ५८ लाखांनी वाढले.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#भरतल #आणख #एक #गलड #अमरक #आण #बरझलल #मग #टकल

RELATED ARTICLES

Shocking! प्रायव्हेट पार्टमध्ये असं काही केलं इंजेक्ट, तरुणाचा दुर्देवी मृत्यू!

28 वर्षांच्या तरुणाच्या मृत्यूमुळे त्याच्या आईला जबर धक्का बसला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार...

पुणे पालिकेचा दणका! प्लास्टिक बंदी विरोधात पहिल्याच दिवशी वसूल केला 70 हजार रुपयांचा दंड

Pune Pmc News: 1 जुलै 2022 पासून "सिंगल-युज प्लास्टिक" च्या वापरावर बंदी घालण्यासाठी राज्यांना विनंती करणाऱ्या केंद्र सरकारच्या...

Most Popular

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद का बरखास्त झाली? ‘ही’ आहेत कारणं

Maharashtra State Wrestling association : भारतीय कुस्ती संघटनेकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद...

Love Advice : प्रेमाची कबुली देताय ? मग या ४ गोष्टींकडे एक नजर टाकाच नाहीतर फार मोठे नुकसान होईल

जेव्हा तुम्ही एखाद्याच्या प्रेमात असता तेव्हा तुम्हाला तुमच्या मनातील गोष्टसुद्धा कळत नाहीत. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या आवडीच्या सर्व गोष्टी करत असता. पण नातं (relationship...

‘मराठा म्हणून एकनाथ शिंदे..’; ज्योतिरादित्य शिंदेंची प्रतिक्रिया चर्चेत

नवी दिल्ली 02 जुलै : राज्यातील राजकारणात मागील जवळपास १० दिवसांपासून नाट्यमय घडामोडी घडत होत्या. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेना आणि अपक्ष...

पूरग्रस्त चिपळूणकरांसाठी देण्यात आलेल्या तूर डाळीला लागला भुंगा, पुरवठा विभागाचा गलथानपणा समोर

Tur dal : अन्न आणि पुरवठा विभागातील गलथान कारभाराचा एक नमुना पुढे आला आहे. जुलै 2021 मध्ये पूर...

WhatsApp यूजर्संना भेट, दोन दिवसांनंतरचे मेसेजही डिलीट करता येणार, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीःwhatsapp upcoming feature update soon : WhatsApp आपल्या यूजर्सचे मन जिंकण्यासाठी लागोपाठ आपल्या अॅपमध्ये अपडेट आणत आहे. व्हॉट्सअॅपवर मेसेज डिलीट करण्याचे फीचर...