Saturday, July 2, 2022
Home विश्व भारतानं बनवलेल्या महामार्गावर तालिबानचा ताबा; 300 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक धोक्यात

भारतानं बनवलेल्या महामार्गावर तालिबानचा ताबा; 300 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक धोक्यात


काबूल, 10 ऑगस्ट: अमेरिकेनं अफगाणिस्तानातून (Afghanistan) आपलं सैन्य माघारी (American Army Went Back) घेतल्यापासून देशात तालिबानची (Taliban) क्रूरता वाढत आहे. तालिबाननं एकापाठोपाठ एक क्षेत्रांवर अतिशय वेगानं ताबा मिळवला आहे. यानंतर आता तालिबानच्या सैनिकांनी भारतानं अफगाणिस्तानात बांधलेल्या देलाराम-झरांज महामार्गावरही (delaram zaranj highway) ताबा मिळवला (Taliban Control) आहे. सध्या देशाचा जवळपास 80 टक्के भाग तालिबानच्या ताब्यात गेला आहे. अन्य भागासाठी तालिबान हिंसक हल्ले करत आहे. तालिबानच्या भीतीनं दुर्गम प्रांतात राहणारी लोकं काबूलमध्ये स्थलांतरित होतं आहेत. त्यामुळे काबुलमध्ये अनेक ठिकाणी कॅम्प लावल्याचं चित्र दिसत आहे.

इराण सीमेजवळील जरांज याठिकाणी मिळवलेला ताबा तालिबानसाठी मोठा धोरणात्मक विजय आहे. अफगाणिस्तानातून इराणकडे जाणाऱ्या 217 किलोमीटर लांबीच्या देलाराम-झरांज महामार्गावरून अफगाणिस्तानचा व्यापार होतो. काबूलमधील एका ज्येष्ठ पत्रकाराच्या मते, या महामार्गावर ताबा मिळवणं हा अफगाणिस्तान सरकारसाठी मोठा धक्का आहे. कारण या मार्गावरून होणारा व्यापार आता तालिबानी संघटनेच्या नियंत्रणाखाली जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा-Pakistan: मंदिराची तोडफोड करणारे 50 समाजकंठक जेरबंद; 150हून अधिकांवर गुन्हा दाखल
दरम्यान ‘तालिबान आणि त्यांची पाठीराखी असणारी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयनं मदरशांमधून 20,000 हून अधिक सैनिकांना अफगाणिस्तानात पोहोचवलं आहे, याबाबतची माहिती अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमिरुल्ला सालेह यांचे प्रवक्ते रिझवान मुराद यांनी आंतरराष्ट्रीय संघटनांना दिली आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचे तालिबानसोबतच अल कायदा आणि इतर कट्टरपंथी गटांशी देखील हितसंबंध आहेत. आमचे सैनिक सध्या किमान 13 दहशतवादी संघटनांविरुद्ध लढा देत आहेत.
हेही वाचा-तालिबानी राजवट परतली! घट्ट कपडे घातले म्हणून तरुणीची केली ‘अशी’ हत्या
भारताची 300 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक धोक्यात
गेल्या 20 वर्षांत भारत सरकारनं रस्ते, आरोग्य, शिक्षण, धरण, वीज प्रकल्पांसह अनेक प्रकल्पांमध्ये सुमारे 300 दशलक्ष डॉलर्सहून अधिक गुंतवणूक केली आहे. भारतीय गुंतवणूक सुरक्षित करण्यासाठी 2002 मध्ये भारतानं अफगाणिस्तानातील भारतीय दूतावासाचा विस्तार केला होता. पण सध्या अफगाणिस्तानात तालिबानचा वाढता धोका लक्षात घेता. याचा भारताला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#भरतन #बनवललय #महमरगवर #तलबनच #तब #दशलकष #डलरच #गतवणक #धकयत

RELATED ARTICLES

वेबविश्वात आणखी एक खळबळ! रानबाजारनंतर खुर्चीचं राजकारण; पानसेंची नवी वेबसिरीज भेटीला

मुंबई 1 जुलै: सध्या महाराष्ट्रातील राजकारणात अनेक उलाढाली होत आहे. एक ना अनेक अनपेक्षित उलथापालथ सध्या पाहायला मिळत आहे. राजकारणाच्या सध्याच्या याच पार्श्वभूमीवर...

‘नाराज होऊ नका, हे आपलंच सरकार’, देवेंद्र फडणवीसांकडून भाजप आमदारांची मनधरणी

मुंबई, 1 जुलै : राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप (BJP) यांचं एकत्रित सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार...

‘E म्हणजे एकनाथ आणि D म्हणजे देवेंद्र हे आमचे ED चे राज्य’

ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी पणजी, 1 जुलै : मुंबईत सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची आज...

Most Popular

काचेसारख्या चमकदार त्वचेचे रहस्य शोधताय मग या ५ गोष्टींचा आहारात समावेश करा, वाचा तज्ञांचे मत

नितळ त्वचा कोणाला आवडत नाही. यासाठी अनेक स्त्रिया वेगवेगळ्या प्रकारची क्रीम्स आणि रासायनिक उत्पादने वापरतात. पण वाढत्या वयाबरोबर या उत्पादनांमुळे तुमच्या त्वचेचे खूप...

शिंदे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; शिवसेनेची ती याचिका फेटाळली

मुंबई 01 जुलै : सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उद्या म्हणजेच शनिवारी भाजप आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारला...

ED Summons to Shivsena MP Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत आज ईडीसमोर हजर राहणार

<p>ED Summons to Shivsena MP Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत आज ईडीसमोर हजर राहणार</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...

तुमचं मुलं तुमच्याशी खोटं बोलतं? या सवयीमागची ही ४ कारणं धक्कादायक, उपाय म्हणून कराल एक गोष्ट

प्रत्येक पालक आपल्या मुलांना चांगलेच संस्कार देत असतात. मुलांनी चांगल वागावं, ही एवढीच यामागे त्यांची अपेक्षा असते. पण अनेकदा मुलांना खोटं बोलण्याची सवय...

Supreme Court: परवानगी न घेता सुट्ट्या घेतल्यास काय होणार?; सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश एकदा वाचाच

नवी दिल्लीः परवानगी न घेत्या कार्यालयात दांडी मारणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीत एक महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. परवानगी न घेता...