भारतात आता एकच विदेशी कंपनी
भारतात ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ कंपनीची लस आली असती, तर ती भारतात येणारी दुसरी लस ठरली असती. सध्या केवळ रशियाची स्पुटनिक व्ही ही एकमेव परदेशी लस उपलब्ध आहे. ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ कंपनीची लस ही सिंगल डोस असून तिची परिणामकारकता 85 टक्के आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये प्रचंड मागणी असलेल्या या कंपनीनं लसपुरवठ्यासाठीचा अर्ज मागे घेतला आहे.
वेगाला खिळ
भारतात लसनिर्मिती करणाऱ्या भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूट या दोन कंपन्यांशिवाय परदेशातून येणाऱ्या लसींवर भारत सरकारची भिस्त होती. या लसींचा हिशेब पकडून सरकारनं लसीकरणाच्या धोरणाची आखणी केली होती. मात्र आता ‘जॉन्सन अँड जॉन्सन’कडून लसींचा पुरवठा होणार नसल्यामुळे भारताच्या लसीकरणाच्या नियोजनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या मॉडर्ना आणि फायझरसह इतर कंपन्यांसोबत भारत सरकारची बोलणी अंतिम टप्प्यात असून अद्याप यापैकी एकाही कंपनीशी करार झालेला नाही.
हे वाचा -अरे देवा! अश्रूंमधूनही पसरू शकतो कोरोनाव्हायरस; संशोधनातून धक्कादायक माहिती समोर
लसीकरणाची सद्यस्थिती
देशात जानेवारी महिन्यापासून लसीकरण सुरू असून आतापर्यंत 47 कोटी नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा एक डोस देण्यात आला आहे. तर केवळ 10 कोटी नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. सध्या देशभरात दररोज सरासरी 50 लाख जणांना लस दिली जात असल्याचं चित्र आहे.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#भरततन #जनसन #अड #जनसन #लसच #मघर #करण #गलदसतयत