‘काँग्रेस आधीचा भारत पुन्हा निर्माण करण्यासाठी लढत आहे. ज्या संस्थांनी (Institutions) देशाच्या उभारणीमध्ये मोठी भूमिका पार पाडली त्या संस्थांवर आता ‘डीप स्टेट’नं कब्जा केला आहे. भाजप जनतेचा आवाज दाबण्याचं काम करत आहे तर आम्ही जनतेच्या समस्या ऐकण्याचं काम करतो. आता आमचा हा लढा राष्ट्रीय वैचारिक लढा (National Ideological Battle) झाला आहे,’ असं राहुल म्हणाले. ‘भाजप आणि संघ भारताकडे फक्त एक भौगोलिक प्रदेश म्हणून पाहतात. याउलट, काँग्रेससाठी भारत म्हणजे माणसांच असं एक राष्ट्र आहे. पण, सध्या काँग्रेस पक्षांतर्गत कलह, बंडखोरी, पक्षांतर आणि निवडणुकीतील पराभवासारख्या समस्यांशी लढत आहे. ही गोष्ट मी मान्य करतो’, असंही ते म्हणाले.
राहुल पुढे म्हणाले की, ‘भाजप सरकारच्या काळात रोजगार कमी झाले आहेत. असं असूनही ध्रुवीकरणामुळे (Polarization) ते सत्तेत टिकून राहिले आहेत. भारताची सध्याची स्थिती चांगली नाही. भाजपनं आपल्या भूमिकेतून एक प्रकारे सर्वत्र रॉकेलच शिंपडलं आहे. आम्ही यातून देशाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्या स्वप्नांतील भारतामध्ये भिन्न विचार असलेली प्रत्येक व्यक्ती आपले विचार व्यक्त करू शकते.’
अभ्यास करणाऱ्या बहिणीला भावानं असा आणला वैताग; Video पाहणाऱ्यांना आली लहानपणीची आठवण
भारतात मानवी हक्क उल्लंघनाच्या (Human Right Violations) काही घटनांबाबत अमेरिकेनं जाहीरपणे आपलं मत व्यक्त केलं. त्याबद्दल राहुल गांधींना प्रश्न विचारले असता ते म्हणाले, ‘भारतात ध्रुवीकरण होत आहे हे एव्हाना सर्वांना माहिती झालं आहे. आमचा लढा याच ध्रुवीकरणाशी आहे. काँग्रेससह देशातील इतर विरोधी पक्षही तीच लढाई लढत आहेत.’
राहुल यांना लोकशाहीबाबत (Democracy) प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, ‘भारतातील प्रत्येक संस्था आता सरकारनं आपल्या ताब्यात घेतली आहे. प्रत्येक संस्थेवर हल्ले होत आहेत. लोक म्हणतात की, आमच्याकडेही भाजपसारखा केडर आहे. पण जर आमच्याकडेही भाजपसारखा केडर असता तर आम्ही भाजपाला पुढे येऊच दिलं नसतं. पण, परिस्थिती वेगळी आहे. भाजप लोकांचे आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे तर आम्ही प्रत्येकाचं म्हणणं ऐकतो. लोकांचं म्हणणं ऐकण्यासाठीच आम्ही आहोत.’
मामाला तुरुंगात टाकल्याचा आला राग, 14 वर्षांच्या भाच्यानं घेतला खतरनाक बदला
राहुल गांधी यांनी केंब्रिजसारख्या जागतिक स्तरावरील युनिर्व्हर्सिटीमध्ये जाऊन भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. या टीकेला भाजपकडून काय प्रतिक्रिया मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#भरततल #परसथत #चगल #नहलडनमधय #जऊन #रहल #गधच #BJP #वर #हललबल