Friday, May 20, 2022
Home टेक-गॅजेट भारताची गहू निर्यातीवर बंदी; G-7 देश म्हणाले, प्रत्येकाने असे केले तर...

भारताची गहू निर्यातीवर बंदी; G-7 देश म्हणाले, प्रत्येकाने असे केले तर…


Wheat Export Ban: भारत सरकारने गव्हाच्या निर्यातीवर घातलेल्या बंदीवर जी-7 देशांनी टीका केली आहे. एएफपीनुसार, शनिवारी सात औद्योगिक देशांच्या समूहाच्या कृषी मंत्र्यांनी भारताच्या निर्णयाचा निषेध केला. जर्मन कृषी मंत्री केम ओझदेमीर यांनी स्टटगार्ट येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, “जर प्रत्येकाने निर्यात बंदी करण्यास किंवा बाजारपेठ बंद करण्यास सुरुवात केली तर हे संकट अधिक गंभीर होईल.” G-7 देशांमध्येमध्ये ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि अमेरिका यांचा समावेश आहे.

जी- 7 औद्योगिक राष्ट्रांच्या मंत्र्यांनी जगभरातील देशांना निर्बंधात्मक कारवाई न करण्याचे आवाहन केले आहे. ज्यामुळे उत्पादन बाजारांवर आणखी दबाव येऊ शकेल. ओझदेमीर म्हणाले की,”आम्ही भारताला G20 सदस्य म्हणून आपली जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन करतो.” जूनमध्ये जर्मनीमध्ये होणाऱ्या G7 परिषदेत या विषयावर जर्मन कृषी मंत्री शिफारस करतील, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे. 

भारताने गव्हाच्या निर्यातीवर घातली बंदी 

देशांतर्गत वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्याच्या उपायांचा एक भाग म्हणून भारताने गव्हाच्या निर्यातीवर तात्काळ बंदी घातली आहे. अधिकृत अधिसूचनेतून ही माहिती मिळाली आहे. दरम्यान, डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड (DGFT) ने 13 मे रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे, “ज्या मालासाठी या अधिसूचनेच्या तारखेला किंवा त्यापूर्वी अपरिवर्तनीय पत्रे (LOC) जारी करण्यात आली आहेत, अशा मालाच्या निर्यातीस परवानगी दिली जाईल.”

डीजीएफटीने असेही स्पष्ट केले आहे की, भारत सरकारने इतर देशांना त्यांच्या अन्न सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्या सरकारच्या विनंतीनुसार गव्हाच्या निर्यातीला परवानगी दिली आहे. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा गहू उत्पादक देश आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Sri Lanka Economic Crisis: श्रीलंकेत सफरचंद 1200, तर द्राक्षे 1800 रुपये; सामान्य नागरिकांच्या अडचणी संपेना

UAE President : यूएईच्या नव्या अध्यक्षांची घोषणा; शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याकडे UAEची सूत्रअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#भरतच #गह #नरयतवर #बद #दश #महणल #परतयकन #अस #कल #तर

RELATED ARTICLES

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह, दौरा स्थगित होण्याची शक्यता

मुंबई, 20 मे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर (Raj Thackeray Ayodhya Tour) जाणार आहेत. मात्र,...

अनशा पोटी हे खाल्लंत तर दररोज पोट होईल साफ; कधीच होणार नाही बद्धकोष्ठतेचा त्रास

दिल्ली, 19 मे: जीवनशैलीतले बदल अनेक व्याधींना आमंत्रण देतात. बदललेल्या जीवनशैलीत (Lifestyle) आहार तर बदलतोच, शिवाय व्यायामाचाही अभाव असतो. खाण्यापिण्याच्या वेळा बदलत असतात....

Heavy Rain: वादळी पावसाचा कहर; 25 जणांचा मृत्यू, सहा बोटी बुडाल्या

पाटणा, 20 मे: बिहारमध्ये गुरुवारी वादळी (storm) पावसाने (Heavy rain) कहर केला. बिहारच्या (Bihar) अनेक भागांमध्ये गुरुवारी 25 ते 60 किमी प्रतितास वेगाने...

Most Popular

अजय-अतुलमुळे झाला होता ‘पुष्पा’फेम गायकाचा बॉलिवूड डेब्यू

मुंबई 19 मे- दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध असणारा गायक सिड श्रीराम (Sid Sriram) आज त्याचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे.  अत्यंत गोड आणि...

महिलांसाठी Taliban चा नवा फर्मान, ऐकून तुम्हीही डोक्याला हात लावाल

काबूल, 20 मे: तालिबाननं (Taliban) आता एक नवं फर्मान काढलं आहे. तालिबाननं गुरुवारी निर्देश दिले की सर्व टीव्ही चॅनेलवर काम करणाऱ्या सर्व महिला...

वास्तुशास्त्रानुसार घरात जास्वंदीचं झाड लावण्याचे आहेत फायदे; पण दिशा महत्त्वाची

दिल्ली, 19 मे: घर आकर्षक दिसावं, त्यातलं वातावरण चांगलं राहावं, यासाठी अनेक जण घरात किंवा घराच्या परिसरात शोभेची झाडं किंवा फुलझाडं लावतात. काही...

Todays Headline 20th May : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या

मुंबई : आज दिवसभरात वेगवेगळ्या बातम्यांची ही नांदी आहे. ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं...

2017-18 च्या तुलनेत यावर्षी साखरेची निर्यात 15 पटीनं जास्त, ‘या’ प्रमुख देशांना निर्यात

Sugar exports : यावर्षीचा ऊस गळीत हंगाम अंतिम टप्यात आला आहे. अशातच चालू साखर हंगामात एक चांगली बातमी...

कांद्याने केला पुन्हा वांदा, देशातील कांदा उत्पादक पुन्हा संकटात; दरात मोठी घसरण

मुंबई, 19 मे : किमान आधारभूत किमतीपेक्षा (msp) 2-4 रुपये किलोने अधिक भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना चांगले दिवस आल्याचे चित्र दिसत आहे परंतु हे...