Friday, May 20, 2022
Home मुख्य बातम्या भाजपचं हिंदुत्व खोटं, म्हणून सोडलं; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

भाजपचं हिंदुत्व खोटं, म्हणून सोडलं; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली


Uddhav Thackeray On Bjp: ”जो एक खोटा हिंदुत्वाचा बुरखा घातलेला पक्ष आपल्या सोबत होता, ते देशाची भरकवट आहेत. मला आज मोठी गदा देण्यात आली. मी मध्ये बोलो होतो. मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको, तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदू हवा आहे”, असं शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. मुंबईतल्या बीकेसी मैदानावर पार पडलेल्या सभेत ते असं म्हणाले आहेत. या सभेला हजारोंच्या संख्येने शिवसैनिक जमले आहेत. 

उद्धव ठाकरे म्हणाले आहरेत की, ”आमचं हिंदुत्व हे गदाधारी आहे. बाकीच्यांच्या हिंदुत्व घंटाधारी आहे. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, यांचा हिंदुत्व ‘गधा’धारी आहे. म्हंटल बरोबर आहे. आमचं हिंदुत्व ‘गधा’धारी होत, म्हणून आम्ही अडीज वर्षांपूर्वी तुम्हाला सोडलं. आमचे जुने फोटो तुमच्यासोबत येतात, त्यावरून तुमचा गैसमज झाला असेल. मात्र आम्ही गध्याला सोडलं आहे.” भाजपला टोला लगावत ते म्हणाले, ”गाढवानं लाथ मारायची आधी, आम्ही लाथ मारली आता बसा बोंबलत.”

भाजपवर हल्लाबोल करत ते म्हणाले आहेत की, ”देशात एक भ्रम निर्माण केला जात आहे आणि आवेश आणला जात आहे, देशातच नाही तर जगभरात हिंदुत्वाचे रक्षक हे भारतीय जनता पक्ष आहे. मग जे इथे बसले आहे. ते कोण आहे. हे जे हिंदू आहेत. यांच्या धमन्यांमध्ये हिंदुत्वाचा रक्त त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी परेल आहे, हा हिंदू काही मेलेल्या आईच दुध पिलेला नाही.” 

अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेन कोणाला हवी? 

उद्धव ठाकरे म्हणाले, ”स्लीप ऑफ टंग म्हणून काही मुद्दे सोडता येणार नाहीत, 1 मे रोजी देवेंद्र फडणवीस बोलून गेले. त्यांच्या मालकाची जी इच्छा आहे ती की, मुंबई आम्ही स्वतंत्र करणार. तुमच्यासकट तुमच्या मालकाच्या सतराशे साठ पिढ्या आल्या तरी हे शक्य नाही.” ते म्हणाले, अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेन आणत आहेत. ती कुणाला हवी आहे? हा मुंबई तोडण्याचा डाव आहे. मुंबई स्वतंत्र करणार म्हणजे काय करणार? मुंबई काय पारतंत्रात आहे? ज्या ज्या वेळी मुंबईवरती आपत्ती येते, तेव्हा धावून जाणारा, माझा शिवसैनिक असतो, असं ते म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, ”तुमचा पक्ष (स्वतंत्र चळवळीत) तर तेव्हा नव्हता, आमचाही नव्हता. मात्र तुमची मातृसंस्था जी आहे संघ. तिला दोन ते तीन वर्षात आता 100 वर्षे होतील. स्वतंत्र लढण्यात संघ एकदाही उतरला नाही, असेल तर दाखले दाखवा. तुमचा आणि स्वतंत्र चळवळीचा संबंध नाही. त्या स्वतंत्र चळवळीत तुम्ही नव्हता, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातही तुम्ही नव्हता. तेव्हा शिवसेना नव्हती. मात्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझे काका श्रीकांत ठाकरे हे माझ्या आजोबाला मदत करत होते. माझे आजोबा जेव्हा हा लढा सुरू होता, त्यावेळी त्या लढ्यातले पहिले पाच सेनापती होते, त्यातले एक प्रबोधनकार ठाकरे. त्यावेळी त्यांनी जनसंघासह सर्वाना एकत्र येण्याचं आव्हान केलं होत. मात्र या चळवळीतून कोणी पाहिलं फुटलं असले, तर यांचा पक्ष जनसंघ.  

मराठीला अभिजात दर्जा कधी? 

उद्धव ठाकरे म्हणाले, केंद्र सरकार मराठीला अभिजात दर्जा आजही देत नाही. ही छत्रपती शिवाजी महाराजांची मातृभाषा आहे. छत्रपती नसते तर आज तुम्ही देखील भोंग्यात बसलेले असता. त्या मातृभाषेला तुम्ही दर्जा देत नाही, असं करंट सरकार केंद्रात बसलं आहे, असं म्हणत त्यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#भजपच #हदतव #खट #महणन #सडल #उदधव #ठकरच #तफ #धडडल

RELATED ARTICLES

2017-18 च्या तुलनेत यावर्षी साखरेची निर्यात 15 पटीनं जास्त, ‘या’ प्रमुख देशांना निर्यात

Sugar exports : यावर्षीचा ऊस गळीत हंगाम अंतिम टप्यात आला आहे. अशातच चालू साखर हंगामात एक चांगली बातमी...

6 महिने कंबरदुखीने होता हैराण; डॉक्टरांना रुग्णाच्या किडनीत सापडले…

हैदराबाद, 20 मे : प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी कंबरदुखीचा त्रास हा होतोच. अतिरिक्त काम, कंबरेवर ताण, झोपेच्या स्थितीमुळे कंबर दुखत असावी असं...

सदाभाऊ खोतांच्या ‘जागर शेतकऱ्याचा, आक्रोश महाराष्ट्राचा’ अभियानाचा आज समारोप, फडणवीसांची सभा

Devendra Fadnavis : शेतकरी प्रश्नासंदर्भात सरकारला जाग येण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी 'जागर...

Most Popular

IPL 2022 : विराटने गुजरातला धुतलं, तरी मुंबईच ठरवणार RCB चं भवितव्य!

मुंबई, 19 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) करो या मरो सामन्यात आरसीबीने गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans vs RCB) 8 विकेटने पराभव...

प्राजक्ताचा रानबाजार नंतरचा ‘तो’ फोटो चर्चेत, फॅन्स विचारत आहेत, ‘ आता हे काय ‘

मुंबई, 19 मे- अभिनेत्री प्राजक्ता माळी( Prajakta Mali ) आणि तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) यांची मुख्य भूमिका असलेला ‘रानबाजार’ या (RaanBaazaar Trailer) वेबसिरीरीजचा...

बालकलाकार म्हणून मनोरंजन विश्वात पदार्पण, आता साऊथ इंडस्ट्रीवर राज्य करतोय ज्युनियर एनटीआर!

Jr. NTR Birthday : साउथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार ज्युनियर एनटी रामाराव अर्थात ज्युनियर एनटीआर (Jr. NTR ) आज (20...

कांद्याने केला पुन्हा वांदा, देशातील कांदा उत्पादक पुन्हा संकटात; दरात मोठी घसरण

मुंबई, 19 मे : किमान आधारभूत किमतीपेक्षा (msp) 2-4 रुपये किलोने अधिक भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना चांगले दिवस आल्याचे चित्र दिसत आहे परंतु हे...

20 मे दिनविशेष, जाणून घ्या इतिहासातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना

20th May 2022 Important Events : मे महिना सुरू झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व...

Todays Headline 20th May : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या

मुंबई : आज दिवसभरात वेगवेगळ्या बातम्यांची ही नांदी आहे. ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं...