Friday, August 12, 2022
Home भारत 'भविष्यात असे प्रकार नको', आमदारांच्या नृत्यावर मुख्यमंत्री शिंदे नाराज

‘भविष्यात असे प्रकार नको’, आमदारांच्या नृत्यावर मुख्यमंत्री शिंदे नाराज


वृत्तसंस्था, पणजी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर गोव्यातील हॉटेलमध्ये त्यांच्या समर्थक आमदारांच्या एका गटाने केलेल्या नृत्यावर शिंदे यांनी शुक्रवारी नाराजी व्यक्त केली. तसेच भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत, याची काळजी घेण्यास सांगितले.

एकनाथ शिंदे राज्याचे पुढील मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली. त्यानंतर गोव्यातील हॉटेलच्या लॉबीमध्ये जमलेल्या आमदारांनी एकच जल्लोष केला. यातील काहीजण तर टेबलावर चढून नाचल्याचे व्हिडीओद्वारे समोर आले होते. मराठी गाण्यावरील त्यांचे नृत्य व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी ते अतिशय अशोभनीय असल्याची टीका केली होती.

महाराष्ट्रात जवळपास १० दिवसांच्या सत्तानाट्यानंतर आपल्या समर्थक आमदारांसह शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुंबईत झालेल्या या शपथविधी सोहळ्यानंतर शिंदे शुक्रवारी पहाटे दोना पावला येथील हॉटेलमध्ये परतले. यावेळी समर्थक आमदारांना संबोधित करताना त्यांनी त्यांच्या नृत्यावर तीव्र आक्षेप नोंदवला. तसेच भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत, याची काळजी घेण्यास सांगितले.

दरम्यान, ‘अशाप्रकारे नाचणे ही चूक होती, हे आम्ही मोठ्या मनाने मान्य करतो. नागरिकांनी निवडून दिलेल्या आणि महाराष्ट्राच्या भल्यासाठी काम करण्याचे ध्येय बाळगणाऱ्या आमदारांना हे शोभत नाही. आनंदाच्या भरात अशा चुका होतात, पण खरेतर त्या व्हायला नकोत’, असे बंडखोर आमदार व शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पत्रकारांसोबत बोलताना नमूद केले.

शिंदेंच्या बंडखोर गटानं मुक्काम केलेल्या गुवाहाटीच्या हॉटेलचं बिल किती? समोर आला आकडा

‘शिवसैनिक मुख्यमंत्री झाल्याचा अवघ्या महाराष्ट्राला आनंद’

पणजी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक राज्याचा मुख्यमंत्री झाल्याचा माझ्या सहकाऱ्यांसह संपूर्ण महाराष्ट्राला आनंद आहे. आमचे सरकार महाराष्ट्रातील नागरिकांना अपेक्षित असलेली कामे करेल. बाळासाहेब ठाकरे यांच्या दूरदृष्टीतून आम्ही काम करू व समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे त्यांनी विश्वास दाखवल्याबद्दल यावेळी आभार मानले.

PM Narendra Modi: एकनाथ शिंदेंचा अनुभव, देवेंद्र फडणवीसांची विद्वत्ता; नरेंद्र मोदींकडून अभिनंदनाचा वर्षावअस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#भवषयत #अस #परकर #नक #आमदरचय #नतयवर #मखयमतर #शद #नरज

RELATED ARTICLES

आशिया खंडातील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर झळकलं दगडी चाळ 2 चं पोस्टर

मुंबई, 12 ऑगस्ट-   मराठी चित्रपटांची सध्या चांगलीच हवा दिसून येत आहे. नुकतंच 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चित्रपटाचं पोस्टर चक्क विमानावर झळकलं...

सर्वसामान्य दाम्पत्याची ‘असामान्य’ कहाणी; दत्तक मुलीचा आज सर्वानाच अभिमान

गांधीनगर, 12 ऑगस्ट : अनेकजण विरोध झुगारुन असे काही निर्णय घेतात की कालांतराने ते समाजासाठी एक आदर्श उदाहरण बनतात. ही माणसं समाजात आपली...

कोयना धरणाचे 6 वक्री दरवाजे दीड फुटांनी उचलले, 10 हजार 100 क्युसेकने नदीत पाण्याचा विसर्ग 

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी 2 हजार 147 फुटांवर गेली असून एकूण पाणीसाठा 85.31 टीएमसी झाला आहे....

Most Popular

Sudden Weight Loss: काही न करता वजन कमी होतंय? तपासून घ्या नाहीतर…

असे अनेक लोक आहेत जे भरपूर खाऊनही वजन वाढवू शकत नाहीत. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे...

Coronavirus : देशात नवे 18053 कोरोनाबाधित, सक्रिय रुग्णांची संख्या 1 लाख 23 हजारांवर

Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोना संसर्गामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना...

राजू श्रीवास्तव यांच्या ब्रेनवर परिणाम; 43 तासानंतरही उपचारांना प्रतिसाद नाही

मुंबई,12 ऑगस्ट-  प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णलयात उपचार सुरु आहेत. त्यांच्याकडे...

Food For Kidney: किडनी निकामी होण्यापासून टाळायचे असेल तर, या पदार्थांना द्या प्राधान्य

मुंबई : Best Kidney Cleanse Remedies: मूत्रपिंड (Kidney) हा आपल्या शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तो फिल्टर म्हणून काम करतो आणि शरीरातील...

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी राहुलकडे नेतृत्व; ‘बीसीसीआय’च्या वैद्यकीय पथकाने तंदुरुस्त जाहीर केल्याने भारतीय संघात निवड

पीटीआय, नवी दिल्ली : अनुभवी फलंदाज केएल राहुलला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वैद्यकीय पथकाने गुरुवारी तंदुरुस्त जाहीर केल्यानंतर आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी त्याची...

वयाच्या 50 नंतरही राहाल निरोगी आणि फिट; आहार आणि व्यायामाच्या या टिप्स फॉलो करा

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : जेव्हा आपले वय 50 वर्षांपेक्षा जास्त असेल तर आरोग्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. योग्य आहार न घेतल्याने...