हायलाइट्स:
- ‘ती परत आलीये’ च्या प्रोमोने प्रेक्षकांना भरली धडकी
- प्रेक्षकांना मालिकेकडून उत्तम कथानकाची अपेक्षा
- प्रोमोमधील ती पाहून प्रेक्षकांना आली एनाबेलची आठवण
सैफ-करिनाच्या दुसऱ्या मुलाचं जेह नव्हे, तर हे आहे खरं नाव ; अभिनेत्रीने केला खुलासा
वाहिनीतर्फे प्रदर्शित करण्यात आलेल्या प्रोमोची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. प्रोमोमध्ये सर्वप्रथम दोन भयानक डोळे दाखविण्यात आले. त्यानंतर तिचे ओठ दाखवण्यात आले. मागे वाजणाऱ्या भीतीदायक पार्श्वसंगीतासोबत तिचा संपूर्ण चेहरा दाखवला आहे. सरतेशेवटी ती एक बाहुली असल्याचं जाणवतं. परंतु, ही बाहुलीदेखील पाहायला अत्यंत भयावह असल्याने पाहणाऱ्याला खरंच तिच्यात जीव आहे असा भास होतो. तिचे मोठी बुबुळं असलेले डोळे पाहणाऱ्याच्या मनात धडकी भरवायला पुरेसे आहेत. हा प्रोमो पाहून अनेक प्रेक्षकांनी त्यांना भीतीचा अनुभव आल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
तर काही प्रेक्षकांनी या प्रोमोमधील बाहुलीची तुलना ‘एनाबेल’ सोबत केली आहे. आता मालिकेत खरंच काहीतरी भयानक पाहायला मिळणार अशी अपेक्षा युझर्सकडून व्यक्त केली जात आहे. ‘ती परत आलीये’ सोबतच ‘रात्रीस खेळ चाले ३’ ही मालिकादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या दोन्ही मालिकांबद्दल उत्सुकता आहे. ‘ती परत आलीये’ ही मालिका १६ ऑगस्ट पासून रात्री १०.३० वाजता प्रसारित होणार आहेत. आता ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी होते का हे लवकरच कळेल.
देवमाणूस’मध्ये ट्विस्ट? देवीसिंग नव्हे तर ही व्यक्ती करणार चंदाचा खून?
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#भयनक #त #परत #आलय #चय #नवय #परमन #उडवल #परकषकच #झप #महणल #ह #तर