आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आपले हृदय म्हणजेच आपले हार्ट असते. हार्ट स्ट्रोक, हार्ट अटॅक आणि हार्ट फेल्युअर यावर अर्जुन वृक्षाच्या सालीचा उपयोग आणि त्याचे फायदे याबद्दल आतापर्यंत अनेक स्टडीज केल्या गेल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला अर्जुन सालीचा उपयोग (Arjun Sal Use) कसा करावा याची माहिती देणार आहोत.
अर्जुन साल वापरण्याची पद्धत
– जेवण करण्यापूर्वी अर्जुन सालचे पावडर (Arjun Sal Powder) पाण्यात टाकून दिवसातून एक किंवा दोनवेळा घ्यावे. 50 एमल एवढ्या प्रमाणात हे घ्यावे.
– पाण्याऐवजी दुधात टाकूनही ही पावडर घेतली जाऊ शकते.
– अर्जुन सालीपासून बनलेल्या कॅप्सुलदेखील (Arjun Sal Capsule) बाजारात उपलब्ध आहेत. यांचादेखील वापर तुम्ही करू शकता.
– 2 कप पाण्यामध्ये 1 चमचा अर्जुन सालचे पावडर टाकून उकळून घ्या. पाणी उकळून अर्धे झाल्यावर गाळून कोमट झाल्यावर प्यावे.
High BP चा त्रास असेल तर ही 3 फळं तुमच्यासाठी आहेत उत्तम; कंट्रोलमध्ये राहतं Blood Pressure
हृदयासाठी फायदेशीर
तुम्हाला हृदयाशी संबंधित आजार होत असतील तर अर्जुन सालीचे (Arjun Sal For Heart) सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. अर्जुन साल हृदयाशी संबंधित सर्व प्रकारच्या आजारांवर फायदेशीर आहे. हृदयाचे ठोके अनियमित होत असतील तर अर्जुन सालचे सेवन केल्यास खूप फायदा होतो. तसेच हृदयातील जळजळ दूर करण्यात मदत होते. हृदयाला बळ देण्यासाठी अर्जुन साल उपयुक्त ठरते.
रक्तदाब नियंत्रण
रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी अर्जुनची साल इतर औषधी वनस्पतींसोबत वापरली जाते. कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर असलेल्या लोकांमध्ये डिस्पनिया आणि सिस्टोलिक ब्लड प्रेशर सुधारत असल्याचे दिसून आले आहे.
स्किन आणि केसांसाठी तिळाचा असा करा वापर; नॅचरली मिळतील अनेक पोषक घटक
फुफ्फुसासाठी फायदेशीर
अर्जुन साल आयुर्वेदानुसार खोकला, दमा आणि काही संक्रमणांसह फुफ्फुसाच्या विकारांवरदेखील मदत करू शकते.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
Published by:Pooja Jagtap
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#बलड #परशर #नयतरणत #ठवल #य #झडच #सल #खणयच #पदधतह #समजन #घय