Saturday, August 20, 2022
Home भारत ब्रेस्ट मिल्क विक्रीमुळे कंपनी वादात? आईचं दूध विकणारी आशियातील पहिलीच कंपनी

ब्रेस्ट मिल्क विक्रीमुळे कंपनी वादात? आईचं दूध विकणारी आशियातील पहिलीच कंपनी


नवी दिल्ली, 3 जुलै : पैशाने बाजारात सगळं मिळतं, पण आई मिळत नाही, असं मराठीत म्हटलं जातं. मात्र, आई मिळत नसली तरी तिचं दूध मिळत आहे. होय तुम्ही बरोबर वाचलत. बंगलोरस्थित कंपनी निओलॅक्टा लाईफसायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड (Neolacta Lifesciences Pvt Ltd.) आईचे दूध (Breast Milk) विकते. आईचे दूध नफ्यासाठी विकणारी ही आशियातील पहिली कंपनी आहे. आता ती वादात सापडली आहे. आईच्या दुधाच्या विक्रीला नियमानुसार परवानगी नसल्याचे सांगत अनेक कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्यानंतर अन्न नियामक फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) ने कंपनीचा परवाना रद्द केला आहे.

FSSAI च्या कर्नाटक कार्यालयातून परवाना प्राप्त झाला
FSSAI तपासणीत असे दिसून आले की कंपनीला नोव्हेंबर 2021 मध्ये ‘नारीक्षरा’ (आईचे दूध) उत्पादनासाठी आयुष परवाना मिळाला आहे. TOI च्या बातमीनुसार, Neolacta Lifesciences Private Limited ची स्थापना 2016 मध्ये झाली. कंपनीने FSSAI च्या कर्नाटक कार्यालयाकडून डेअरी उत्पादन श्रेणीमध्ये परवाना घेतली होती.

ब्रेस्टफीडिंग प्रमोशन नेटवर्क ऑफ इंडिया (BPNI) च्या नुपूर बिर्ला म्हणतात, “एखाद्या कंपनीला मातांकडून दूध गोळा करून ते दुग्धजन्य पदार्थ म्हणून विकण्याची परवानगी दिली जात आहे हे अत्यंत धक्कादायक आहे.”

कंपनीच्या एमडींनी ही गोष्ट सांगितली
निओलॅक्टाचे एमडी सौरभ अग्रवाल म्हणाले की, ऑस्ट्रेलियात पहिली मिल्क बँक स्थापन करण्यासाठी कंपनीला मानवी दूध तंत्रज्ञानाचा पुरवठा करण्याचा अनुभव आहे. ते म्हणाले की, निओलॅक्टाने गेल्या पाच वर्षांत 450 रुग्णालयांमध्ये 51 हजारांहून अधिक मुदतपूर्व बाळांना लाभ दिला आहे.
विवाहित महिलेसोबत अनेक वर्ष होते संबंध, तिने सोबत यायला नकार दिल्यावर त्याने…
दान केलेले आईचे दूध प्रामुख्याने प्री-मॅच्युअर किंवा आजारी बाळांना प्यायला देण्यासाठी वापरले जाते. साधारणपणे, ना-नफा म्हणून स्थापन केलेल्या मिल्क बँकांमधून दूध खरेदी केले जाते. देणगीदारांकडून संकलित केलेले दूध पाश्चराइज्ड केले जाते, पोषक घटकांची चाचणी केली जाते आणि गोठवले जाते आणि संरक्षित केले जाते. सरकारी रुग्णालयांशी संलग्न असलेल्या दूध बँकांमध्ये मिळणारे दूध गरजूंना मोफत दिले जाते.

निओलॅक्टाची किंमत?
निओलॅक्टा 300 मिली फ्रोझन आईच्या दुधासाठी 4,500 रुपये आकारते. प्री-टर्म बाळाला दररोज सुमारे 30 मिली दुधाची आवश्यकता असू शकते तर सामान्य बाळाला दररोज 150 मिलीपर्यंत दुधाची आवश्यकता असू शकते. Neolacta मानवी दुधाची पावडर देखील विकते, जी कंपनीच्या प्लॅटफॉर्मवर ई-कॉमर्स वेबसाइट्सशिवाय उपलब्ध आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#बरसट #मलक #वकरमळ #कपन #वदत #आईच #दध #वकणर #आशयतल #पहलच #कपन

RELATED ARTICLES

शंख मुद्रा केल्याने मुलांच्या आत्मविश्वासात होते वाढ, ही आहे योग्य पद्धत

शंख मुद्रा करायला खूप सोपी आहे आणि त्याचा नियमित सराव केल्याने मुलांची एकाग्रता वाढते आणि त्यांचे मन शांत राहते. ही मुद्रा सर्व वयोगटातील...

औरंगाबादमधील भोंदूबाबाचा भांडाफोड, डोक्यावर हात ठेऊन आजार बरे करण्याचा दावा

Aurangabad Bhondubaba : मंडळी कोणी तुमच्या डोक्यावर हात ठेवल्याने तुमचे दुर्धर आजार बरे होतात असं म्हटलं तर आपण...

धक्कादायक! तुम्ही खात असलेल्या खेकडे आणि माशांचीही होतेय Corona test

मुंबई : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतेय. दरम्यान यामध्येच आता कोविडचा प्रसार समुद्रातून येणाऱ्या मासे आणि खेकड्यांमुळे होत असल्याचा संशय...

Most Popular

आता UKमध्येही सुरू होणार UPI सेवा! हजारो भारतीय विद्यार्थांना होणार फायदा

मुंबई, 19 ऑगस्ट: यूपीआयच्या माध्यमातून भारतात डिजिटल इंडिया अभियानाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये यूपीआय आयडी किंवा कोड स्कॅन करण्याच्या...

भुतियाचा भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज

नवी दिल्ली : भारताचा माजी फुटबॉल कर्णधार बायच्युंग भुतियाने सध्या चर्चेत असलेल्या अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) निवडणुकीत थेट अध्यक्षपदासाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज...

शंख मुद्रा केल्याने मुलांच्या आत्मविश्वासात होते वाढ, ही आहे योग्य पद्धत

शंख मुद्रा करायला खूप सोपी आहे आणि त्याचा नियमित सराव केल्याने मुलांची एकाग्रता वाढते आणि त्यांचे मन शांत राहते. ही मुद्रा सर्व वयोगटातील...

20th August 2022 Important Events : 20 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

20th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. आणि ऑगस्ट महिन्यातील आजचा दिवस म्हणजेच 20...

भारत-झिम्बाब्वे एकदिवसीय मालिका : राहुल सलामीला उतरणार?; झिम्बाब्वेविरुद्धच्या उर्वरित एकदिवसीय मालिकेत भारताची नवी रणनीती

पीटीआय, हरारे : झिम्बाब्वेविरुद्ध शनिवारी होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार केएल राहुलला फलंदाजीची संधी मिळेल अशी आशा आहे. याचप्रमाणे उर्वरित दोन एकदिवसीय सामन्यांत...

‘आज ‘मुरलीधराचा’ सण आणि…’ सुबोधला मिळाले खास आशीर्वाद

मुंबई, 19 ऑगस्ट : मराठीतील प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे सध्या कायम चर्चेत आहे. त्याचा 'बस बाई बस' या कार्यक्रमाची सध्या प्रचंड चर्चा आहे....