Friday, May 20, 2022
Home करमणूक बॉलिवूड कलाकारांवर संतापले 'आश्रम 3' चे दिग्दर्शक, म्हणाले "मला त्यांची चीड येते..."...

बॉलिवूड कलाकारांवर संतापले ‘आश्रम 3’ चे दिग्दर्शक, म्हणाले “मला त्यांची चीड येते…” | aashram 3 diretor prakash jha angry reaction on bollywood actors says they do not know actingसध्या अभिनय क्षेत्रात बॉलिवूड विरुद्ध दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी असा वाद सुरू आहे. सोशल मीडियावरही याची जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या असून आता या वादावर प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश झा यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. बॉलिवूड कलाकारांबद्दल त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ‘गंगाजल’, ‘मृत्युदंड’, ‘अपहरण’ आणि ‘चक्रव्यूह’ यासारखे चित्रपट देणारे प्रकाश झा सध्या ‘आश्रम ३’ वेबसीरिजमुळे चर्चेत आहेत.

दिग्दर्शक प्रकाश झा यांना ‘दामुल’ आणि ‘सोनल’ या चित्रपटांसाठी २ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. ४ दशकांपेक्षा जास्त काळ चित्रपटसृष्टीत असलेल्या प्रकाश झा यांनी आतापर्यंत अजय देवगण, शबाना आझमी, माधुरी दीक्षित, ओम पुरी, नाना पाटेकर आणि रणबीर कपूर यांसारख्या कलाकारांसोबत काम केलं आहे आणि त्यांच्या मते बॉलिवूड कलाकारांना अभिनय येत नाही.

आणखी वाचा-“तो बॉलिवूडबद्दल बोलला ते बरोबरच…” कंगना रणौतचा महेश बाबूला पाठिंबा

‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, Goafest 2022 मध्ये बोलताना प्रकाश झा यांनी बॉलिवूड कलाकारांच्या अभिनय कौशल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ते म्हणाले, “मला या कलाकारांसोबत काम करताना चीड येते. त्यांना माहीतच नाही की अभिनय काय असतो आणि कशाबद्दल असतो. आजपर्यंत कोणत्याही कलाकाराने मला ना शूटिंगच्या दिवसांबद्दल विचारलं ना कधी शूटिंगची वेळ काय आहे याबाबत विचारणा केली किंवा लोकेशन कोणती आहेत, अॅक्शन सीक्वेन्स कसे असणार आहेत आणि बरंच काही. पण कोणत्याही कलाकाराने मला हे विचारलेलं नाही.”

प्रकाश झा पुढे म्हणाले, “बॉलिवूड आणि हॉलिवूड कलाकारांमध्ये हाच मोठा फरक आहे. हॉलिवूडमध्ये कलाकार वर्कशॉपसाठी जातात, सराव करतात, आपला अभिनय सुधारण्याचा प्रयत्न करतात. मी देखील अनेक माझं अभिनय कौशल्य सुधारण्यासाठी वर्कशॉप अटेंड केली आहेत. मी शांतपणे एखाद्या विद्यार्थ्याप्रमाणे वर्कशॉपमध्ये सहभागी होत असे. अशाप्रकारे मी अभिनेत्याची भाषा समजून घेतली. मी क्लासमध्ये शेक्सपिअर आणि अन्य नाटकांमध्ये परफॉर्म केलं. ज्यामुळे मला आत्मविश्वास मिळाला.”

आणखी वाचा- “बलात्कार म्हणजे सरप्राइज सेक्स…” जेव्हा सनी लिओनीचं ट्वीट ठरलं होतं वादग्रस्त, वाचा नेमकं काय घडलं

प्रकाश झा यांनी दिग्दर्शन केलेला अखेरचा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. ज्याचं नाव ‘परीक्षा- द फाइनल टेस्ट’ असं होतं. जो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. त्याच वर्षी ते ‘सांड की आंख’ चित्रपटात दिसले होते. त्यानंतर २०२०मध्ये त्यांनी बॉबी देओलला घेऊन ‘आश्रम’ वेबसीरिज बनवली. ज्याचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#बलवड #कलकरवर #सतपल #आशरम #च #दगदरशक #महणल #मल #तयच #चड #यत #aashram #diretor #prakash #jha #angry #reaction #bollywood #actors #acting

RELATED ARTICLES

अनशा पोटी हे खाल्लंत तर दररोज पोट होईल साफ; कधीच होणार नाही बद्धकोष्ठतेचा त्रास

दिल्ली, 19 मे: जीवनशैलीतले बदल अनेक व्याधींना आमंत्रण देतात. बदललेल्या जीवनशैलीत (Lifestyle) आहार तर बदलतोच, शिवाय व्यायामाचाही अभाव असतो. खाण्यापिण्याच्या वेळा बदलत असतात....

Heavy Rain: वादळी पावसाचा कहर; 25 जणांचा मृत्यू, सहा बोटी बुडाल्या

पाटणा, 20 मे: बिहारमध्ये गुरुवारी वादळी (storm) पावसाने (Heavy rain) कहर केला. बिहारच्या (Bihar) अनेक भागांमध्ये गुरुवारी 25 ते 60 किमी प्रतितास वेगाने...

महिलांसाठी Taliban चा नवा फर्मान, ऐकून तुम्हीही डोक्याला हात लावाल

काबूल, 20 मे: तालिबाननं (Taliban) आता एक नवं फर्मान काढलं आहे. तालिबाननं गुरुवारी निर्देश दिले की सर्व टीव्ही चॅनेलवर काम करणाऱ्या सर्व महिला...

Most Popular

IPL 2022 : विराटने गुजरातला धुतलं, तरी मुंबईच ठरवणार RCB चं भवितव्य!

मुंबई, 19 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) करो या मरो सामन्यात आरसीबीने गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans vs RCB) 8 विकेटने पराभव...

दिशा पाटणीने गुपचूप केलं लग्न? आता टायगरचं काय होणार असा प्रश्न विचारतात नेटकरी.

मुंबई 19 मे- झगमगत्या बॉलिवूड तारकांसारखे हुबेहूब दिसणारे अर्थात हमशकल्स किंवा लुकअलाईक यांचे विडिओ सतत सोशल मिडियावर पाहायला मिळतात. त्यातले बरेचसे तर कन्टेन्ट...

प्रियांका चोप्राचा दीपिकाला जोरदार झटका…नाव मात्र आलिया, कॅटरिनाचं

प्रियांका चोप्रा सध्या 'जी ले जरा' या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान बोलताना प्रियांकाने दीपिका पदुकोणवर निशाणा लगावलाय   अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी...

बॉक्सर निखत झरीनचा ‘गोल्डन पंच’; जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई

भारताच्या निखत जरीनने जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

दैनंदिन राशिभविष्य : आर्थिक लाभ होणार पण या 2 राशींचा खर्चही वाढणार

आज दिनांक 20 मे 2022, शुक्रवार. आज वैशाख कृष्ण पंचमी. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत होणार आहे. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज चंद्र भाग्यस्थानात असून...

अजय-अतुलमुळे झाला होता ‘पुष्पा’फेम गायकाचा बॉलिवूड डेब्यू

मुंबई 19 मे- दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध असणारा गायक सिड श्रीराम (Sid Sriram) आज त्याचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे.  अत्यंत गोड आणि...