मुंबई : कोरोनाचे निर्बंध शिथिल होऊन आता देशभरातील चित्रपटगृहे खुली होणार आहेत. त्यामुळे अनेक चित्रपट निर्मात्यांनी आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. त्यामध्ये दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू, प्रभास आणि पवन कल्याण यांचे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. तसेच अक्षय कुमार, हुमा खुरेशी, लारा दत्ता आणि वाणी कपूर यांची भूमिका असलेला ‘बेल बॉटम’ हा चित्रपट 19 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
सुपरस्टार प्रभासने आपला ‘राधेश्याम’ हा चित्रपट पुढच्या वर्षी 14 जानेवारी 2022 रोजी, मकर संक्रातीच्या निमित्ताने प्रदर्शित होणार असल्याचं जाहीर केलंय. ‘राधेश्याम’ हा चित्रपट एक रोमॅन्टिक लव्ह स्टोरी असून यामध्ये प्रभाससोबत पूजा हेगडे प्रमुख भूमिकेत असणार आहे. पण प्रभाससमोर महेश बाबू आणि पवन कल्याणचे आव्हान असणार आहे.
महेश बाबू, प्रभास आणि पवन कल्याण यांची टक्कर
महेश बाबू आणि पवन कल्याण तसेच राणा दब्बुगती यांनीही आपल्या चित्रपटाची घोषणा केली असून ते चित्रपटही मकर संक्रातीच्या निमित्ताने प्रदर्शित होणार आहेत. प्रभासचा चित्रपट संपूर्ण देशभरात प्रदर्शित होणार असून महेश बाबू, पवन कल्याण तसेच राणा दब्बुगती यांचे चित्रपट स्थानिक स्तरावर प्रदर्शित होणार आहेत.
THE BIGGG CLASH… #Telugu industry is all set to witness a storm at the #BO on #Sankranthi 2022…
⭐ #SarkaruVaariPaata [#MaheshBabu] versus
⭐ #PawanKalyan – #RanaDaggubati starrer [not titled yet] versus
⭐ #RadheShyam [#Prabhas; PAN-#India film].
Interesting times indeed! pic.twitter.com/NPDmlEEXla
— taran adarsh (@taran_adarsh) July 30, 2021
महत्वाच्या बातम्या :
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#बकस #ऑफसवर #परभस #महश #बब #आण #पवन #कलयण #एकमकन #भडणर #एकच #दवश #चतरपट #परदरशत