मुलीचं लग्न झाल्यानंतर सासरी तिचा सर्वात आधी हक्क येतो तो तिच्या नवऱ्यावर. आईचा लाडका मुलगा बायकोचा प्रेमळ नवरा बनतो. मग त्याच्यासाठी सासू-सुना (Mother in law and daughter in law) आपसात भिडतात. त्याच्यावर सर्वात जास्त हक्क कुणाचा आईचा की बायकोचा यावरून भांडणं होतात.
आता त्याच्यावर हक्क नेमका कुणाचा आणि का हेच या सुनेने आपल्या गाण्यातून सांगितलं आहे. pallavishree123 इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
हे वाचा – नवरदेव जवळ येताच मंडपातच ढसाढसा रडू लागली नवरी; असं झालं तरी काय पाहा VIDEO
व्हिडीओत पाहू शकता सून आपल्या सासूजवळ बसली आहे. सासूच्या पायाजवळ बसून ती तिचे पाय दाबते. इतकंच नव्हे तर ती देशी अंदाजात गाणंही गाते. गाण्यातूनच ती आपल्याला सासूला धमकी देते. बेटा-बेटा ना कर सासू, अब तेरा बेटा मेरा है अशी धमकी ती सासूला देते. जब तक बेटा मम्मी बोले, तब तक बेटा तेरा है. अब तेरा बेटा डार्लिंग बोले, अब तेरा बेटा मेरा है, असं गात गात ती आपल्याला सासूला सांगते.
हे वाचा – आजी अन् नातवानं धरला गाण्यावर ठेका; व्हायरल होतोय भन्नाट डान्स VIDEO
तशी या व्हिडीओत सुनेने सासूला दिलेली धमकी खरी नाही आहे. म्हणजे ती आपल्या सासूसोबत मजा करते आहे. मजेशीर अंदाजात ती आपल्या सासूला समजवाताना दिसते आहे. पण खरंतर नाही म्हटलं तरी या सुनेने जे काही मजेत सांगितलं ते लग्नानंतरच सत्यच आहे, असं अनेकांनी म्हटलं आहे. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून त्यावर तशाच मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#बट #बट #न #कर #अब #तर #गड #गड #गत #सनन #थट #ससलच #दल #धमक #पह #VIDEO