हायलाइट्स:
- अभिनेता शरद केळकरने मुलाखतीमध्ये दिला संघर्षाच्या आठवणींना उजाळा
- खिशात आणि बँकेत एकही पैसा नव्हता,डोक्यावर कर्ज होते
- लोकांना आमची प्रसिद्धी दिसते परंतु संघर्ष दिसत नाही-शरद केळकर
शरद केळकर मनिष पॉल याच्या ‘पोस्टकार्ड’ या कार्यक्रमात सहभागी झाला आहे. या कार्यक्रमाचा एक प्रोमो मनिष पॉलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शरद केळकर त्याच्या खासगी आयुष्याबद्दल, करीअरबद्दल मनमोकळेपणाने बोलताना दिसत आहे. या कार्यक्रमात शरद केळकर त्याच्या संघर्षमय दिवसांबद्दल ही बोलला आहे.
या व्हिडिओमध्ये शरदने सांगितले की, त्यांच्या आयुष्यात एक दिवस असा आला होता की, त्याच्या बँकेच्या खात्यामध्ये एकही रुपया शिल्लक नव्हता. शरदने सांगितले की, ‘प्रेक्षक नेहमीच आमच्या कामाबद्दल बोलत असतात. याने काम चांगले केले, याने काम वाईट केले.. परंतु आम्ही करत असलेल्या संघर्षावर कुणीच बोलत नाही. तुम्ही दिल्लीहून आलात ना? मी ग्वाल्हेरहून आलोय… असं म्हटल्यावर लोकांना वाटते की आमच्याकडे मर्सिडीज गाडी आहे. आम्ही चांगले कपडे घालते, केस स्टाईलमध्ये ठेवतो त्यामुळे लोकांना वाटते की यांना काहीच संघर्ष करावा लागलेला नाही… ‘
दरम्यान, शरद केळकरच्या कामाबद्दल सांगायचे तर त्याच्याकडे अनेक प्रोजेक्ट आहेत. लवकरच तो अजय देवगणचा सिनेमा ‘भुज- द प्राइडऑफ इंडिया’ मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा १३ ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. त्याशिवाय एनिमेशन सीरिज ‘द लीजेंड ऑफ हनुमान २’ मध्ये सूत्रधाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या सीरिजमध्ये रामायणातील हनुमानाची कथा दाखवली जाणार आहे. याचा दुसरा सिझन ६ ऑगस्ट रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज झाला आहे.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#बक #बलनस #सपलल #डकयवर #मठ #करजअभनत #शरद #कळकरन #सगतल #कस #गल #जन #दवस