कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरेंनी ऑनलाईन पद्धतीने सभा घेतली आहे. बैठका घेतल्या आहेत पण विराट जाहीर सभा ही प्रदीर्घ काळानंतर होत आहे. महाराष्ट्रातील, देशाचं वातावरण आणि या वातावरणावर आलेला गढूळपणा आजय्या सभेने दूर होईल. महाराष्ट्राचं आकाश निरभ्र होईल आणि इथे फक्त भगव्या रंगाचं धनुष्यच आकाशात तुम्हाला दिसेल असंही संजय राऊत म्हणाले.
कुछ लोग महाराष्ट्र का माहौल बिगाड़ना चाहते हैं, महा विकास अघाड़ी सरकार को बदनाम करना चाहते हैं, राज्य को अस्थिर करना चाहते हैं। इन सभी प्रश्नों का उद्धव ठाकरे आज करारा जवाब देंगे: शिवसेना नेता संजय राउत
— ANI_HindiNews (@AHindinews) May 14, 2022
संजय राऊत पुढे म्हणाले, हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चाललं आहे. काही लोक हे राज्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. काही जण अडथळे निर्ण करत आहेत. काहींना पोटदुखी होत आहे. या पोटदुखीवर आजच्या सभेत योग्य उपचार केले जातील.
वाचा : “तुमच्यात ताकद असेल तर….” नवनीत राणांचं उद्धव ठाकरेंना पुन्हा आव्हान
कुणाचा बुस्टर डोस मला माहिती नाही. पण मास्टर ब्लास्टर डोस आमचा असेल. आमची फटकेबाजी असते. आम्ही मास्टर ब्लास्टर आहोत. शिवसेना आणि गर्दी यांचं एक नातं, समीकरण आहे. आम्हाला गर्दी जमवावी लागत नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार, हिंदुत्वाचा विचार, आमचा मराठी माणसाच्या संदर्भातील विचार हे एक लोहचुंबक आहे यामागे लोक आपोआप जमतात. उद्धव ठाकरेंच्या भाषणाची उत्सुकता महाराष्ट्र आणि देशाला लागलेली आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल अशी ही सभा असे असंही संज राऊत म्हणाले.
तुमच्या शहरातून (मुंबई)
Published by:Sunil Desale
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#बसटर #डस #कणच #महत #नह #पण #मसटर #बलसटर #डस #आमचच #असणर #सजय #रऊत