Saturday, July 2, 2022
Home क्रीडा बुमराह इतका निर्दयी कसा काय वागू शकतो? रोहित वेदनेने तडपडत असताना पाहा...

बुमराह इतका निर्दयी कसा काय वागू शकतो? रोहित वेदनेने तडपडत असताना पाहा काय केले


लीसेस्टर: इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याच्या आधी भारतीय संघ लीसेस्टरशायरविरुद्ध सराव सामना (Leicestershire Vs India Warm-Up Match) खेळत आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय फलंदाजांची पोल-खोल झाली. सामन्यात कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) ने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सराव लढतीत जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah), चेतेश्वर पुजारा, प्रसिद्ध कृष्णा आणि ऋषभ पंत हे चार भारतीय खेळाडू लीसेस्टरशायर संघाकडून खेळत आहेत.

भारतीय डावाची सुरूवात रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी केली. लीसेस्टरशायरकडून जसप्रीत बुमराहने गोलंदाजीची सुरुवात केली. रोहित शर्मा प्रथमच एका सामन्यात जसप्रीत बुमराहला सामोरे जात होता. सामन्यातील सातव्या षटकात बुमराहने रोहितला एक इनस्विंग चेंडू टाकला जो रोहितच्या पोटाच्या थोडा खाली लागला आणि त्याला प्रचंड वेदना झाल्या. रोहितच्या वेदना पाहून टीम इंडियाचे फिजिओ मैदानात आले.

बुमराह असा कसा वागला

या सामन्यात बुमराह भारतीय संघाविरुद्ध खेळत होता. टीम इंडियाने इंग्लंड दौऱ्यावर पाठवलेल्या सर्व खेळाडूंना सराव मिळावा म्हणून भारताचे चार खेळाडू स्वत:च्या संघाविरुद्ध खेळत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो की आयपीएल बुमराह हे रोहितचे सर्वात मोठे शस्त्र आहे. पण सराव सामन्यात जेव्हा त्याचा चेंडू रोहितला लागला तेव्हा बुमराहने रोहितची विचारपूस करणे तर दूरच पाहिले देखील नाही.

चेंडू लागल्यानंतर रोहित पिचपासून बाजूला झाला आणि वेदनेने खाली बसला पण बुमराह त्याला न पाहता पुन्हा रनअप घेण्यासाठी गेला. या उटल विकेकीपर असेलल्या ऋषभ पंतने रोहितची विचारपूस केली. रोहितला पाहण्यासाठी फिजिओ मैदानात आल्यावर देखील बुमराह रोहितच्या जवळ आला नाही तो लीसेस्टरशायरच्या खेळाडूंसोबत उभा होता. पंत मात्र रोहितच्या जवळ थांबला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सामन्याच्या पहिल्या दिवशी पावसामुळे ६०.२ षटकांचा खेळ झाला. भारताने ८ बाद २४६ धावा केल्या. रोहितने २५ तर विराटने ३३ धावा केल्या. ८१ धावांवर टीम इंडियाचे ५ फलंदाज बाद झाले होते. त्यानंतर केएस भरतने ७० धावा करत डाव सावरला.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#बमरह #इतक #नरदय #कस #कय #वग #शकत #रहत #वदनन #तडपडत #असतन #पह #कय #कल

RELATED ARTICLES

Sanjay Kute on BJP Politics : देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्याच बेबनाव? ABP Majha

<p>शिवसेनेच्या बंडखोरीत आमदारांसोबत सातत्यानं दिसले ते भाजपचे संजय कुटे.... &nbsp;सुरतपासून शिवसेनेच्या आमदारांसोबत असलेल्या संजय कुटेंनी एबीपी माझाला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिलीए... संजय कुटे हे...

अभिनेता संतोष जुवेकरच्या FBपेजवर अश्लील फोटो; अभिनेत्यानं दिलं स्पष्टीकरण

मुंबई, 2 जुलै : सध्या सोशल मीडिया (Social media) हा जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट सोशल माध्यमांवर शेअर...

Most Popular

मशरूमच्या या फोटोंमध्ये लपलाय एक उंदीर, तुमच्या नजरेला सापडतोय का?

नुकतंच व्हायरल झालेल्या Optical Illusion फोटो असंच काही आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

ओवेसींच्या बालेकिल्ल्यात भाजपाचं शक्तिप्रदर्शन, पंतप्रधानही येणार

मुंबई, 2 जुलै : भारतीय जनता पक्षानं (BJP) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण भारतामधील राज्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे. पक्षाच्या याच तयारीचा भाग म्हणून...

विश्लेषण : भारतात वेगवान गोलंदाज कर्णधार बनणे दुर्मीळ का? | why it is difficult for fast bowler to be captain of indian cricket team...

-प्रशांत केणी सध्या इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या प्रलंबित पाचव्या कसोटी सामन्यासाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराकडे भारताचे कर्णधारपद सोपवण्यात आले. बुमरा हा भारताचा ३६वा कसोटी कर्णधार...

शेणामुळे बनली जोडी! लगेच इम्प्रेस झालं तरुणीचं कुटुंब; तरुणाशी लावून दिलं लग्न

रायपूर, 02 जुलै : असे बरेच तरुण आहेत ज्यांचं काही ना काही कारणामुळे लग्न होत नाही आहे. वय वाढत जातं पण लग्नासाठी मुलगी...

दहा दिवसानंतर एलॉन मस्क पुन्हा ट्विटरवर सक्रिय; शेअर केले ‘हे’ ट्वीट्स

Elon Musk on Twitter : टेस्ला कंपनीचे (Tesla) मालक एलॉन मस्क (Elon Musk) नेहमी त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात....

रक्ताची कमतरता भरून काढण्यापासून ते पचनक्रिया सुधारण्यापर्यंत वाचा काळ्या चण्याचे फायदे

Kala Chana Benefits : भारतीय स्वयंपाकघरात कडधान्यात सहज आढळणारे कडधान्य म्हणजे काळे चणे. सहज उपलब्ध असलेल्या काळ्या चण्यात...