Saturday, May 21, 2022
Home मुख्य बातम्या बिल्डरांकडून वसूल केला जाणारा एलबीटी आणि मेट्रो सेस कर रद्द करावा; बिल्डर...

बिल्डरांकडून वसूल केला जाणारा एलबीटी आणि मेट्रो सेस कर रद्द करावा; बिल्डर संघटनेची मागणी


LBT and Metro: राज्य सरकारकडून स्टॅम्प ड्यूटीच्या माध्यमातून एलबीटी कर तसेच मेट्रो सेसही वसूल केला जात आहे. ही कर वसूली बिल्डरांकडून वसूल केली जात असली तरी राज्य सरकारच्या धोरणानुसार परवडणारी घरे देण्याच्या उद्देशाला हरताळ फासले जात आहे. त्यामुळे एलबीटी आणि मेट्रो सेस कर वसूली रद्द करावी, अशी मागणी कल्याण डोंबिवली एमसीएचआयचे या बिल्डर संघटनेचे (MCHI Builders Association) अध्यक्ष श्रीकांत शितोळे यांनी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एमसीएचआयकडून दरवर्षी प्रॉपर्टी एक्सपोचे आयोजन कल्याणमध्ये केले जाते. या निमित्त माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत एमसीएचआयचे अध्यक्ष शितोळे यांनी  राज्यभरात कुठेही एलबीटी कर वसूल केला जात नाही. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रत स्टॅम्प ड्यूटीच्या  माध्यमातून एक टक्के एलबीटी वसूल केला जातो. त्याचबरोबर गेल्या सात वर्षापासून मेट्रो सेस कराची वसूली केली जात आहे. प्रकल्पाच्या एकूण विकास अधिकार शुल्काच्या रक्कमेत बिल्डरांकडून 2 टक्के मेट्रो सेल वसूल केला जात आहे. वास्तविक पाहता मुंबईत मेट्रो सुरू झालेली आहे. 

ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो मार्गाचे काम ठाण्यात सुरू झालेले आहे. मात्र कल्याणमध्ये मेट्रोचे काम अद्याप सुरूच झालेले नाही. ज्या भागातून मेट्रो जात आहे. त्याठिकाणी मेट्रो सेस वसूल केला पाहिजे. टिटवाळा, डोंबिवली याभागाचा मेट्रोशी काही एक संबंध नाही. त्याठीकाणच्या बिल्डरांकडूनही मेट्रो सेल वसूल केला जात आहे. एलबीटी आणि मेट्रो सेल बिल्डर भरत असले तरी त्यामुळे प्रकल्पाच्या खर्चाची रक्कम वाढत जाते. प्रकल्पाच्या खर्चाची रक्कम वाढल्यास त्याचा लोड अप्रत्यक्षरित्या घर घेणाऱ्या ग्राहकांच्या डोक्यावर येतो. राज्य सरकार एकीकडे परवडणारी घरे द्या, असे म्हटले आहे. एलबीटी आणि मेट्रो सेसच्या कर वसूलीमुळे परवडणाऱ्या घरांच्या राज्य सरकारच्या घोषणोला सरकारच हरताळ फासत आहे. त्यामुळे मेट्रा सेस आणि एलबीटी कर रद्द करावा, अशी मागणी शितोळे यांनी केली आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#बलडरकडन #वसल #कल #जणर #एलबट #आण #मटर #सस #कर #रदद #करव #बलडर #सघटनच #मगण

RELATED ARTICLES

IPL 2022 : दोन कारणांमुळे दिल्ली कॅपिटल्स अडचणीत, आता चूक झाली तर खेळ समाप्त

मुंबई, 21 मे : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील साखळी फेरीचे सामने रविवारी संपणार आहेत. शनिवारी मुंबई इंडियन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स (Mumbai Indians...

मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 180, वडाळा आरटीओ, विजयनगर

BMC Election 2022 Ward 180, Wadala RTO, Vijayanagar : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 180  हा वडाळा आरटीओ, विजयनगर...

चार वर्षांपासून फुटकी दमडीही कमवत नाहीये; आर. माधवननं म्हणून सोडला देश?

या सर्व प्रवासात एक मुद्दा महत्त्वाचा की, माधवनला मागील 4 वर्षांपासून पैसे कमवण्यात सपशेल अपयश आलं आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे...

Most Popular

Flood News : अरे बापरे! 2251 गावे पुराच्या पाण्याखाली, 7.12 लाख लोक प्रभावित

गुवाहाटी : Asaam Flood : आसाममध्ये धोधो पाऊस कोसळला. यामुळे मोठा पूर आला आणि हजारो घरे पुराच्या पाण्यााखाली गेलीत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन...

अश्विनच्या आक्रमणापुढे चेन्नई फेल, विजयानंतर स्वत:ची केली वॉर्नरशी तुलना

मुंबई, 21 मे : राजस्थान रॉयल्सनं (Rajasthan Royals) पॉईंट्स टेबलमधील दुसऱ्या क्रमांकासह आयपीएल 2022 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश मिळवला आहे. राजस्थाननं शुक्रवारी झालेल्या...

Mumbai Water Reduction : मुंबईतील ‘या’ भागांत चार दिवस पाणी कपात

Mumbai Water Reduction : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी. मुंबईत 24 मे ते 27 मे दरम्यान, सकाळी 11 ते दुपारी...

गावस्करांकडून ‘गलती से मिस्टेक’, कॉमेंट्री करताना हे काय बोलून गेले सुनील गावस्कर

खेळाडूवर पत्नीबद्दल अयोग्य कमेंट केल्याबद्दल गावसकर यांच्यावर टीका करण्यात येतेय. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा...

पुढील वर्षीही ‘आयपीएल’ खेळणार!; चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीची स्पष्टोक्ती | Will play IPL next year too Chennai Super Kings captain Mahendra Singh...

पीटीआय, मुंबई : पुढील वर्षीही इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये खेळणार असल्याची स्पष्टोक्ती शुक्रवारी महेंद्रसिंह धोनीने दिली. चेन्नई शहराशी नाते सांगणाऱ्या या संघासाठी...