Saturday, August 13, 2022
Home लाईफस्टाईल बाळाचं पोट भरेल इतकं दूध येण्यासाठी; ‘या’ पद्धतीने करा 'Breast Feeding'

बाळाचं पोट भरेल इतकं दूध येण्यासाठी; ‘या’ पद्धतीने करा ‘Breast Feeding’


नवी दिल्ली,02 ऑगस्ट : मातृत्वाचा सुखद अनुभव पहिल्यांदा घेताना प्रत्येक महिलेला मदतीची गरज असते. नवजात बाळाला सांभाळण्याचा कोणताही अनुभव (Experience) आईला नसतो. बाळाला कसं हाताळावं, स्तनपान (Breast Feeding) कसं करावं यादंर्भात अनेक शंका मनात असतात. बाळ जन्माला आल्यानंतर त्याचा मुख्य आहार (Staple diet) हे आईचं दूध (Mother’s milk) असतं. आईचं दूध पचायला हलकं (Easy to digest) आणि तितकचं पोषक (Healthy) असतं. स्तनपान हे बाळाच्या निरोगी आणि सुदृढ आयुष्यासाठी (For a Healthy Life) महत्त्वाचं असतं. जन्माल्यानंतर बाळ पूर्णपणे आईवर अवलंबून असतं. बाळाची काळजी घेण्याबरोबर स्तनापान करतानाही विषेश लक्ष द्यावं लागतं. पहिले 6 महिने बाळाला केवळ आईचं स्तनपान योग्य मानलं जातं. पण, आईला लहानग्यांना सांभाळण्याचा कोणताही अनुभव नसतो. ज्यामुळे अनेक प्रकारच्या अडचणी येतात.
बाळाला दूध पाजताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याची माहिती आईला नसते. बाळाला कोणत्या प्रकारे स्तनापान करावं. याची योग्य माहिती जाणून घेऊयात.
(तुमची छोटीशी चूक आणि बाथरूम, टॉयलेटमध्येच येईल Heart attack)
स्तनपान कस कराव?
बाळाला दूध पाजताना बाळाचं डोकं आईच्या छातीपेक्षा जास्त वर असावं. म्हणजे सुमारे 45 अंशांच्या कोनात राहील याची काळजी घ्यावी. त्यामुळे शक्यतो बाळाला थोडं बसवून स्तनपान करणं चांगलं. यासाठी बाळाची मान आपल्या हात धरा किंवा आधार द्या.
झोपून स्तनपान करू नका
अनेक स्त्रिया बाळाला झोपून स्तनपान करतात. हा अतिशय चुकीचा पर्याय आहे.  बाळाला झोपवून कधीही स्तनपान करू नका. यामुळे मुलाला कानाच्या इनफेक्शनचा धोका होतो.
(हेल्दी असलं तरी कच्चं सॅलडही आरोग्यासाठी ठरू शकतं हानिकारक कारण…)
लगेच झोपवू नका
बऱ्याच वेळा बाळाला दूध पाजल्यावर लगेचच बेडवर ठेवलं जातं. पण हे बाळासाठी चांगलं नाही. बाळाला दूध प्याजल्यानंतर लगेच अंथरुणावर किंवा मांडीवर झोपू देऊ नका. यामुळे बाळाला दूध पचणार नाही किंवा त्याला उलटी होईल.
खांद्यावर घेऊन पाठ थोपटा
बाळ दूध प्यायल्यावर त्याला खांद्यावर घ्या आणि त्याची पाठण हलकेच चोळा. यामुळे प्यायलेलं दूध घशात राहणार नाही. स्तनपान करताना पोटात गेलेली हवा बाहेर येईल.
(रोज 1 ग्लास मोसंबीचा रस घेतल्याने हाडं होतील मजबूत, निरोगी डोळे आणि..वाचा फायदे)
ढेकर काढा
काही लोक बाळाला स्तनपानानंतर लगेच झोपवतात. त्यामुळे प्यायलेलं दूध श्वासनलिकेत अडकण्याची शक्यता असतं. त्यामुळेच बाळाला झोपेतही उलटी होऊ शकते. त्यामुळे ढेकर काढा. बाळ थोडं मोठं असेल तर, त्याला बसवून ढेकर काढा.
(पोटाचे सगळे आजार बरे करतील चारोळे; दुधाबरोबर ‘या’ पद्धतीने खा)
ब्रेस्ट पंप वापरा
बऱ्याच वेळा असं होतं की काही कारणामुळे आई बाळाला स्तनपान करू शकत नाही किंवा मूल व्यवस्थित स्तनपान करू शकत नाही. अशा परिस्थितीत मुलाला बाहेरचं दूध द्यावं लागतं. बाळाच्या आरोग्यासाठी आईचं दूध खुप महत्वाचं आहे. त्यामुळे बाहेरचं दूध देण्यापेक्षा ब्रेस्ट पंपची मदत घेऊ शकता.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#बळच #पट #भरल #इतक #दध #यणयसठ #य #पदधतन #कर #Breast #Feeding

RELATED ARTICLES

सावधान! या 3 पेयांमुळे तुमचा मेंदू लवकर होऊ शकतो वृद्ध, पाहा कोणती आहेत ती पेय

मुंबई, 13 ऑगस्ट : ज्याप्रमाणे त्वचा, केस आणि शरीराला योग्य पोषण, आहार मिळाला नाही, तर वृद्धत्वाचा परिणाम त्यांच्यावर लवकर दिसून येतो, त्याचप्रमाणे आपला...

प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, प्रकृती नाजूक

न्यूयॉर्क : एका कार्यक्रमासाठी आलेल्या प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये लेखक गंभीर जखमी झाला. त्यांना हेलिकॉप्टरमधून तातडीने रुग्णालयात दाखल...

Most Popular

पुण्यश्र्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर यांची आज पुण्यतिथी; यानिमित्त जाणून घ्या त्यांचे जीवनचरित

Ahilyabai Holkar Death Aniversary : एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण आणि कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar)...

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी लक्ष्मण मुख्य प्रशिक्षक

नवी दिल्ली : राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मणची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे, अशी माहिती ‘बीसीसीआय’चे...

प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, प्रकृती नाजूक

न्यूयॉर्क : एका कार्यक्रमासाठी आलेल्या प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये लेखक गंभीर जखमी झाला. त्यांना हेलिकॉप्टरमधून तातडीने रुग्णालयात दाखल...

घरच्या घरी exercise करताय? ‘या’ चुका करणं टाळा

नियमित वर्कआउट किंवा व्यायाम करण्यापूर्वी आणि नंतर वॉर्मअप करणं खूप महत्वाचं आहे अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

सार्वजनिक ठिकाणी कपल झालं आऊट ऑफ कंट्रोल, व्हिडिओ झाला व्हायरल

सार्वजनिक ठिकाणी प्रेम व्यक्त करणं एका जोडप्याला चांगलंच भोवलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली...

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...