हैदराबाद, 11 ऑगस्ट : पती (Husband) म्हणजे परमेश्वर (Husband is god) असं म्हटलं जातं. किती तरी महिला तसं मानतातही. पण एका महिलेने तर फक्त पतीला परमेश्वर मानलंच नाही तर त्याचं मंदिर बांधून दररोज या पती परमेश्वराला पूजतेही. आंध्र प्रदेशमध्ये (Andhra pradesh) एका बायकोने आपल्या नवऱ्याचं मंदिर (Husband temple) बांधलं आहे. ती दररोज या मंदिरात त्याची पूजा करते (Wife built husband temple).
आंध्र प्रदेशच्या पोडिली मंडालमधील (Podili Mandal) निम्मावरम (Nimmavaram ) गावातील अंकी आणि पद्मावती रेड्डी हे दाम्पत्य गुण्यागोविंदाने नांदत होतं. त्यांचा सुखी संसार सुरू होता. पण चार वर्षांपूर्वी अंकी यांनी आपल्या पत्नी पद्मावतीची साथ अर्ध्यावरच सोडली. ते तिच्या आयुष्यातील कायमचे निघून गेले. एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
हे वाचा – रक्षाबंधनला बहिणीला करा खूश! बघा भेट देण्यासाठी बरेच आहेत पर्याय
नवऱ्याच्या जाण्याने पद्मावती यांच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली. प्रत्येक क्षणाला त्यांची आठवण येत होती. त्यांची कमी जाणवत होती. आपला नवरा आता आपल्यासोबत नाही, या जगातून तो कायमचा निघून गेला आहे यावर त्यांना विश्वासच बसत नव्हता. ते स्वीकारायला त्या तयारच नव्हत्या. आपला नवरा कायम आपल्याला दिसावा, आपल्यासमोर असावा, त्याची साथ आपल्याला लाभावी असं तिला वाटत होतं. यातून पद्मावती यांना नवऱ्याचं मंदिर बांधण्याची कल्पना सुचली.
पद्मावती यांनी मंदिर बांधलं आणि त्यात नवऱ्याची मूर्ती स्थापित केली. इतकंच नव्हे तर त्या दररोज तिथं नवऱ्याच्या मूर्तीची पूजा करतात. दर शनिवारी, रविवारी आणि पौर्णिमेला या मंदिरात विशेष पूजाही असते. नवऱ्याच्या नावाने पद्मावती अन्नदानही करतात.
हे वाचा – ‘बेटा बेटा ना कर, अब तेरा…’, गोड गोड गात सुनेने सासूलाच दिली धमकी; पाहा VIDEO
नवऱ्याच्या मृत्यूनंतर पद्मावती यांनी पती प्रती असलेला आदर आणि प्रेम अशा वेगळ्या पद्धतीने व्यक्त केला आहे. यात त्यांचा मुलगा शिवशंकर रेड्डी आणि मित्र तिरुपती रेड्डी यांचीही साथ, मदत त्यांना मिळाली.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#बयकन #बधल #नवऱयच #मदर #पत #परमशवरच #दररज #पज #करत #पतन