Saturday, November 27, 2021
Home लाईफस्टाईल बापरे.. दुस-या प्रेग्नेंसीत करीना कपूरच्या शरीरात झाला होता ‘हा’ मोठा व विचित्र...

बापरे.. दुस-या प्रेग्नेंसीत करीना कपूरच्या शरीरात झाला होता ‘हा’ मोठा व विचित्र बदल, सैफ अली खानच्या सपोर्टमुळे पडू शकली बाहेर!


गरोदरपणाच्या 9 महिन्यांचा काळ हा खरंच सुंदर असतो पण गरोदरपणाचे काही साईड इफेक्ट्स सुद्धा असतात. या काळात स्त्री इतके बदल अनुभवते जेवढे तिने तिच्या आयुष्यात पूर्वी कधीच अनुभवलेले नसतात. या काळात मूड स्विंग होतात, मळमळ वाढते, पोट खूप जास्त फुगते, सूज येते आणि आपल्याला वाढणारे पदार्थ खाण्याची इच्छा होत नाही असे अनेक चित्र विचित्र बदल दिसून येतात. पण एक बदल असा असतो जो खूप वेगळा असतो आणि फार कमी स्त्रिया त्याबाबत सांगतात.

तो बदल म्हणजे सेक्स ड्राईव्ह (sex drive) कमी होणे होय. करीना कपूर खानने (kareena kapoor khan) नुकत्याच एका मुलाखती मध्ये याबाबत उघडपणे सांगितले. याबद्दल तिचे खरेच कौतुक! आज आपण याच बदलाबाबत आणि गरोदरपणात सेक्स ड्राईव्ह का कमी होते त्याबाबत जाणून घेणार आहोत.

करीना कपूरची गोष्ट

करीनाने नेहमीच आपली प्रेग्नन्सी, पॅरेंटिंग आणि सिलेब पॅरेंटिंग बाबत उघडपणे चर्चा केली आहे आणि तिने यात हे सुद्धा सांगितले की कशा प्रकारे प्रेग्नेंसीचा परिणाम तिच्या सेक्स ड्राईव्ह वर झाला. करीनाची काहीच महिन्यांपूर्वी दुसरी डिलिव्हरी झाली आहे आणि नुकतेच तिने आपले एक पुस्तक ‘प्रेग्नन्सी बायबल’ सुद्धा लॉन्च केले आहे. या पुस्तकामध्ये करीनाने तिला दोन्ही गरोदरपणात आलेले अनुभव आणि तिला मिळालेली शिकवण याबद्दल वर्णन केले आहे. इंस्टाग्राम वर बुक लॉन्च वेळी तिने आपले हार्मोन्स आणि मूड बद्दल सांगितले तसेच हे सुद्धा स्पष्ट केले की दोन्ही गरोदरपणात काय वेगवेगळे होते.

(वाचा :- Age and fertility : आता वयाच्या 40शी नंतर सुद्धा सहज बनू शकता आई-बाबा, फक्त ‘ही’ माहिती असणं आहे अत्यंत गरजेचं!)

सेक्स ड्राईव्ह झाली कमी

आपल्या पुस्तकामध्ये करीना कपूरने सांगितले की गरोदरपणात इमोशन्स मध्ये सुद्धा खूप चढ उतार पाहायला मिळतात आणि त्याचाच परिणाम म्हणून सेक्स ड्राईव्ह मोठ्या प्रमाणावर कमी होते. तिच्या मते पहिल्या गरोदरपणापेक्षा दुसऱ्या गरोदरपणात तिला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली आणि त्या गरोदरपणात तिला आपली सेक्स ड्राईव्ह जेवढी कमी झाल्याचे आढळले नाही त्यापेक्षा जास्त सेक्स ड्राईव्ह या वेळेस कमी झाल्याचे आढळले. करीनाला मध्येच अमेझिंग आणि सेक्सी फील व्हायचे तर मध्येच तिला आपल्या बेबी बंप बाबत अनकम्फर्टब्ल वाटायचे.

(वाचा :- Shilpa Shetty Yoga : शिल्पा शेट्टी प्रेग्नेंसीनंतर होती ‘या’ वेदनादायी समस्येने त्रस्त, असा केला घरच्या घरी फ्री मध्ये उपचार!)

करीनाला काय प्रॉब्लेम होता?

पहिल्या तिमाही पासून ते शेवटच्या महिन्यांपर्यंत स्त्रियांच्या सेक्स ड्राईव्ह मध्ये बदल दिसून येतो. या वेळेस हार्मोन लेव्हल बदलत असते आणि खूप जडपणा वाटत असतो. स्ट्रेस सह शारीरिक लक्षणांचा परिणाम सेक्स ड्राईव्ह वर अधिक दिसून येतो. गरोदरपणात वेगवेगळ्या वेळेस लिबिडो वाढू शकते. गरोदर झाल्यानंतर अनेक स्त्रियांच्या लैंगिक इच्छा बदलतात. पण असे झाल्यास चिंता करण्याचे कारण नाही कारण असे होणे अत्यंत नॉर्मल आहे. सर्वच स्त्रियांमध्ये हा बदल दिसून येतो, जो पूर्णपणे नैसर्गिक आहे.

(वाचा :- Pregnancy Heart Attack : सावधान.. प्रेग्नेंसीमध्ये येऊ शकतो ‘या’ कारणामुळे हार्ट अटॅक, जीवघेण्या आजारापासून दूर राहण्यासाठी गर्भवतींकडे आहे हा एकच पर्याय!)

नवऱ्याने केला सपोर्ट

करीना कपूरने सांगितले की दुसऱ्या गरोदरपणात तिला अनेक समस्या जाणवल्या. सतत तिला मूड स्विंग व्हायचं. अशावेळी सैफ अली खानने तिला खूप समजून घेतले. प्रत्येक प्रकारे त्याने तिला सांभाळले आणि सपोर्ट केला. तिने सांगितले की शेवटच्या दोन महिन्यांत तर तिला खूप थकवा जाणवत होता आणि अनेकदा तर ती उठू सुद्धा शकत नव्हती. अशावेळेस तिच्या प्रत्येक मदतीला सैफ अली खान धावून यायचा. त्याने तिच्यावर कोणत्याच प्रकारचा प्रेशर टाकला नाही. शिवाय त्याने तिला कधीच म्हटले नाही की तू सुंदर दिसत नाही आहेस. तो नेहमी तिची स्तुती करायचा आणि त्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढायचा.

(वाचा :- Pregnancy Yoga : वयाच्या 40शीत या अभिनेत्रीकडे आहे गोड बातमी, तिचं डेली रूटीन व योगाभ्यास व्हिडिओ आई होणा-या मुलींना बनवू शकतं हेल्दी व सुपर मॉम!)

आता सगळं आहे नॉर्मल

करीना कपूर म्हणते की हा बदल केवळ गरोदरपणा पुरताच असतो. गरोदरपणाचा काळ संपला की सगळं काही नॉर्मल होतं. पण या काळात नवऱ्याने समजून घेणे खूप गरजेचे असते. तो जर सपोर्ट देणारा नसेल तर हा काळ अत्यंत कठीण जाऊ शकतो. प्रत्येक वेळी तो सोबत असणे, त्याने समजून घेणे, हवं नको ते बघणे यामुळे मनाला एक आधार मिळतो आणि आपल्या सोबत कोणीतरी आहे ही फिलिंग येते. यामुळे गरोदरपणात शांत आणि समाधानी राहण्यास मदत मिळते.

(वाचा :- World breastfeeding week : विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चनने शेअर केला तिचा ब्रेस्टफीडिंग एक्सपीरियंस, मीडियाने उठवलेल्या ‘या’ अफवांनंतरही एन्जॉय केलं Motherhood!)अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#बपर #दसय #परगनसत #करन #कपरचय #शररत #झल #हत #ह #मठ #व #वचतर #बदल #सफ #अल #खनचय #सपरटमळ #पड #शकल #बहर

RELATED ARTICLES

Stop It डॅड’ फोटोवेड्या बापावर खेकसला आर्यन खानचा मित्र; VIDEO होतोय VIRAL

मुंबई, 27 नोव्हेंबर-   बॉलिवूड  (Bollywood)   अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं   (Aryan Khan)  क्रूझ ड्रग्स प्रकरणर चांगलंच गाजलं आहे. यामध्ये झालेल्या अनेक...

दिंडीत पिकअप घुसला, 15 ते 20 वारकरी जखमी, पुण्यातील वडगाव मावळनजीकची घटना

Pune Accident News Update : कार्तिकी एकादशीसाठी येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचा अपघात झाला आहे. मावळ तालुक्यात हा अपघात आज...

भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेची सिरीज होणार की नाही; BCCIने दिली मोठी अपडेट

मुंबई : भारत पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात संघाला तीन सामन्यांची कसोटी, एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची...

Most Popular

Good Health Care Tips: जास्त पाणी प्यायल्याने होऊ शकतात ‘हे’ आजार

Health Care Tips: निरोगी राहण्यासाठी शरीराला हायड्रेट ठेवणे गरजेचे असते. पाणी कमी प्यायल्याने अनेक आजार होऊ शकतात. आपल्या...

Corona च्या नव्या स्ट्रेनला WHO नं दिलं नाव, म्हणाले…

जिनेव्हा, 27 नोव्हेंबर: कोरोना व्हायरस (Corona Virus) पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहे. कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटनं सर्वांचीच चिंता वाढवली आहे. जागतिक...

ST Workers Strike : एसटी संप सुरु ठेवल्यास वेतनवाढही रद्द करण्याचा परिवहनमंत्री अनिल परब यांचा इशारा

<p>वेतनवाढीनंतरही अनेक एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्या एसटी कर्मचाऱ्यांना परिवहनमंत्री अनिल परब यांनी गर्भित इशारा दिलाय. वेतनवाढ केल्यानंतर संप सुरुच ठेवणार असाल...

कान स्वच्छ करण्यासाठी चुकूनही वापरू नका बड्स; त्याऐवजी या सोप्या ट्रिक्स वापरा

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर : अनेकदा लोक कान स्वच्छ करण्यासाठी बड्सचा वापर करतात. परंतु, कानांविषयीच्या तज्ज्ञांच्या मते, असं करणं कानासाठी धोकादायक ठरू शकतं....

यशस्वी-अरमानमुळे मुंबईचा पाचवा विजय

यशस्वी जैस्वाल (७६ चेंडूंत ७८ धावा) आणि कर्णधार अरमान जाफर (१०२ चेंडूंत ७९) यांच्यामुळे मुंबईने २५ वर्षांखालील राष्ट्रीयस्तरीय एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत सलग पाचवा...

अमित शहा-फडणवीसांच्या बैठकीत शरद पवार? राष्ट्रवादीकडून ‘त्या’ फोटोचा पर्दाफाश

मुंबई, 26 नोव्हेंबर : विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री...