Friday, May 20, 2022
Home भारत बहिणीच्या 8 वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या; SC कडून आरोपीच्या शिक्षेत...

बहिणीच्या 8 वर्षीय मुलीवर बलात्कार करून हत्या; SC कडून आरोपीच्या शिक्षेत बदल


नवी दिल्ली, 14 मे: सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) एका प्रकरणात आपला निर्णय बदलला आहे. शुक्रवारी सुप्रीम कोर्टानं मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) आपल्या चुलत बहिणीच्या 8 वर्षीय मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करणाऱ्या एका आरोपीची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली आहे. ही घटना 2014 ची आहे. सुप्रीम कोर्टानं आपल्या टिप्पणीत म्हटलं आहे की, हा गुन्हा ज्या पद्धतीनं केला गेला तो भयानक आणि भीषण होता.पण ते ‘रेरेस्ट ऑफ रेअर केसेस’ या श्रेणीत येत नाही.

न्यायमूर्ती एएम खानविलकर, दिनेश माहेश्वरी आणि सीटी रविकुमार यांच्या खंडपीठाने फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली आणि सांगितले की, 30 वर्षे तुरुंगात घालवण्यापूर्वी त्याला कोणत्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाही.

सुप्रीम कोर्टाच्या 3 न्यायाधीशांच्या खंडपीठानं सांगितलं की, या प्रकरणात एक अल्पवयीन 8 वर्षांची मुलगी, जी दुसरी तिसरी नसून आरोपीच्या चुलत बहिणीची मुलगी होती. बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आली. रेकॉर्डवरील पुराव्यावरून ही घटना अत्यंत क्रूर असल्याचं दिसून येतं. स्वामी श्रध्दानंदच्या बाबतीत निवाड्यात अवलंबलेली प्रक्रिया आणि श्रीहरनच्या बाबतीत पुनरावृत्ती झालेली पद्धत या प्रकरणात पाळली जावी असं आमचं मत आहे. दुसऱ्या शब्दात, फाशीच्या शिक्षेत बदल करूनही अपीलकर्त्याला मुदतपूर्व सुटका/माफीच्या तरतुदींचा वापर न करता पुरेशा कालावधीसाठी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात यावी.

सुप्रीम कोर्टानं आपल्या टिप्पणीत काय म्हटलं?

अशा प्रकारे सुप्रीम कोर्टानं दोषीला आयपीसी कलम 302 अंतर्गत दंडनीय गुन्ह्यासाठी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सुप्रीम कोर्टानं दोषीला 30 (तीस) वर्षांच्या कालावधीसाठी वास्तविक कारावासाची शिक्षा सुनावली आणि त्यापूर्वी सुटका/माफीच्या तरतुदी लागू होणार नाहीत असं सांगितलं. कोर्टानं निरीक्षण केलं की दोषीचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नव्हता आणि तो गरीब सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीचा होता हे सत्य आहे. शिक्षा सुनावताना तुरुंगातील त्याचे निर्दोष वर्तनही विचारात घेतले गेले.

Delhi Mundka Fire: ‘त्या’ एका WhatsApp मेसेजनं वाचवले 100 लोकांचे प्राण,नाहीतर…

सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, गुन्हा करताना दोषीचं वय 25 वर्षे होतं ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे वरील बाबी लक्षात घेऊन अपीलकर्त्याच्या सुधारणेची आणि पुनर्वसनाची शक्यता नाकारण्याचे कोणतेही कारण आम्हाला दिसत नाही. या चर्चेचा लांबलचक आणि छोटासा मुद्दा असा आहे की, सध्याच्या खटल्याला ‘रेरेस्ट ऑफ रेअर केसेस’ या श्रेणीत ठेवता येणार नाही, ज्यामध्ये फाशीची शिक्षा देण्याशिवाय पर्याय नाही. या खटल्यात त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, त्याविरोधात त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.

Published by:Pooja Vichare

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#बहणचय #वरषय #मलवर #बलतकर #करन #हतय #कडन #आरपचय #शकषत #बदल

RELATED ARTICLES

6 महिने कंबरदुखीने होता हैराण; डॉक्टरांना रुग्णाच्या किडनीत सापडले…

हैदराबाद, 20 मे : प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी कंबरदुखीचा त्रास हा होतोच. अतिरिक्त काम, कंबरेवर ताण, झोपेच्या स्थितीमुळे कंबर दुखत असावी असं...

सदाभाऊ खोतांच्या ‘जागर शेतकऱ्याचा, आक्रोश महाराष्ट्राचा’ अभियानाचा आज समारोप, फडणवीसांची सभा

Devendra Fadnavis : शेतकरी प्रश्नासंदर्भात सरकारला जाग येण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी 'जागर...

काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकर यांना राज्यसभा उमेदवारीच्या चर्चांवर वंचित बहुजन आघाडीने म्हटलं..

मुंबई : काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवारीची माळ प्रकाश आंबेडकर यांच्या गळ्यात पडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असतानाच वंचित...

Most Popular

सदाभाऊ खोतांच्या ‘जागर शेतकऱ्याचा, आक्रोश महाराष्ट्राचा’ अभियानाचा आज समारोप, फडणवीसांची सभा

Devendra Fadnavis : शेतकरी प्रश्नासंदर्भात सरकारला जाग येण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी 'जागर...

IPL 2022 : विराटने गुजरातला धुतलं, तरी मुंबईच ठरवणार RCB चं भवितव्य!

मुंबई, 19 मे : आयपीएल 2022 मध्ये (IPL 2022) करो या मरो सामन्यात आरसीबीने गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans vs RCB) 8 विकेटने पराभव...

कांद्याने केला पुन्हा वांदा, देशातील कांदा उत्पादक पुन्हा संकटात; दरात मोठी घसरण

मुंबई, 19 मे : किमान आधारभूत किमतीपेक्षा (msp) 2-4 रुपये किलोने अधिक भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना चांगले दिवस आल्याचे चित्र दिसत आहे परंतु हे...

केतकीला समज देऊन सोडून दिलं पाहिजे, पंकजा मुंडेंचा राष्ट्रवादीला सल्ला

मुंबई, 19 मे -राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे ( Ketaki Chitale Case...

20 मे दिनविशेष, जाणून घ्या इतिहासातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घटना

20th May 2022 Important Events : मे महिना सुरू झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व...

प्राजक्ताचा रानबाजार नंतरचा ‘तो’ फोटो चर्चेत, फॅन्स विचारत आहेत, ‘ आता हे काय ‘

मुंबई, 19 मे- अभिनेत्री प्राजक्ता माळी( Prajakta Mali ) आणि तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) यांची मुख्य भूमिका असलेला ‘रानबाजार’ या (RaanBaazaar Trailer) वेबसिरीरीजचा...