एका संशोधनानुसार, सोशल मीडियाचा सतत वापर केल्यामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. काही मुलांच्या नैराश्येसाठी सोशल मीडिया जबाबदार ठरू शकतं. याच कारणामुळे करीना कपूर खान बहिण करिश्मा कपूरच्या मुलीवर प्रचंड भडकली होती. करीनाने एका मुलाखतीमध्ये याबाबत सांगितलं होतं. करीनाचं भडकण्या मागचं कारण नेमकं काय होतं हे जाणून घेऊया.
(फोटो सौजन्य – इंडिया टाइम्स)
समायराला करीनाने दिला सल्ला

करीना कपूर खान आणि करिश्मा कपूर या बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध बहिणींचं नातं कसं आहे हे साऱ्यांनाच ठाऊक आहे. दोघी अगदी एकजूटीने राहतात. करीना करिश्माच्या मुलीला देखील अगदी हक्काने ओरडते, चांगला सल्ला देते. एका मुलाखतीमध्ये याबाबत तिने खुलासा केला होता. करीनाने सांगितलं होतं की, समायरा सतत सोशल मीडियावर असते. पूर्ण दिवसभर तिचं सोशल मीडिया हाताळणं सुरुच असतं. मी करिश्माला सांगितलं होतं की समायराच्या सोशल मीडियाच्या वापरावर आताच नियंत्रण आणणं गरजेचं आहे.’ खरं तर समायरा अजून वयाने लहान असल्यामुळे करीना तिला ओरडली होती आणि मोलाचा सल्ला दिला होता.
(‘या’ एका मुलीमुळे उद्धवस्त झालं होतं इमरान हाश्मीचं आयुष्य, परिस्थिती बिकट होती पण…)
कोणत्या गोष्टीवर होतो सर्वाधिक परिणाम?

करीना पुढे सांगते की, ‘जेव्हा आपण सोशल मीडियाचा अतिरिक्त किंवा सतत वापर करत असतो तेव्हा पुस्तक वाचणे, खिडकीमधून बाहेर डोकावून पाहणे, कुटुंबातील लोकांशी संवाद साधणे, मित्र-मंडळींबरोबर अधिकाधिक एकत्रित वेळ घालवणे या सगळ्या गोष्टी करणं विसरून जातो. स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जातो. मात्र याचा परिणाम नात्यांवर होण्यास सुरुवात झाली आहे.’ करीनाने करिश्माच्या मुलीला दिलेला सल्ला तुम्ही तुमच्या मुलांना देणं देखील गरजेचं आहे.
(…म्हणूनच दोन वेळा मोडला ट्विंकल खन्नाचा साखरपुडा, ‘या’ कारणामुळे अक्षय कुमारने तिच्याशीच केलं लग्न)
अधिक नुकसान

सोशल मीडियावर एका क्लिकमुळे जगभरातील माहिती देखील मिळवता येते. सोशल मीडियामुळे तुम्ही छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये अपडेट राहता. पण सतत याचा वापर केल्यामुळे आरोग्यावर देखील परिणाम होऊ शकतो. तसेच सोशल मीडियाच्या अति वापरामुळे तुमच्या विचारांमध्येही बदल घडून येऊ शकतात. म्हणूनच सोशल मीडियाचे फायदे कमी आणि यामुळे होणारं नुकसान अधिक आहे. सोशल मीडियामुळे कमी वयातील मुलांच्या मनावर देखील परिणाम होऊ शकतो. ही गोष्ट करीनाला चांगलीच ठाऊक आहे. म्हणूनच समायराबाबतीत तिला काळजी वाटते. पालकांनी देखील आपल्या मुलांच्या काही गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे.
(रेखा यांच्या कपाळावरील कुंकू पाहून ढसाढसा रडू लागल्या जया बच्चन, अमिताभही होते पण…)
कुटुंबियांबाबत वेगळा विचार

करीनाच्या म्हणण्यानुसार, तिने कित्येक वर्ष सोशल मीडियाचा वापर केला नाही. यामागील कारण म्हणजे यामुळे तुम्ही तुमच्या जवळच्या माणसांना वेळ देऊ शकत नाही. एनसीबीआय (National Center for Biotechnology Information) या वेबसाइटवर प्रकाशित केलेल्या एका रिपोर्टनुसार, लहान मुलांपासून ते मोठ्या वयोगटातील व्यक्तींपर्यंत सोशल मीडियाचा अति वापर चिंतेचं कारण ठरू शकतं. यामुळे मानसिक आरोग्य तर बिघडतच. पण त्याचबरोबरीने कुटुंबातील एखादी व्यक्ती तुम्हाला सतत यावरून बोलत असेल तर तुम्ही त्या व्यक्तीचा राग करू लागता. सोशल मीडियाचा परिणाम सर्वाधिक नात्यांवर होत असल्याचं सध्या दिसून येत आहे.
(सगळं सुरळीत सुरू असताना झाला घटस्फोट, बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध कपलच्या नात्यामध्ये का पडली फूट?)
नात्यावर परिणाम होतोय?

फक्त कमी वयामधील मुलांमध्येच नव्हे तर प्रत्येक वयोगटातील व्यक्तींमध्ये सोशल मीडियाची क्रेझ आहे. काही जणं तर तासन् तास याचा वापर करत असतात. रात्री उशीरापर्यंत देखील बहुतांश लोकं मोबाईलचा वापर करत असतात. यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही. त्याचबरोबरीने झोप पूर्ण न झाल्यामुळे इतर कामांमध्ये सहभागी होणं देखील शक्य होत नाही. सध्याच्या काळामध्ये सोशल मीडियाचं ज्ञान असणं गरजेचं आहे. पण लक्षात ठेवा याचा वापर करण्यास देखील काही मर्यादा आहेत. पती-पत्नीच्या नात्यामधील दुराव्याचं कारण सोशल मीडिया देखील आहे. तसेच बऱ्याच पालकांचं त्यांच्या मुलांशी भांडण सोशल मीडियामुळेच होतं.
(मुलाचं प्लॅनिंग कधी? विचित्र प्रश्नांमुळे हैराण झालेल्या अभिनेत्रीने व्हिडिओ शेअर करत दिलं सडेतोड उत्तर)
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#बहणचय #मलवर #क #भडकल #करन #कपर #करण #अस #क #बबसमर #सगळयचच #झल #बलत #बद