Saturday, August 20, 2022
Home क्रीडा बर्मिंगहॅम कसोटी मिस करू नका, क्रिकेटची ही दिग्गज जोडी पुन्हा दिसणार नाही

बर्मिंगहॅम कसोटी मिस करू नका, क्रिकेटची ही दिग्गज जोडी पुन्हा दिसणार नाही


मुंबई :विराट कोहली विरुद्ध जेम्स अँडरसन यांच्यातील लढत कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम लढत मानली जाते. टीम इंडियाच्या २०१४ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर असताना अँडरसनने विराटला खूप त्रास दिला होता, त्यानंतर २०१८ मध्ये विराटने अँडरसनशी हिशोब चुकता केला. २०२१ मध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत विराट आणि अँडरसन यांच्यात जोरदार लढत झाली. आजपासून पाचवा कसोटी सामना खेळवला जाणार असताना या मालिकेतील चार कसोटी सामनेच झाले. पण, अँडरसनचे वय लक्षात घेता, विराट आणि त्याच्यातील इंग्लंडमधील ही शेवटची लढत असल्याचे मानले जात आहे.

वाचा – वनडे आणि टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; जाणून घ्या कोण आत, कोण बाहेर

कोहली विरुद्ध अँडरसन हेड टू हेड
कसोटी क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर विराट कोहलीने जेम्स अँडरसनच्या ६८१ चेंडूंचा सामना केला आहे आणि या काळात त्याने २९७ धावा केल्या आहेत. दोघांमध्ये अँडरसन अनेकदा विराटवर वरचढ ठरला असून भारतीय फलंदाज सात वेळा त्याचा बळी ठरला आहे. विराटने अँडरसनविरुद्ध ४२.४ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. मालिकेतील पहिल्या चार कसोटी सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर अँडरसनने एकूण १५ विकेट घेतल्या आहेत, तर विराट कोहलीने २१८ धावा केल्या आहेत. आता पाचव्या कसोटीत दोघे एकमेकांना कसे सामोरे जातात आणि कोण कोणावर वरचढ ठरेल हे पाहणे मनोरंजनक ठरेल.

वाचा – बर्मिंगहॅम कसोटी: मैदानात उतरण्याआधीच टीम इंडियाला दिसतोय पराभव; हे आहे कारण

विराटची प्रतीक्षा संपणार?
विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील रिकी पाँटिंगच्या ७१ शतकांची बरोबरी करण्यापासून फक्त एक शतक दूर आहे. विराटने आपले शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक नोव्हेंबर २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध दिवस/रात्र कसोटीत झळकावले होते. त्यानंतर तो तिहेरी धावसंख्या गाठण्यात संघर्ष करत आहे. कसोटीत २७ शतके झळकावणाऱ्या विराटने लिसेस्टरशायर काऊंटी संघाविरुद्धच्या सराव सामन्यात आपला दम दाखवला आणि आपल्या आवडत्या प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध शतकाची प्रतीक्षा संपवेल अशी अपेक्षा आहे.

वाचा – Breaking News … रोहित शर्माकडे भारतीय संघाचे नेतृत्व, बीसीसीआयने दिली मोठी माहिती

जेम्स अँडरसन घेईल परीक्षा
विराटच्या मार्गात सर्वात मोठा अडथळा इंग्लिश वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन असू शकतो, ज्याने त्याला २०१२ पासून कसोटी क्रिकेटमध्ये सात वेळा बाद केले आहे. २०४ च्या दौऱ्यावर अँडरसनने कोहलीला फक्त १९ धावा करू दिल्या आणि त्याला चार वेळा माघारी धाडलं, पण २०१८ च्या दौऱ्यावर कोहलीने या वेगवान गोलंदाजाला एकदाही त्याची विकेट दिली नाही आणि त्याच्या चेंडूत एकूण ११४ धावा केल्या.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#बरमगहम #कसट #मस #कर #नक #करकटच #ह #दगगज #जड #पनह #दसणर #नह

RELATED ARTICLES

धक्कादायक! तुम्ही खात असलेल्या खेकडे आणि माशांचीही होतेय Corona test

मुंबई : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतेय. दरम्यान यामध्येच आता कोविडचा प्रसार समुद्रातून येणाऱ्या मासे आणि खेकड्यांमुळे होत असल्याचा संशय...

Breast Cancer : AstraZeneca कंपनीचं स्तनाच्या कर्करोगावरील औषध भारतात येणार, DCGI ची परवानगी

DGCI Give Approval For Breast Cancer Medicine : महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) ही एक मोठी समस्या आहे....

तुम्हालाही रुद्राक्ष धारण करायला आवडते? मग या गोष्टींची घ्या विशेष काळजी

<!-- --><!-- -->Do you also like to wear Rudraksh? Then take special care of these things mhpj - तुम्हालाही रुद्राक्ष धारण...

Most Popular

आता UKमध्येही सुरू होणार UPI सेवा! हजारो भारतीय विद्यार्थांना होणार फायदा

मुंबई, 19 ऑगस्ट: यूपीआयच्या माध्यमातून भारतात डिजिटल इंडिया अभियानाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये यूपीआय आयडी किंवा कोड स्कॅन करण्याच्या...

भुतियाचा भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज

नवी दिल्ली : भारताचा माजी फुटबॉल कर्णधार बायच्युंग भुतियाने सध्या चर्चेत असलेल्या अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) निवडणुकीत थेट अध्यक्षपदासाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज...

CM Eknath Shinde Dahi handi Special Report : जिथे जिथे हंडी, तिथे तिथे मुख्यमंत्री!

<p>CM Eknath Shinde Dahi handi Special Report : जिथे जिथे हंडी, तिथे तिथे मुख्यमंत्री! शिंदे गट आणि भाजपकडून दहीहंड्या हायजॅक</p> अस्वीकरण: ही कथा किंवा...

तुम्हालाही रुद्राक्ष धारण करायला आवडते? मग या गोष्टींची घ्या विशेष काळजी

<!-- --><!-- -->Do you also like to wear Rudraksh? Then take special care of these things mhpj - तुम्हालाही रुद्राक्ष धारण...

Breast Cancer : AstraZeneca कंपनीचं स्तनाच्या कर्करोगावरील औषध भारतात येणार, DCGI ची परवानगी

DGCI Give Approval For Breast Cancer Medicine : महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) ही एक मोठी समस्या आहे....

रोनाल्डो डॉर्टमंडकडे?

वृत्तसंस्था, लंडन : नामांकित फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो जर्मनीतील बोरुसिया डॉर्टमंड क्लबशी करारबद्ध होणार असल्याची शुक्रवारी फुटबॉलजगतात जोरदार चर्चा झाली. अर्थात, या संदर्भात अजून...