Thursday, July 7, 2022
Home मुख्य बातम्या बंद असलेल्या रिसॉर्टचे सांडपाणी समुद्रात जाते यावरुन ईडीची कारवाई: अनिल परब

बंद असलेल्या रिसॉर्टचे सांडपाणी समुद्रात जाते यावरुन ईडीची कारवाई: अनिल परब


मुंबई: दापोलीतील बंद असलेल्या रिसॉर्टमधून सांडपाणी हे समुद्रात जात असल्याचं कारण देत ईडीने आज आपल्यावर कारवाई केली, यामध्ये मनी लॉंड्रिंगचा संबंध नाही अशी माहिती राज्याचे मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. दापोलीतील रिसॉर्ट हे सदानंद कदम यांच्या मालकीचे असून त्याच्याशी माझा काही संबंध नाही असंही अनिल परब म्हणाले. 

अनिल परब म्हणाले की, “आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी माझ्यावर आणि माझ्याशी संबंधित छापेमारी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून या अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या. दापोलीचे साई रिसॉर्ट हे सदानंद कदम आहेत, तसा दावा त्यांनी कोर्टात केला आहे, तसे सर्व कागदपत्रे ही त्यांनी जमा केली आहेत. हे रिसॉर्ट अजून सुरू झालं नाही. तरीही या रिसॉर्टमधून पाणी हे समुद्रात जात असल्याचा आरोप करत केंद्रीय पर्यावरण खात्याने तक्रार केली. त्याच तक्रारीवरुन ईडीची आजची कारवाई आहे. हे रिसॉर्ट सुरूच नाही तर कारवाई कशी केली जाते हा प्रश्न आहे.” 

अनिल परब म्हणाले की, “ईडीने विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिले आहेत. या आधीही उत्तरं दिली आहेत, आजही सर्व उत्तरं दिली आहेत. बंद असलेल्या रिसॉर्टचे पाणी समुद्रात जात आहे असा आरोप करुन कारवाई केली जात आहे. यावर आता मनी लॉड्रिंगचा मुद्दा येतोय कुठे? या संबंधी आपण न्यायालयात भूमिका मांडू.”

तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर ईडीचे पथक राज्याचे मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानावरून बाहेर पडले आहे. त्या आधी एक तास वांद्रे येथील अनिल परब यांच्या निवासस्थानातून ईडीचे एक पथक बाहेर पडलं होतं. आज सकाळीच ईडीच्या पथकाने अनिल परब यांच्याशी संबंधित सात ठिकाणी छापेमारी केली होती. 

आज सकाळी ईडीने अनिल परब यांचे शासकीय निवास्थान ‘अजिंक्यतारा’ आणि वांद्रेतील खासगी निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर छापा मारला आहे. आज सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास ईडीने छापा मारला. या  कारवाईमध्ये ईडीचे वरिष्ठ अधिकारीदेखील सहभागी आहेत. अनिल देशमुख यांच्या तपासातील मुख्य तपास अधिकारी ईडीचे  सह-संचालक तासीन सुलतानदेखील अनिल परब यांचे शासकीय निवासस्थान ‘अजिंक्यतारा’ येथे चौकशीसाठी आले होते. 

 ईडीकडून या ठिकाणी छापा

1. अजिंक्यतारा, शासकीय निवासस्थान, मंत्रालयाजवळ
2. मोनार्क इमारत, खासगी निवास्थान, वांद्रे पूर्व
3.  अनिल परबांशी संबंधित चेंबूरच्या एका बांधकाम व्यावसायिकाच्या घरी इडी छापे.
4. दापोलीतील साई रिसॉर्ट
5. दापोलीतील जमीन अनिल परबांना विकणारे विभास साठे यांच्या कोथरुड येथील घरी
6. दापोलीतील जमिन अनिल परबांना विकणारे विभास साठे यांचे कोथरुडमधील कार्यालय

 

 

 अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#बद #असललय #रसरटच #सडपण #समदरत #जत #यवरन #ईडच #करवई #अनल #परब

RELATED ARTICLES

कोच बदलल्यानंतर टीम इंडियाची कामगिरीही बदलली, राहुल द्रविड का आलाय निशाण्यावर?

मुंबई, 6 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्टमध्ये टीम इंडियाची (India vs England 5th Test) कामगिरी निराशाजनक झाली आहे. चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडला विजयासाठी 378...

एक-दोन नाही 38 खून मीच केले’; जामकरसमोर कबुली देणाऱ्या अजितची नवी खेळी?

मुंबई 6 जुलै: झी मराठीवरील (Zee Marathi) देवमाणूस 2 (Devmanus 2) ही मालिका सध्या वेगवेगळ्या ट्विस्टने भरून गेली आहे. एकीकडे डिम्पल आणि डॉक्टर...

पीटी उषा, इलैयाराजांसह 4 दिग्गज राज्यसभेत, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली, 6 जुलै : भारताची महान ऍथलीट पीटी उषा (PT Usha) यांची राज्यसभा खासदार (Rajya Sabha Nominated) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे....

Most Popular

मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस, नागरिकांना सतर्कतेचा इशारा, पुढचे पाच दिवस सर्वदूर पावसाचा अंदाज 

Maharashtra Mumbai Rain Live  : जून महिन्यात उघडीप दिलेल्या पावसाचा जुलै महिन्यात चांगलाच जोर  वाढला आहे. मागच्या दोन दिवसापासून राज्याच्या विविध भागात जोरदार...

Weight Loss Story : 68 किलोवर पोहचलं होतं वजन, ‘ही’ साधीसोपी ट्रिक वापरून फक्त 4 महिन्यांत घटवलं तब्बल 18 किलो वजन, पाणी पिऊन केली...

वजन वाढणे ही खरोखरच लाजिरवाणी गोष्ट आहे. यामुळे स्वतःलाच जगण्यात रस राहात नाही. रांची येथील पल्लवी पाठक या २२ वर्षीय विद्यार्थिनीची हीच परिस्थिती...

आपला मेंदू शरीरापेक्षा जास्त गरम असतो; पुरुष की महिला कोणाचं डोकं जास्त तापतं?

मुंबई, 6 जुलै : निसर्गाने निर्माण केलेली जगातील सर्वात गुंतागुंतीची गोष्ट बहुधा मानवी मेंदू (Human Brain) असेल. यावर अनेक सखोल संशोधन करूनही आत्तापर्यंत...

Kaali पोस्टरला ट्विटरचा दणका; भारताच्या विनंतीवर पोस्टर हटवले

मुंबई, 06 जुलै:  काली ( Kaali) या डॉक्युमेंट्री सिनेमाच्या पोस्टरचा वाद काही दिवसांपासून पाहायला मिळतोय.  निर्माती लीना मणिमेकलाई (Leena Manimekalai)  हिच्या काली या...

Birthmark: जन्मजात शरीरावरील खुणांचे असते विशेष महत्व; म्हणून लकी ठरतात ही माणसं

मुंबई, 06 जुलै : काही लोकांच्या शरीरावर जन्मापासूनच काही खुणा दिसतात, ज्याला आपण जन्मखूणही म्हणतो. हे जन्मचिन्ह काहीही असू शकते. शरीरावर दिसणार्‍या काही...