Monday, July 4, 2022
Home भारत बंडखोर आमदार थांबलेल्या गुवाहाटीतील हॉटेल रॅडिसनबाहेर तृणमुल काँग्रेसचं आंदोलन

बंडखोर आमदार थांबलेल्या गुवाहाटीतील हॉटेल रॅडिसनबाहेर तृणमुल काँग्रेसचं आंदोलन


गुवाहाटी, 23 जून : महाराष्ट्राचं राजकारण सध्या गुवाहाटीतील हॉटेल रॅडिसनच्या अवतीभवती फिरत आहे. याच रॅडिसन हॉटेल बाहेर आज तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. हॉटेल बाहेर तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत हॉटेलमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र चोख पोलीस बंदोबस्त असल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे.

आसाममधील पूरस्थिती नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. एकीकडी ही परिस्थिती असताना आसामचे भाजप सरकार महाराष्ट्रातील आमदारांची बडदास्त ठेवत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे.

भाजपने शिवसेनेच्या आमदारांची सौदेबाजी करण्यासाठी त्यांना याठिकाणी आणून ठेवले आहे. आसामच्या अनेक भागांमध्ये सध्या पूरस्थितीमुळे लोक त्रासलेले आहेत. अनेकांचा यात मृत्यू झाला आहे. केंद्रातील भाजप सरकारने पूर पीडितांना एकाही पैशाचीही मदत केलेली नाही, अशी टीका तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली.

‘महाराष्ट्रहितासाठी निर्णय घेणं गरजेचं’, मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही एकनाथ शिंदे आक्रमक

सोमवारी शपथविधी होण्याची शक्यता

शिवसेनेचे बंडखोर आमदार सध्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. अजूनही शिवसेनेचे अनेक आमदार शिंदे गटात सामील होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांच्याकडे 40 शिवसेना आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र तयार आहे. शिंदे 40 हून आमदारांचा पाठिंबा जाहीर करतील त्यानंतर भाजप राज्यपालांना पत्र लिहून सरकार स्थापनेचा दावा करेल. यानंतर सोमवारी शपथविधी होण्याची शक्यता आहे, असं या नेत्याने सांगितलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहानानंतर बंडखोर आमदारांच्या सुरक्षेत मोठी वाढ; आसामाचे CM घेणार भेट

एकनाथ शिंदेना भाजपची ऑफर?

भाजपकडून शिंदे गटाला उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली आहे. याशिवाय 12 मंत्रिपदांची ऑफरही त्यांच्या गटाला आहे. त्यामुळे सध्या सहा मंत्रिपदं असलेल्या शिंदे गटाल एकूण मंत्रिमंडळाच्या 25 टक्के हिस्सा देण्याची ऑफर भाजपकडून असल्याचं बोललं जात आहे.

Published by:Pravin Wakchoure

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.





अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#बडखर #आमदर #थबललय #गवहटतल #हटल #रडसनबहर #तणमल #कगरसच #आदलन

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

टरबूजाच्या बिया विवाहित पुरुषांसाठी वरदान, जोडीदाराकडून होईल प्रेमाचा वर्षाव

मुंबई, 3 जुलै : लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Men's Health) नसेल तर वैवाहिक जीवन आनंदी (Happy Marital Life) होते. त्यामुळे लग्नानंतर शारीरिक कमजोरी (Physical...

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

स्टोक्सला मिळाल्या दोन लाईफलाईन, पण लॉर्ड ठाकूरने केलं काम तमाम! Video

एजबॅस्टन, 3 जुलै : भारत आणि इंग्लंड (India vs England 5th Test) यांच्यातल्या पाचव्या टेस्टच्या तिसऱ्या दिवशी बेन स्टोक्स (Ben Stokes) आणि जॉनी...

Todays Headline 4th July : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...

पाचव्या टेस्टवर टीम इंडियाची पकड, बॉलर्सच्या धमाक्यामुळे 132 रनची आघाडी

एजबॅस्टन, 3 जुलै : इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टेस्ट मॅचवर टीम इंडियाची (India vs England 5th Test) पकड आणखी मजबूत झाली आहे. मॅचच्या तिसऱ्या दिवशी...