Saturday, August 13, 2022
Home करमणूक 'फुलपाखरू' फेम हृताचं टीव्हीवर कमबॅक; या नव्या मालिकेत झळकणार

‘फुलपाखरू’ फेम हृताचं टीव्हीवर कमबॅक; या नव्या मालिकेत झळकणार


मुंबई, 4 ऑगस्ट- ‘फुलपाखरू’ (Phulpakharu) फेम अभिनेत्री हृता दुर्गुळे(Hruta Durgule) चाहत्यांमध्ये खुपचं लोकप्रिय आहे. तिच्या क्युटनेसने सर्वांचं वेड लावलं होतं. या मालिकेमुळे ती तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनली होती. मात्र काही महिन्यांपूर्वी ही मालिका बंद झाली होती. आणि म्हणूनचं तिचे चाहते खुपचं दुखी झाले होते. मात्र हृताच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे काही महिन्यांच्या विश्रांतीनंतर हृता पुन्हा एकदा टीव्हीवर परतली आहे. ती लवकरच ‘मन उडु उडु झालं’ (Man Udu Udu Jhal)या मालिकेत झळकणार आहे.

नुकताच झी मराठीवर एका नव्या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आहे. या मालिकेचं नाव आहे, ‘मन उडु उडु झालं’. ही मालिका एक रोमँटिक स्टोरी असणार आहे. यामध्ये अभिनेत्री म्हणून तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेली अभिनेत्री हृता दुर्गुळे झळकणार आहे. तर तिच्यासोबत अभिनेता म्हणून ‘विठूमाऊली’ फेम अभिनेता अथर्व राऊत असणार आहे. अथर्वने या मालिकेत विठ्ठल देवाची भूमिका साकारली होती. या दोघांची जोडी पहिल्यांदाचं पडद्यावर झळकणार आहे. त्यामुळे या फ्रेश जोडीसाठी चाहते खुपचं उत्सुक आहेत.

(हे वाचा:गुलाबी रंगाच्या साडीत तेजस्विनीचा जलवा; सिद्धार्थ जाधवच्या कमेंटने वेधलं लक्ष  )

या मालिकेचा प्रोमो खुपचं इंटरेस्टिंग दिसत आहे. प्रोमोमध्ये हृता अगदी सिंपल लुकमध्ये दिसून येतं आहे. प्रोमोमध्ये अथर्व आणि हृता रेल्वे स्टेशनवर एकमेकांसमोर येतात. हिरो म्हणजेच तेथे एकाला मारपीट करत असतो. मात्र हृताला पाहताच तो त्या व्यक्तीला चक्क सोडून देतो. आणि हिरोईनला पाहताक्षणीचं तिच्या प्रेमात पडतो, असा हा प्रोमो आहे. आत्ता मालिकेची नेमकी कथा काय असणार याबद्दल चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. सध्या झी मराठीवर नव्या मालिकांचं जणू पेवचं फुटलं आहे. अनेक नव्या मालिका आपल्या भेटीला येत आहेत.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#फलपखर #फम #हतच #टवहवर #कमबक #य #नवय #मलकत #झळकणर

RELATED ARTICLES

Maharashtra Breaking News : देश-विदेशसह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक,...

सावधान! या 3 पेयांमुळे तुमचा मेंदू लवकर होऊ शकतो वृद्ध, पाहा कोणती आहेत ती पेय

मुंबई, 13 ऑगस्ट : ज्याप्रमाणे त्वचा, केस आणि शरीराला योग्य पोषण, आहार मिळाला नाही, तर वृद्धत्वाचा परिणाम त्यांच्यावर लवकर दिसून येतो, त्याचप्रमाणे आपला...

प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला, प्रकृती नाजूक

न्यूयॉर्क : एका कार्यक्रमासाठी आलेल्या प्रसिद्ध लेखकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये लेखक गंभीर जखमी झाला. त्यांना हेलिकॉप्टरमधून तातडीने रुग्णालयात दाखल...

Most Popular

पुढील तीन दिवस कोकणसह, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात यलो अलर्ट, धरणांच्या पाणी साठ्यात वाढ

Maharashtra Rain : राज्यात अनेक ठिकाणी पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. यामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे....

संजय शिरसाटांकडून ‘कुटुंबप्रमुख’ म्हणत उद्धव ठाकरेंचा व्हीडिओ ट्वीट, काही वेळानं ट्वीट डिलिट…

Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षाच्या लढाईत औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray)...

राखीपौर्णिमेसाठी माहेरी आली होती तरुणी; पहिल्या प्रियकराने घेतली भेटली भेट अन्..

बरकत अली असे मृताचे नाव असून तो गंगापूर शहरातील मदिना मशिदीचा रहिवासी आहे. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...

पुण्यश्र्लोक महाराणी अहिल्याबाई होळकर यांची आज पुण्यतिथी; यानिमित्त जाणून घ्या त्यांचे जीवनचरित

Ahilyabai Holkar Death Aniversary : एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण आणि कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar)...

Laal Singh Chaddha : भारतीय लष्कराचा अपमान केल्याचा आरोप, अभिनेता आमिर खानविरोधात तक्रार दाखल

Laal Singh Chaddha : सुप्रीम कोर्टाचे वकील विनीत जिंदाल (Vinit Jindal) यांनी आमिर खानविरोधात (Aamir Khan) दिल्ली पोलिसांकडे...