मॉस्को: रशियानं यूक्रेनच्या नाटोतील सहभागाच्या भीतीनं २४ फेब्रुवारीपासून युद्धाला सुरुवात केली. आता नाटोचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. फिनलँडनं नाटोत सहभागी होणार असल्याचं जाहीर केलं आहे. यामुळं रशिया संतप्त झाला आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या वरिष्ठ सहकाऱ्यानं ब्रिटनवर अणवस्त्र हल्ला करण्याची धमकी दिली आहे. तर, फिनलँडचा बंदोबस्त करण्यास १० सेकंद लागतील, असा इशारा दिला आहे. ड्युमाच्या रक्षा समितीचे व्हाईस चेअरमन अलेक्सी जुरावलेव यांनी हा दावा केला आहे. दुसरीकडे रशियाचं सैन्य यूक्रेनविरुद्ध बॅकफूटवर असताना फिनलँड आणि स्वीडननं नाटोमध्ये सहभागाची इच्छा जाहीर केली आहे. पाक खासदाराचा न्यूड व्हिडिओ लीक; तिसऱ्या पत्नीवर केले गंभीर आरोप फिनलँडनं नाटोमध्ये सहभागी होणार असल्याची इच्छा जाहीर केल्यानंतर रशियानं वीज पुरवठा बंद केला आहे. फिनलँड रशियाकडून त्यांच्या एकूण विजेच्या गरजेपैकी १० टक्के वीज खरेदी करतो. जुरावलेव यांनी फिनलँड नाटोत सहभागी होऊन आमच्या देशाच्या सुरक्षेबद्दल आणि अस्तित्वाबद्दल प्रश्न निर्माण करत आहेत.जर अमेरिका आम्हाला धमकी देणार असेल तर आमच्याकडे त्यांच्यासाठी सरमत सतान २ मिसाईल आहे. तुम्ही रशियाच्या अस्तित्त्वाला मिटवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमची राख होईल, असा इशारा दिला आहे. संसदेत पक्षाचा 1 खासदार, 5 वेळा पंतप्रधान, रानिल विक्रमसिंघेंना श्रीलंकेत सहाव्यांदा पुन्हा संधी फिनलँड अमेरिकेसोबत असल्याचं म्हणत आहे. मात्र, आतापर्यंत देश म्हणून अस्तित्त्वात आहेत, यासाठी रशियाचं आभार मानले पाहिजेत. फिनलँडच्या सीमेवर अणवस्त्र तैनात करण्याची गरज नाही आम्ही सर्बियातून सरमत द्वारे हल्ला केला तर त्याची ब्रिटनपर्यंत मारा करण्याची क्षमता असल्याचं जुरावलेव म्हणाले.
फिनलँडला अमेरिका आणि ब्रिटन प्रोत्साहन देत असल्याचा आरोप जुरावलेव यांनी केला. फिनलँडच्या समीवेर आम्ही शस्त्र तैनात करणार नाही. मात्र, तिथं अशा प्रकारच्या मिसाईल असतील त्या १० सेकंदात फिनलँडपर्यंत पोहोचतील, असं जुरावलेव म्हणाले. फिनलँडला नाटोतील सहभागासाठी अमेरिका आणि ब्रिटन प्रोत्साहित करत असल्याचा आरोप जुरावलेव यांनी केला. दुसरीकडे रशिया आणि यूक्रेन युद्धात रशियन सैन्याची यूक्रेनच्या सैन्याकडून पिछेहाट झाली असल्याची माहिती आहे. रशियानं नाटोच्या मुद्यावरुन युद्धाला सुरुवात केली होती.
गुडघ्यावर बसून दंडवत, राजकारणाचे रंग दाखवणारी टीका; आदित्य ठाकरे बरसले
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
Iron Rich Food : लाल रंगांच्या फळांमध्ये आहे लोहाची कमतरता दूर करण्याची क्षमता
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि...
मुंबई, 26 मे: सध्या टेलिव्हजनवर अनेक आशयाच्या आणि नव्या विषयाच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. त्यातली सध्या एका मालिकेची चर्चा आहे ती म्हणजे...
मुंबई, 26 मे : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे विश्वासू सहकारी अशी ख्याती असलेले राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब (Anil...
मुंबई : उन्हाळ्यामध्ये म्हणा, किंवा साधं उन्हाच्या वेळांमध्ये फिरल्यामुळे म्हणा. त्वचा काळवंडते आणि मग नकळतच आपण या गोष्टीचाही ताण घेतो. शरीराचे जे भात...
एपी, पॅरिस : गतउपविजेत्या ग्रीसच्या स्टेफानोस त्सित्सिपासने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्या फेरीत निसटत्या विजयाची नोंद केली. तसेच गतविजेता नोव्हाक जोकोव्हिच आणि तिसऱ्या...