Sunday, January 16, 2022
Home लाईफस्टाईल फिट राहण्यासाठी Cycling करत आहात का? मग या महत्त्वाच्या गोष्टी माहीत असाव्यात

फिट राहण्यासाठी Cycling करत आहात का? मग या महत्त्वाच्या गोष्टी माहीत असाव्यात


नवी दिल्ली, 02 डिसेंबर: हिवाळ्यात फिटनेस (fitness) राखण्यासाठी सायकलिंग हा एक चांगला व्यायाम आहे. या ऋतूत शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी हलक्या व्यायामासोबत सायकल चालवणं खूप उपयुक्त आहे. हिवाळा (Winter Season) हा फक्त खाण्यापिण्याचा ऋतू नसून आपल्या आरोग्याची काळजी (Health Care) घेण्याचाही ऋतू आहे. हिवाळ्यात आरोग्य राखण्यासाठी काही जण वर्कआउट (Workout) करतात. तर, काही जण चालणं पसंत करतात. तथापि, मोठ्या संख्येनं लोक सायकलिंगही करतात. कडाक्याच्या थंडीत शरीरातून घाम गाळून शरीरात ऊर्जा भरून ठेवण्यासाठी सायकलिंग हा एक चांगला (Winter Cycling Tips) व्यायाम आहे.

जर तुम्हाला नियमित व्यायामाचा कंटाळा आला असेल आणि सायकल चालवायची असेल तर आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. सायकल चालवण्याआधी तुम्ही या टिप्स लक्षात ठेवल्या तर, त्या तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. यासोबतच सायकल चालवताना होणार्‍या कोणत्याही हानीपासून शरीराचं रक्षण करण्यात मदत होऊ शकते.

या टिप्स लक्षात ठेवा (Cycling in Winter Tips)

1. जर तुम्ही सायकल चालवायला सुरुवात करत असाल तर ती चांगल्या स्थितीत असणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्या आसन-स्थितीकडे (Seat) विशेष लक्ष द्या. आसन बदलण्याची गरज असल्यास ते बदलून घ्या. सायकल चालवताना, मध्येच सीटवरून उठून पुन्हा बसावे किंवा काही काळ उभं राहून सायकल चालवावी. यामुळं सायकलच्या सीटसोबत शरीराचं घर्षण झाल्यामुळं होणाऱ्या रॅशेसची (saddle sores) किंवा कटिप्रदेशातील हाडं दुखण्याची समस्या उद्भवणार नाही.

2. सायकल चालवताना शक्य तितकं सरळ बसण्याचा प्रयत्न करा. यासोबतच तुमचे खांदे आरामदायी स्थितीत ठेवा. जर तुम्ही दीर्घकाळ एकाच स्थितीत सायकल चालवत असाल तर, मान अवघडू शकते आणि मानेचं दुखणं सुरू होऊ शकतं.

3. आरोग्य सुधारण्यासाठी, जर तुम्ही सायकल चालवण्यास सुरुवात करत असाल, तर अशी सायकल निवडा ज्याचं हँडल अधिक सरळ स्थितीत असतील. गोल आकाराचे हँडल असल्यानं कंबर बराच वेळ वाकवावी लागते. यामुळे पाठीला दुखापत होण्याचा धोका वाढतो. काही दिवसांत पाठदुखीच्या तक्रारीही समोर येऊ शकतात.

हे वाचा – मीठामुळे अनेक वास्तू दोष होतात दूर; पण या चुका करणं पडू शकतं महागात, वाचा योग्य पद्धत

4. जर तुम्ही सायकल चालवायला सुरुवात करत असाल तर तुमच्या आरामाची काळजी नक्की घ्या. यासाठी सर्वात आधी पायात नीट बसणारे आणि आरामदायी शूज घाला. यामुळं तुम्हाला लांब पल्ल्याची सायकल चालवणं सोपं होईलच. शिवाय, तुमचे पायही सुरक्षित राहतील.

5. सायकल चालवण्याआधी, तुमच्या उंचीनुसार सीट योग्य उंचीवर बसवणं आवश्यक आहे. सीटची उंची खूप जास्त किंवा खूप कमी नसावी. तुमचे दोन्ही पाय जमिनीला योग्य प्रकारे स्पर्श करू शकतील अशा प्रकारे सीट लावून घ्या. असं केल्यानं तुम्ही गुडघ्याच्या दुखापतीपासूनही वाचू शकता.

हे वाचा – या 5 राशीचे लोक चुका करण्यात असतात एक्सपर्ट, मोठं नुकसान झाल्यावरच घेतात धडा

6. सायकल चालवल्यानं, पाय, पिंडऱ्या आणि मांड्या यांच्या स्नायूंवर सर्वाधिक भर पडतो. अशा परिस्थितीत, जर तुम्ही सुरुवातीला लांब अंतरासाठी सायकल चालवली असेल, तर तुम्ही तुमच्या पायाच्या स्नायूंना नक्की मालिश करा. सायकल चालवल्यानं स्नायूंवर अधिक ताण येतो. मालिश केल्यानं वेदना कमी होतात.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#फट #रहणयसठ #Cycling #करत #आहत #क #मग #य #महततवचय #गषट #महत #असवयत

RELATED ARTICLES

Carrot Benefits | हिवाळ्यात गाजर खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

 गाजर खाण्याचे (Carrot Benefits) अनेक फायदे आहेत.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...

सक्तीच्या लसीकरणाचा निषेध असो! ‘या ‘देशातील जनता उतरलीय रस्त्यावर; वाचा सविस्तर

देशात सर्वांसाठी लसीकरण सक्तीचं असेल, असा कायदा सरकारने केला आणि त्याला विरोध करण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित...

Wadha : आर्वीतील बहुचर्चित अवैध गर्भपात प्रकरणी डॉ. नीरज कदमला अटक

<p>राज्यभर गाजत असलेल्या वर्धामधील आर्वीतील बहुचर्चित अवैध गर्भपात प्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आलीय. याप्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. रेखा कदम यांचे पती नीरज...

Most Popular

‘रंजिश ही सही’….

‘‘ जेव्हा मी ही संहिता वाचली त्याचक्षणी माझ्या लक्षात आले की, माझ्यासाठी ही कथा समजायला फार अवघड नाही. || गायत्री हसबनीस ‘८३’ सिनेमाच्या...

Pune : पुण्यात MPSC करणाऱ्या तरुणाची आत्महत्या, नैराश्यातून टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती

By : abp majha web team | Updated : 16 Jan 2022 08:05 AM (IST) पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणाने विषप्राशन करुन आत्महत्या...

Lata Mangeshkar Health: गानसम्राज्ञी लता मंगेशकरांची प्रकृती स्थिर, आरोग्यमंत्री म्हणाले…

Lata Mangeshkar Health : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी...

Tsunami : टोंगामध्ये समुद्राखाली ज्वालामुखीचा उद्रेक; पश्चिम किनाऱ्यावर मोठ्या त्सुनामीची शक्यता

<p>पॅसिफिक समुद्रातील टोंगा या ठिकाणी झालेल्या ज्वालामुखीमुळे अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर मोठ्या त्सुनामीची शक्यता निर्माण झाली आहे. यूएस नॅशनल वेदर सर्व्हिसने या त्सुनामीचा इशारा...

‘ कलाकारांवर माझ्याविरोधात बोलण्याची…’ किरण मानेंचा निर्मात्यांवर गंभीर आरोप

मुंबई,16 जानेवारी-  गेल्या दोन दिवसांपासून अभिनेते किरण माने   (Kiran Mane)  प्रचंड चर्चेत आहेत. राजकीय भूमिका घेतल्याने आपल्याला 'मुलगी झाली हो'   (Mulgi Zali...

महिला कलाकारांसोबत गैरवर्तवणूक, समज देऊनही शिस्तभंग; अभिनेते किरण माने प्रकरणी स्टार प्रवाहचे स्पष्टीकरण

दरम्यान या संपूर्ण प्रकरणी स्टार प्रवाह वाहिनीने सविस्तर निवदेन दिले आहे. अभिनेते किरण माने हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. कोणतीही पूर्वसूचना...