Monday, July 4, 2022
Home मुख्य बातम्या फडणवीस-शिंदे यांचा शपथविधी ठरला, नवं मंत्रिमंडळही ठरलं, सूत्रांची माहिती

फडणवीस-शिंदे यांचा शपथविधी ठरला, नवं मंत्रिमंडळही ठरलं, सूत्रांची माहिती


मुंबई, 23 जून : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यापासून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. महाविकास आघाडी सरकार खरंच कोसळतं का हे येणाऱ्या काळात समोर येईलच. पण राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. विशेष म्हणजे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची पूर्ण शक्यता आहे आणि नव्या सरकारच्या शपथविधीचा कार्यक्रम ठरल्याची चर्चा सुरु आहे. नवं सरकार हे एकनाथ शिंदे आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होणार असल्याचा दावा केला जातोय. या नव्या सरकारचा शपथविधी सोहळा येत्या रविवारी किंवा सोमवारी आयोजित केला जावू शकतो. सर्वात आधी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे शपथ घेणार, अशी धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे.

एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यात नव्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नव्या मंत्रिमंडळासाठी शिंदे गटाने 10 नावं दिली आहेत. यामध्ये 5 कॅबिनेट तर 5 राज्यमंत्रीपदासाठी नावे दिली आहेत. तसेच 2 अतिरिक्त कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पदावर चर्चा सुरु आहे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गटातून कॅबिनेट मंत्रिमंडळासाठी एकनाथ शिंदे, दादा भुसे, दिपक केसरकर, संजय राठोड, तानाती सावंत, बच्चू कडू आणि आशिष जैस्वाल यांची नावे सूचवण्यात आली आहेत. तर राज्यमंत्रिपदासाठी अनिल बाबर, राजेंद्र यड्रावरकर, भरत गोगावले, सदा सरवणकर, चंद्रकांत पाटील यांची नावे देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहेत.

संबंधित माहिती ही सूत्रांनी दिलेली आहे. या माहितीबाबत अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. याशिवाय भाजपही अद्याप समोर आलेली नाही. पण त्याआधीच शिंदे यांच्या गोटातील सूत्रांनी मंत्रीमंडळ विस्ताराबाबत अनेक दावे केले आहेत. दुसरीकडे शिवसेनेकडून 12 आमदारांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. त्यावर शिंदे यांनी ट्विटरवर प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना परतण्याचं आवाहन करण्यात येत आहे. तसेच 24 आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात येतोय. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील सरकार स्थिर असल्याचं विधान केलं आहे. त्यामुळे आणखी जर वेळ झाला तर आमदारांवरची पकड सैल होऊ शकते, अशी शिंदे यांना भीती आहे. त्यामुळे जलद गतीने घडामोडी घडवण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

तुमच्या शहरातून (मुंबई)

  • अखेर एकनाथ शिंदेंचा पुढील प्लान ठरला; नव्या Video मुळे सत्तेच्या संभ्रमाला The End!

    अखेर एकनाथ शिंदेंचा पुढील प्लान ठरला; नव्या Video मुळे सत्तेच्या संभ्रमाला The End!

  • महाविकास आघाडी सरकारसाठी 24 तास महत्त्वाचे, शरद पवारांचा सूचक इशारा

    महाविकास आघाडी सरकारसाठी 24 तास महत्त्वाचे, शरद पवारांचा सूचक इशारा

  • 'शिवसेनेच्या बंडामागे भाजपचा हात दिसत नाही', अजित पवारांचं मोठं विधान

    ‘शिवसेनेच्या बंडामागे भाजपचा हात दिसत नाही’, अजित पवारांचं मोठं विधान

  • फडणवीस-शिंदे यांचा शपथविधी ठरला, नवं मंत्रिमंडळही ठरलं, सूत्रांची माहिती

    फडणवीस-शिंदे यांचा शपथविधी ठरला, नवं मंत्रिमंडळही ठरलं, सूत्रांची माहिती

  • छगन भुजबळांचं आणि समर्थकांचं काय झालं होतं विसरलात का? शरद पवारांनी बंडखोर आमदारांना केलं अलर्ट

    छगन भुजबळांचं आणि समर्थकांचं काय झालं होतं विसरलात का? शरद पवारांनी बंडखोर आमदारांना केलं अलर्ट

  • शिवसेनेला पुन्हा मोठा झटका, कृषीमंत्री दादा भुसे गुवाहाटीत दाखल, शिंदे गटाचा आकडा वाढला

    शिवसेनेला पुन्हा मोठा झटका, कृषीमंत्री दादा भुसे गुवाहाटीत दाखल, शिंदे गटाचा आकडा वाढला

  • 'कोणाला घाबरवताय? तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही', एकनाथ शिंदे यांचं नवं ट्विट

    ‘कोणाला घाबरवताय? तुमच्या धमक्यांना भीक घालत नाही’, एकनाथ शिंदे यांचं नवं ट्विट

  • एकनाथ शिंदेंच्या व्हिडीओनंतर शरद पवारांनी वाचली राष्ट्रीय पक्षांची यादी, भाजपाबद्दल म्हणाले...

    एकनाथ शिंदेंच्या व्हिडीओनंतर शरद पवारांनी वाचली राष्ट्रीय पक्षांची यादी, भाजपाबद्दल म्हणाले…

  • Maharashtra Coronavirus Update : राजकीय भूकंपात कोरोनाचा ब्लास्ट! 24 तासांत रुग्णांचा आकडा 5000 पार; मुंबईतच सर्वाधिक रुग्ण

    Maharashtra Coronavirus Update : राजकीय भूकंपात कोरोनाचा ब्लास्ट! 24 तासांत रुग्णांचा आकडा 5000 पार; मुंबईतच सर्वाधिक रुग्ण

  • शिवसेनाही अ‍ॅक्शन मोडमध्ये; एकनाथ शिंदेंना थेट प्रत्युत्तर, 12 आमदारांवर कारवाईची कुऱ्हाड

    शिवसेनाही अ‍ॅक्शन मोडमध्ये; एकनाथ शिंदेंना थेट प्रत्युत्तर, 12 आमदारांवर कारवाईची कुऱ्हाड

  • 'बंडखोर आमदारांना परिणाम भोगावे लागतील', शरद पवारांचा मोठा इशारा

    ‘बंडखोर आमदारांना परिणाम भोगावे लागतील’, शरद पवारांचा मोठा इशारा

Published by:Chetan Patil

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#फडणवसशद #यच #शपथवध #ठरल #नव #मतरमडळह #ठरल #सतरच #महत

RELATED ARTICLES

July Born Baby Names: तुमच्या बाळांना द्या ‘ही’ सर्वात हटके अन् गोंडस नावं

मुंबई, 4 जुलै: आपल्या बाळाचं नाव (Baby Names) हटके असावं, असं प्रत्येकाला वाटतं. त्याचं नाव सुंदर असावं, त्याचा अर्थही चांगला असावा आणि ते नाव प्रत्येकाला...

गुजरातसोबत महाराष्ट्रात निवडणुका होतील, संजय राऊतांचा दावा

मुंबई, 04 जुलै :  'आता ही तात्पुरती केलेली व्यवस्था आहे. ही कायम स्वरुपाची नाही. भाजपला शिवसेना फोडायची होती. त्यांनी फोडून दाखवली. फुटीर गटाला...

ताब्यात घ्यायला शिवसेना म्हणजे काय युक्रेन आहे का? संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut On Maharashtra Election :  शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर शिंदे गटाला थेट आव्हान दिलं आहे....

Most Popular

गुजरातसोबत महाराष्ट्रात निवडणुका होतील, संजय राऊतांचा दावा

मुंबई, 04 जुलै :  'आता ही तात्पुरती केलेली व्यवस्था आहे. ही कायम स्वरुपाची नाही. भाजपला शिवसेना फोडायची होती. त्यांनी फोडून दाखवली. फुटीर गटाला...

पकडलेला लश्करचा दहशतवादी निघाला भाजपचा सदस्य?, नेत्याने म्हटले…

काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणांनी दोन दहशतवाद्यांना अटक केलीय. आता या अटकेवरून राजकारण सुरू झालं आहे. एक दहशतवादी हा भाजपशी संबंधित असल्याचा आरोप केला जातोय....

ठाकरेंना पुन्हा एक धक्का! मध्यावधी निवडणुका लागणार, पवारांचं भाकित TOP बातम्या

मुंबई, 4 जुलै : राज्यात विधानभवनात पार पडलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे गटाचा वियज झाला आहे. यानंतर उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसला आहे....

Sri Lanka Fuel Crisis : श्रीलंकेमध्ये आजपासून सर्व शाळा आठवड्याभरासाठी बंद

Sri Lanka Fuel Crisis : श्रीलंकेमध्ये वीज टंचाईच्या पार्श्वभूमीवर आजपासून आठवडाभर सर्व शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. श्रीलंकेमधील...

शुगर कंट्रोलमध्ये राहील; Diabetesअसणाऱ्यांना दुधाविषयी या गोष्टी माहीत असाव्यात

नवी दिल्ली, 04 जुलै : दुधाला संतुलित आहार म्हणून ओळखले जाते. कारण त्यात सर्व पोषक घटक असतात. त्यामुळे लहानपणापासूनच दूध पिण्यावर भर दिला...

Todays Headline 4th July : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत...