पिका डिसऑर्डर हा शारीरिक दुर्बलतेसह एक मनोविकार आहे, ज्यामध्ये रुग्ण अनावश्यक गोष्टी खाऊ लागतात. ज्यामुळे शरीरात अनेक रोग आणि विष पसरू शकते. अशा गोष्टी खाल्ल्याने गंभीर आजार देखील होऊ शकतात. त्याचबरोबर अन्न नलिकेमध्ये वस्तू अडकणे, आतड्यांसंबंधी संसर्ग, बॅक्टेरिया, व्हायरस आणि विषबाधा होण्याची शक्यता असते. लोहाची कमतरता, अशक्तपणा असेही त्रास होऊ शकतात.
तुमचं शरीर सांगतं तुमच्या स्वभावाबद्दल; जाणून घ्या काय म्हणतं शास्र
सामान्य उपचाराने पिका बरा होतो आणि काहीवेळा हा त्रास आपोआपच कमी होतो. परंतु प्रत्येक वेळी असे होईलच असे नाही. ज्या लोकांची प्रतिकारशक्ती आधीच कमकुवत आहे. अशा लोकांमध्ये हा आजार बराच काळ टिकू शकतो.
पिका डिसऑर्डरमुळे होणारे खाण्याचे विकार
– पिका डिसऑर्डर अनेक कारणांमुळे होऊ शकतो. लोह (Iron Deficiency), जस्त (Zinc Deficiency)किंवा इतर पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे हा आजार होण्याची शक्यता असते.
– ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर (Obsessive Compulsive Disorder) आणि स्किझोफ्रेनियासारखे (Schizophrenia) मानसिक आजारही पिका डिसऑर्डरचे कारण असू शकतात. अशा परिस्थितीत रुग्णाला अखाद्य पदार्थ खाण्याची सवय लागते आणि त्याला अशा गोष्टींची चव विशेष आवडू लागते.
– अनेक तज्ञांच्या मते काही लोकांमध्ये पिका डिसऑर्डर उद्भवण्याचे कारण कुपोषण (Malnutrition) आणि डायटिंग (Dieting Side Effect) हेदेखील असू शकते. असे केल्याने रुग्णांना पोट भरलेले वाटते.
Skin And Hair Care : त्वचा आणि केसांचा तेलकटपणा घालवते तुरटी? वाचा आश्चर्यचकित करणारे फायदे
पिका डिसऑर्डरचे निदान
– तुम्हाला पिका डिसऑर्डरची लक्षणे (Symptoms Of PICA Disorder) दिसली तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. सुरुवातीच्या काळात हा आजार सहज बरा होऊ शकतो.
– पिका डिसॉर्डरची लक्षणे शरीरात दिसायला सुरुवात होताच तुम्ही तुमची रक्त तपासणी करून घ्यावी. जेणेकरुन शरीरात कशाची कमतरता आहे हे शोधता येईल.
– प्रोटीन, जीवनसत्त्वे यासारख्या सर्व आवश्यक घटकांचा आहारात समावेश करावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#फकत #वईट #सवय #समज #नक #मत #खड #अस #नक #त #खण #महणज #आह #एक #आजर