उन्मनी निंबाळकर ही उर्मिलाचा भाऊ आयपीएस वैभव निंबाळकर (IPS Vaibhav Nimbalkar) ह्यांची मुलगी आहे. उन्मनीला वेळ देऊ न शकल्यानं उर्मिलानं तिला खास सप्राइज दिलं. उन्मनीला मांजरी फार आवडतात त्यामुळे ती तिला घेऊन कॅट प्ले डेट स्वकायमध्ये घेऊन गेली आणि तिथं दोघींनी फार मज्जा केली. या दिवसाला उर्मिलानं ‘आत्या भाची दिवस’ असं नाव देत एक व्हिडिओ देखील शेअर केला. या व्हिडीओमध्ये उन्मनी मांजरींबरोबर धम्माल मस्ती करताना दिसतेय.
हेही वाचा – …आणि जळाले अभिनेत्रीच्या नाकातले केस! धम्माल VIDEO एकदा पाहाच
उर्मिला व्हिडीओ शेअर करत फार मोलची पोस्ट लिहिली आहे. तिनं म्हटलं, ‘माझ्या मते पैसे देणं एकवेळ सोपं आहे पण वेळ आणि कष्ट कठीण! आणि लहान मुलांना नेमकं तेच हवं असतं. तुमचं undivided attention with quality time. म्हणून तुम्हाला तुमच्या प्रेमाच्या नात्यांची वैयक्तिक दखल घ्यावी लागते. Mentor प्रल्हाद दादा पै म्हणतात, “दखल न घेणं हा दखलपात्र गुन्हा आहे”. मी आई झाल्यापासून माझं पहिलं लक्ष अथांग असल्याकारणाने, माझ्या गोंडस भाचीबरोबर मात्र मला quality time spend करतां येत नव्हता. उन्मनीला मांजरी भयंकर आवडतात. म्हणून शाळा सुरु होण्याआधी Cat play date Swakaya मध्ये बुक केली आणि आम्ही दोघींनी आत्त्या – भाची दिवस साजरा करुन लई मजा केली!
उर्मिलाच्या व्हिडीओनंतर चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. एका युझरनं म्हटलंय, ‘कसली भारी आत्या आहेस तू’, तर दुसऱ्या युझरनं म्हटलंय, ‘क्यूट उन्मनी तिची क्यूट आत्या आणि क्यूट मांजरी’. आत्या भाचीचं प्रेम पाहून दोघींवर सध्या प्रेमाचा वर्षाव होतोय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#फकत #कयट #आईच #नह #तर #लय #भर #आतयह #आह #उरमल #बघ #VIDEO