बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. ते दोघेही वेगवेगळ्या संस्कृतीचे असूनही ज्याप्रकारे त्यांच्या नात्याला सांभाळून घेतात त्याचे नेहमीच कौतुक केलं जातं. पण तरी सुद्धा त्यांच्या वयात १० वर्षांचा फरक आहे हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. यावर प्रियांकाची आई मधु चोप्रा यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य केलं आहे.
अलीकडेच ‘Hauterrfly’ मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत मधु यांना प्रियांका आणि निकमधील दोघांच्या वयातील अंतराबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या, “मला त्याची पर्वा नाही, प्रियांकाला खूश ठेवणारा माझा मुलगा आहे.” आजही प्रियांका आणि निकच्या वयातले अंतर पाहून ज्यांना आश्चर्य वाटते अशा लोकांना मधु यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
आणखी वाचा : ६ वर्षांपासून सोहेल- सीमाचा घटस्फोट न होण्याचा प्रयत्न करत होता सलमान खान, पण…
आणखी वाचा : Loksatta Exclusive : “…तर मग ती डीलीट नाही करायची”, प्राजक्ता माळीच्या राजकीय भूमिकेवर प्रसाद ओकने मांडलं परखड मत
प्रियांकाने २०१८ मध्ये निक जोनासशी लग्न केले. त्यांनी जयपूरमध्ये लग्न केले. तर त्याच वर्षी मे महिन्यात ते दोघे रिलेशनशिपमध्ये आले होते. प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी सरोगसीच्या मदतीने मुलीला जन्म दिला. प्रियांका आणि निकने त्यांच्या मुलीचं नाव मालती मेरी चोप्रा जोनस असं ठेवलं आहे.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#परयक #आण #नकमधय #असललय #वयचय #फरकवर #आई #मध #चपरन #कल #वकतवय #महणलय #Madhu #Chopra #Reveals #Age #Gap #Priyanka #Chopra #Nick #Jonas #Inspiration