Saturday, May 21, 2022
Home मुख्य बातम्या 'पोटदुखी, जळजळ होणाऱ्यांवर आजच्या सभेत योग्य उपचार केले जातील' : संजय राऊत

‘पोटदुखी, जळजळ होणाऱ्यांवर आजच्या सभेत योग्य उपचार केले जातील’ : संजय राऊत


Sanjay Raut On Today Shiv Sena Rally : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray Rally) यांच्या होणाऱ्या सभेआधी शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की,  आजची मुंबईतली सभा ही आतापर्यंत झालेल्या शंभर सभांचा बाप आहे.  मैदानात उतरण्याच्या निश्चयाने, जिद्दीने या सभेचे आयोजन केलं आहे.  महाराष्ट्राचा देशाचा राजकीय वातावरण आणि या वातावरणावरती आलेलं मळभ, दुःख, गढूळपणा हा आजच्या सभेने दूर होईल.  महाराष्ट्राचा आकाश निरभ्र होईल आणि या आकाशात भगवा धनुष्य दिसेल.  पोटदुखी, जळजळ असणाऱ्यांवर आजच्या सभेत योग्य उपचार केले जातील, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

त्यांनी म्हटलं की, आम्हाला गर्दी जमवावी लागत नाही, आम्हाला गर्दी आणावी लागत नाही. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळेल अशा प्रकारची ही सभा असणार आहे, असं ते म्हणाले. हे राज्य, हा पक्ष हा पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानेच आणि बाळासाहेब ठाकरेंच्या प्रेरणेने चाललेला आहे. काही लोक हे राज्य बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक प्रश्न निर्माण केलेत, काही अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही जी पोटदुखी आहे, ही जी काही लोकांची जळजळ आहे. त्यावर मला असं वाटतं आजच्या सभेने योग्य उपचार केले जातील, असं राऊत म्हणाले. 

केतकी चितळेच्या फेसबुक पोस्टबाबत संजय राऊत म्हणाले की, काही व्यक्ती या हिमालयाएवढ्या असतात. सूर्यावरती थुकलं की सूर्याचं महत्व कमी होत नाही. ही नशेबाज लोक आहेत. यांना एक वेगळ्या प्रकारची नशा घडवलेली आहे, दुर्लक्ष केलं पाहिजे. महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी असे शूद्र कीटक वावरत असतात. खिडकी उघडली की ते हवेबरोबर वाहून जातील, असं त्यांनी म्हटलं

राऊत पुढे म्हणाले की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे होतेच आणि राहणार आहेत.  हिंदू जननायक कोण महानायक कोण हे प्रश्न या देशात उपस्थित होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असं ते म्हणाले. 

काँग्रेसच्या नवसंकल्प सभेबाबत बोलताना त्यांनी म्हटलं की,  त्यांची भूमिका चांगली आहे, काँग्रेस पक्षाने हालचाल करून हळूहळू वर यायला पाहिजे. त्यामुळे देशाला परिवर्तनाची आशा आहे, असं राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं. 

इतर काही महत्वाच्या बातम्या

CM Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या BKCवरील आजच्या सभेची जय्यत तयारी; वाहतूक मार्गात मोठे बदल

‘औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचं स्वप्न मनसेच पूर्ण करणार’, बॅनरद्वारे मनसेचा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न

 अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#पटदख #जळजळ #हणऱयवर #आजचय #सभत #यगय #उपचर #कल #जतल #सजय #रऊत

RELATED ARTICLES

नवाब मलिकांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंची भागीदारी; किरीट सोमय्यांचा घणाघात

BJP Leader Kirit Somaiya On Nawab Malik : राष्ट्रवादी (NCP) नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे...

”भारतातील परिस्थिती चांगली नाही”,लंडनमध्ये जाऊन राहुल गांधींचा BJP वर हल्लाबोल

लंडन, 21 मे: काँग्रेस (Congress) पक्षाची सध्याची स्थिती फारशी चांगली नाही. गुजरातमध्ये तर विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकण्यास सुरुवात केली आहे....

आता Traffic पोलीस थांबवू शकणार नाहीत Car, चेकिंगही करणार नाही; काय आहे नवा आदेश

नवी दिल्ली, 21 मे : जर तुम्ही कार चालवत असाल, तर तुमच्यासाठी ही बातमी (Car Driving) महत्त्वाची आहे. सरकारने ट्रॅफिकबाबत नवे नियम लागू...

Most Popular

छातीत दुखण्याची ही आहेत 5 कारणं; वेळीच सावध व्हा !

Chest Pain Recognization : आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक कारणांमुळे शारीरिक समस्या उद्भवू लागतात. अचानक सांधे दुखू लागतात, मानेचा...

माणसांपेक्षाही संवेदनशील हत्ती, मृत्यूनंतरही एकटं सोडत नाही; रिसर्चमधून खुलासा

या हत्तींकडून माणसानं शिकायला हवं... जिवंतपणीच नाही तर मृत्यूनंतरही कशी साथ निभावायची अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

सोनाली कुलकर्णीचा हनिमून Video Viral; ड्रोन शॉट्समध्ये बिकनीत दिसली अभिनेत्री

मुंबई, 20 मे:  मराठी चित्रपटसृष्टीतली ‘अप्सरा’ म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) ही सध्या आपल्या पतीसोबत हनिमूनला गेली आहे. कुणाल बेनोडेकर (Kunal Benodekar)...

Congress : आधी चिंतन शिविर आता भारत जोडो आभियान, काँग्रेस कमबॅक करणार?

<p>Congress : आधी चिंतन शिविर आता भारत जोडो आभियान, काँग्रेस कमबॅक करणार?</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

पावसाचा कहर; वीज पडून 33 जणांचा मृत्यू, PM मोदींकडून शोक व्यक्त

पाटणा, 21 मे: बिहारमध्ये वादळी (storm) पावसाने (Heavy Rain) कहर केला. गुरुवारी बिहारमधील 16 जिल्ह्यांमध्ये वादळ आणि वीज (Thunderstorms and Lightning) पडून 33...