Sri Lanka Crisis : श्रीलंकेमधील (Sri Lanka) आर्थिक संकट दिवसेंदिवस आणखी बिकट होत चाललं आहे. इंधनाचा (Fuel Shortage) मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून श्रीलंकेतील स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. त्यातच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. श्रीलंकेच्या पश्चिम प्रांतातील पेट्रोल पंपावर पाच दिवस रांगेत उभे राहिल्यानंतर एका 63 वर्षीय ट्रक चालकाचा मृत्यू झालाय.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कर्जबाजारी श्रीलंकेत इंधन खरेदीसाठी दीर्घकाळ प्रतीक्षा केल्यामुळे गुरुवारी 10 वा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, अंगुरुवाटोटा येथील फिलिंग स्टेशनवर रांगेत उभे असताना चालक ट्रकमध्ये मृतावस्थेत आढळला.
डेली मिरर वृत्तपत्रानुसार, रांगेत आपला जीव गमावलेल्या लोकांची संख्या आता 10 वर गेली आहे. सर्व बळी 43 ते 84 वयोगटातील पुरुष आहेत. रांगेत उभ्या राहिलेल्या मृत्यूंपैकी बहुतेक मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाले आहेत.
एक आठवड्यापूर्वी कोलंबोमधील पनादुरा येथील पेट्रोल पंपावर अनेक तास रांगेत उभे असताना एका 53 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. रांगेत उभे असताना हृदयविकाराच्या झटक्याने या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पेट्रोल पंपाबाहेर लांबच लांब रांगा
श्रीलंकेमध्ये पेट्रोल आणि डिझेलची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. सरकारकडील परकीय चलनाचा साठा संपल्याने श्रीलंकेला इतर देशांकडून इंधनाचा साठा मागवण्यातही यश मिळत नाहीय. पुरेशा प्रमाणात इंधन उपलब्ध नसल्यामुळे श्रीलंकेतील लोकांना इंधन घेण्यासाठी पेट्रोल पंपांबाहेर लांबच लां रांगा लावाव्या लागत आहेत.
इंधनाच्या तुटवड्यामुळे एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून देशभरात 10 तास वीज कपात करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार इंधनाची ‘रेशनिंग’ यंत्रणा राबवण्याची शक्यता आहे.
श्रीलंकेतील परिस्थिती अत्यंत वाईट
श्रीलंका स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेला इंधनाचा तुटवडा, अन्नधान्याच्या वाढत्या किमती आणि औषधांचा तुटवडा आहे. इंधन आयातीसाठी सरकारी मालकीच्या बँक ऑफ सिलोनला क्रेडिट पत्र जारी करण्यात सरकारच्या अक्षमतेमुळे सध्याची कमतरता वाढली आहे.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]
#पटरल #पपवर #पच #दवसपसन #रग #रगतल #टरक #चलकच #मतय #आतपरयत #दह #जणच #मतय