Thursday, May 26, 2022
Home मुख्य बातम्या पूर्णवेळ पोलीस महासंचालक द्या, हायकोर्टात याचिका; संजय पांडेंना मुदतवाढ देण्यासही विरोध

पूर्णवेळ पोलीस महासंचालक द्या, हायकोर्टात याचिका; संजय पांडेंना मुदतवाढ देण्यासही विरोध


मुंबई : राज्याला पूर्णवेळ पोलीस महासंचालक (Maharashtra DGP) द्या या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) एक जनहित याचिका सादर करण्यात आली आहे. याचिकेत सध्या या पदाचा अतिरिक्त कार्यभार असलेल्या संजय पांडे यांना पदावरून हटवण्याचीही मागणीही करण्यात आली आहे. पांडे यांच्याकडे महासंचालक पदाचा तात्पुरता चार्ज असून त्याजागी योग्य प्रक्रिया राबवून कायमस्वरुपी पोलीस महासंचालकाची नियुक्ती करावी, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. 

संजय पांडे हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी असून एप्रिल 2021 पासून त्यांच्यावर राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त हंगामी कार्यभार सोपवण्यात आला होता जो आजवर कायम आहे. मात्र, आता पांडे यांना या पदावरून पदच्युत करण्यात यावे, अशी मागणी करणारी ही जनहित याचिका अॅड. दत्ता माने यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. 

राज्याच्या पोलीस महासंचालकाची नियुक्ती करण्याची एक प्रक्रिया असते. त्यानुसार, सध्या पांडे हे राज्याचे हंगामी पोलीस महासंचालक आहेत. त्यांना कायम ठेवण्यासाठीही एक प्रक्रिया असते. राज्यातील 10 वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे (युपीएससी) पाठवावी लागतात.

युपीएससीकडून त्यातील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे पोलीस महासंचालक पदासाठी शिफारस करतात. त्यातून पूर्णवेळ महासंचालकचाही नियुक्ती होते. ही प्रक्रिया राज्यातील पोलीस महासंचालक नेमण्यात बाबतही पूर्ण झालेली आहे. यासाठी युपीएससीकडून तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे पोलीस महासंचालक म्हणून सुचवली आहेत.

त्यात हेमंत नगराळे, के. वेंकटेशम, रजनिश सेठ या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही कायम स्वरुपी पोलीस महासंचालक नेमण्यात आलेला नसून संजय पांडे महासंचालक पदावर कायम आहेत. याशिवाय त्यांना राज्य सरकार जून 2022 पर्यंत मुदतवाढ देणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अतिरिक्त पदाचा कार्यभार असलेल्या पांडेंना तात्काळ पदावरून हटवून युपीएससीकडून शिफारस करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांपैकी एकाची पूर्णवेळ महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी या याचिकेतून केलेली आहे. या याचिकेवर येत्या आठवड्यात हायकोर्टात सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#परणवळ #पलस #महसचलक #दय #हयकरटत #यचक #सजय #पडन #मदतवढ #दणयसह #वरध

RELATED ARTICLES

बंद असलेल्या रिसॉर्टचे सांडपाणी समुद्रात जाते यावरुन ईडीची कारवाई: अनिल परब

मुंबई: दापोलीतील बंद असलेल्या रिसॉर्टमधून सांडपाणी हे समुद्रात जात असल्याचं कारण देत ईडीने आज आपल्यावर कारवाई केली, यामध्ये...

IPL : मॅचवेळी मैदानात घुसला प्रेक्षक, पोलिसांनी पकडताच विराटने दिली अशी रिएक्शन

मुंबई, 26 मे : आयपीएल 2022 च्या (IPL 2022) एलिमिनेटरचा सामना बुधवारी आरसीबी आणि लखनऊ सुपर जाएंट्स (RCB vs LSG) यांच्यात झाला, या...

शेंगदाणा की सूर्यफूल? कोणतं खाद्यतेल आहे शरीरासाठी सर्वात चांगलं आणि का?

मुंबई, 26 मे : भारतातील खाद्यसंस्कृती खूप भव्य आणि विस्तृत आहे. आपल्याकडे अतिशय वैविध्यपूर्ण पदार्थ बनवले जातात. प्रत्येक संस्कृतीतील लोकांच्या अन्नपदार्थ बनवण्याच्या पद्धती...

Most Popular

कोरोना रुग्णसंख्येत वाढ; मुंबईत पुन्हा निर्बंध? पालकमंत्र्यांनी केलं मोठं विधान

मुंबई, 26 मे : मुंबईत पुन्हा एकदा कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ (Coronavirus cases increasing in Mumbai) होताना दिसून येत आहे. दैनंदिन रुग्णसंख्या अशीच...

यूएईने केली ही एक घोषणा आणि संपूर्ण जगाचं वाढलं टेन्शन

यूएईने जगासमोर नवं आव्हान उभं केलं आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली...

Smart TV Offers: अशी संधी पुन्हा मिळणार नाही! १८ हजारांचा टीव्ही फक्त ५०० रुपयात, पाहा शानदार ऑफर

नवी दिल्ली : Discount on KODAK Smart TV: ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवर (Flipkart) सध्या इलेक्ट्रॉनिक्स सेल (Flipkart Electronics Sale) सुरू आहे. २४ मे पासून...

Sarsenapati Hambirrao: गोष्ट असामान्य शौर्याची.. पराक्रमाची… सरसेनापती हंबीरराव मोहिते ABP Majha

<p>&lsquo;महाराजांचं स्वराज्य अठरा पगड जातीजमातींनी मिळून उभं केलं.. हिंदवी स्वराज्यासाठी जो मरणासमोर हटून उभा राहिला तो मरहट्टा.. वीर मराठा..&rsquo; अशी गर्जना ऐकून आली...

26th May 2022 Important Events : 26 मे दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

26th May 2022 Important Events : मे महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला...

ना पोट वाढलं, ना कोणती लक्षणं दिसली; प्रेग्नेंट असल्याच्या गोष्टीपासून महिला अनभिज्ञ

महिलेला दुसऱ्या मुलाच्या जन्मापर्यंत तिच्या गर्भधारणेची अजिबात कल्पना नव्हती. अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...