Friday, August 12, 2022
Home लाईफस्टाईल पुरूषांपेक्षा महिलांना 'या'आजाराचा धोका सर्वाधिक, कर्करोगापेक्षा याची जोखीम दुप्पट, यामागची कारणं अतिशय...

पुरूषांपेक्षा महिलांना ‘या’आजाराचा धोका सर्वाधिक, कर्करोगापेक्षा याची जोखीम दुप्पट, यामागची कारणं अतिशय धक्कादायकमहिला आणि पुरूष हे लिंग विभिन्न असले तरीही निरोगी, सुदृढ आरोग्य दोघांसाठीही महत्वाचे आहे. अनेकदा कामाच्या ओढाताणान आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं जातं. मात्र याच गोष्टी नंतर जीवावर बेतू शकतील. पुरूषांपेक्षा महिलांमध्ये अल्झायरमचा धोका अधिक असल्याचं अभ्यासात म्हटलं आहे. याची जोखीम इतकी आहे की, महिलांना स्तनाच्या कर्करोगापेक्षा अल्झायमचा धोका अधिक आहे.

महिलांना अल्झायमर होण्यामागे वेगवेगळी कारणं आहेत. जी कारण संशोधनात समोर आली आहेत. पुरूषांमध्ये महिला अल्झायमरच्या शिकार सर्वाधिक होतात. पण या आजारावर काही प्रमाणात नियंत्रण आणू शकतो. यासाठी नेमकं काय करायला हवं हे देखील या संशोधनात आणि अभ्यासात मांडण्यात आलं आहे. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

​अल्झायमर म्हणजे काय?

अल्झायमर हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. ज्यामुळे मेंदूची स्मरणशक्ती आणि विचार करण्याची क्षमता हळूहळू कमी होते. याचा परिणाम अल्झायमर झालेल्या व्यक्तीवर इतका खोलवर होतो की, ती व्यक्ती आपली साधी काम देखील करू शकत नाही. बहुतेकदा साठीमध्ये या आजाराची लक्षणे दिसून येतात. वृद्ध प्रौढांमध्ये डिमेंशियाचे हे सर्वात सामान्य कारण देखील आहे.

या आजाराचे नाव डॉ. अलॉइस अल्झायमर यांच्या नावावरून ठेवण्यात आले. ज्यांनी असामान्य मानसिक आजाराने मरण पावलेल्या महिलेच्या मेंदूच्या ऊतींमधील बदल लक्षात घेतले. त्या महिलेला स्मृती कमी होणे, भाषेच्या समस्या आणि विभिन्न वागणूक यासरखी लक्षणे दिसू लागली. महिलेच्या मृत्यूनंतर डॉ. अल्झायमरने तिच्या मेंदूची तपासणी केली आणि त्यांना अनेक असामान्य गठ्ठे आणि तंतूंचे गोंधळलेले बंडल आढळले. ही चिन्हे आजही अल्झायमर या मेंदूच्या विकाराची काही मुख्य वैशिष्ट्ये मानली जातात.

(वाचा – Wrong Fruit Combination : सावधान, फळांसोबत ‘हे’ 5 पदार्थ खाल्ल्यास पोटात बनतं विष, चुकूनही एकत्र खाऊ नका, जीव येईल धोक्यात..!

​अल्झायमर आणि महिला

क्लीव्हलँड क्लिनिकमध्ये महिलांच्या अल्झायमर चळवळीवर सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये धक्कादायक खुलासा झाला. जवळपास सुमारे 82 टक्के महिलांना त्यांच्या अल्झायमर रोगाच्या वाढत्या जोखमीबद्दल माहिती नाही. सर्वेक्षण केलेल्या सुमारे तीन चतुर्थांश महिलांनी त्यांच्या मेंदूच्या आरोग्याविषयी त्यांच्या डॉक्टरांशी बोलले नाही किंवा त्यांचा सल्ला घेतला नाही. यामुळे महिलांमध्ये या आजाराबद्दल किती उदासिनता आहे हे लक्षात येते.

अल्झायमर असोसिएशनच्या मते, वयाच्या 65 व्या वर्षी एका महिलेला अल्झायमर होण्याचा अंदाजे आयुष्यभर जोखीम 5 पैकी 1 आहे. युनायटेड स्टेट्समध्ये, 65 आणि त्याहून अधिक वयाच्या 6 दशलक्ष लोकांमध्ये अल्झायमर आहे आणि त्यापैकी जवळपास 4 दशलक्ष महिला आहेत.

६० च्या दशकातील महिलांना त्यांच्या उर्वरित आयुष्यात अल्झायमर होण्याची शक्यता त्यांच्या स्तनाचा कर्करोग होण्याच्या जोखमीच्या तुलनेत दुप्पट असते, जे स्वतःच जास्त असते. अलीकडील अभ्यासात पुरुषांपेक्षा स्त्रियांना अल्झायमर रोग होण्याचा धोका जास्त का असतो हे शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

(वाचा – Cancer Symptoms: कॅन्सरची लागण झाल्यावर टॉयलेट दरम्यान दिसतात ही २ लक्षणं, ९० टक्के रुग्णांना असते ही समस्या, अजिबातच दुर्लक्ष करू नका

​संशोधन केलेल्या अभ्यासात काय म्हटलंय

पुरुषांपेक्षा जास्त स्त्रियांना अल्झायमर रोग का होतो यामागे अनेक कारण असू शकतात. यामध्ये संभाव्य जैविक आणि सामाजिक कारणे कारणीभूत आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो आणि बोस्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी (Researchers at the University of Chicago and Boston University School of Medicin) MGMT, O6-Methylguanine-DNA-methyltransferase नावाचे नवीन जनुक शोधून काढले आहे, जे स्त्रियांमध्ये वाढलेल्या जोखमीचे कारण असू शकते.

लिंडसे फॅरर, BUSM मधील बायोमेडिकल जेनेटिक्सचे प्रमुख आणि अभ्यासाचे वरिष्ठ लेखक म्हणाले, “अल्झायमरच्या अनुवांशिक जोखीम घटकांपैकी महत्वाची जोखीम महिलांसाठी घातक ठरली आहे. या संशोधनात स्वतंत्रपणे दोन भिन्न लोकसंख्येमध्ये भिन्न दृष्टिकोन वापरून शोधला गेला होता. त्यामुळे यामधील माहिती ही अतिशय महत्वाची आहे.

तसेच या संशोधनात आणखी एक महत्वाची माहिती मिळाली की, पुरूष आणि स्त्रीया यांच्या वस्तूस्थितीत तफावत आहे. स्त्रिया सरासरी पुरुषांपेक्षा जास्त काळ जगतात आणि अल्झायमर रोगासाठी अधिक वय हा एक मोठा धोका आहे.

(वाचा – National Doctors’ Day : डॉक्टरांच्या जीवनाची ‘ही’ 4 चक्रे माहित आहेत का? तुमच्या विचारांच्या पलीकडील जग..!)

​महिला अल्झायमरवर अशी करू शकतात मात

वय आणि लिंग हे जरी बदलता आलं नाही तरी अल्झायमर या आजाराची जोखीम कमी करू शकतो. योग्य निरोगी अशी जीवनशैली म्हणून व्यायाम आणि योग्य आहार याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. यापैकी एक म्हणजे आपल्या दैनंदिन दिनचर्येत शारीरिक व्यायाम समाविष्ट करणे. तुमच्या मेंदूतील रक्त आणि ऑक्सिजनचा प्रवाह वाढवून व्यायाम मेंदूच्या पेशींना मदत करू शकतो.

हृदयासाठी चांगले अन्न खाल्ल्याने मेंदूचे संरक्षण देखील होऊ शकते. यामध्ये साखर आणि सॅच्युरेटेड फॅट्सचे सेवन मर्यादित करणे समाविष्ट आहे. तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात भरपूर फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य खावे. यापैकी काही फायदेशीर पदार्थांमध्ये कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ, मासे, चिकन, सोयाबीनचे, बिया, नट आणि वनस्पती तेले यांचा समावेश होतो.

(वाचा – Face Blindness : ब्रॅड पिट आणि शहनाज ट्रेझरी ‘या’ आजाराने त्रस्त, भेटलेल्या लोकांचा विसरतात चेहरा, काय आहे हा असाध्य आजार?)

(इंग्रजीत हे आर्टिकल वाचण्यासाठी येथे क्लिक करा)अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#परषपकष #महलन #यआजरच #धक #सरवधक #करकरगपकष #यच #जखम #दपपट #यमगच #करण #अतशय #धककदयक

RELATED ARTICLES

आशिया खंडातील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर झळकलं दगडी चाळ 2 चं पोस्टर

मुंबई, 12 ऑगस्ट-   मराठी चित्रपटांची सध्या चांगलीच हवा दिसून येत आहे. नुकतंच 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चित्रपटाचं पोस्टर चक्क विमानावर झळकलं...

पालिकेच्या वॉर्ड पुनर्रचनेत बदल, शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार 

Shivsena : शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर मुंबई महानगर पालिकेच्या (mumbai municipal corporation) वॉर्ड पुनर्रचनेत बदल करण्यात...

जगातील सर्वात प्राचीन भाषा अशी ओळख असलेल्या संस्कृत दिनाचा इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर

World Sanskrit Day 2022 : हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण (Shravan 2022) महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिवस साजरा केला...

Most Popular

Kolhapur Rain : पंचगंगेची पाणी पातळी स्थिर असल्याने दिलासा, राधानगरी धरणाचा एक दरवाजा बंद 

<p style="text-align: justify;"><strong>Kolhapur Rain Update :</strong> गेल्या 48 तासांमध्ये कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाने उघडीप दिली आहे. गेल्या 24 तासांमध्ये पंचगंगेची पातळी स्थिर असल्याने...

सगळे रक्षाबंधन साजरा करत असताना हृतिकची Ex- Wife बॉयफ्रेन्डसोबत काय करत होती? Video Viral

सुझैनचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...

मायेची तिजोरी; लेकाचं यश जेव्हा आई फाटक्या साडीमध्ये गुंडाळून ठेवते….

आईने अंचितच्या आतापर्यंतच्या सर्व ट्रॉफी आणि मेडल्स फाटलेल्या साडीत बांधून ठेवल्या आहेत.  अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या...

देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या युवा दिनाचा इतिहास काय? जाणून घ्या महत्त्व

International Youth Day 2022 : आजची तरूण पिढी ही उद्याचं भविष्य आहे असं म्हटलं जातं. म्हणूनच राष्ट्राच्या उभारणीत...

पालिकेच्या वॉर्ड पुनर्रचनेत बदल, शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार 

Shivsena : शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर मुंबई महानगर पालिकेच्या (mumbai municipal corporation) वॉर्ड पुनर्रचनेत बदल करण्यात...

Pune : पुणे – मुंबई लोहमार्गावर दरड कोसळली, रेल्वे वाहतुकीवर कसा परिणाम?

<p>पुणे-मुंबई लोहमार्गावर दरड कोसळली आहे. मंकीहील ते ठाकूरवाडी दरम्यान ही घटना मध्यरात्री घडलेली असून, अद्याप दरड हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.&nbsp;<br />अप...