Friday, August 12, 2022
Home करमणूक पुरुषांच्या चुकीसाठी महिलांना किती काळ दोषी ठरवायचे? शिल्पा शेट्टीच्या समर्थनार्थ रिचा चढ्ढा

पुरुषांच्या चुकीसाठी महिलांना किती काळ दोषी ठरवायचे? शिल्पा शेट्टीच्या समर्थनार्थ रिचा चढ्ढा


अश्‍लील व्हिडिओ निर्मिती आणि प्रसारित करण्‍यासाठी उद्योजक राज कुंद्राच्‍या अटकेनंतर चित्रपटसृष्‍टीतून अनेक लोक त्‍याची पत्‍नी आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्‍या समर्थनात उतरले आहेत. चित्रपट निर्माते हंसल मेहता यांच्यानंतर अभिनेत्री रिचा चड्ढा हिनेही शिल्पा शेट्टीला पाठिंबा दिला आहे आणि ट्रोलर्सविरोधात ट्विट केले आहे.

रिचा चढ्ढाने हंसल मेहता यांचे एक ट्विट रीट्वीट करत लिहिलंय की, “आपण पुरुषांच्या चुकुसांसाठी त्यांच्या आयुष्यातील महिलांना दोष देणे हा राष्ट्रीय खेळ केला आहे. आनंद आहे की ती खटला दाखल करत आहे.”

न्याया मिळण्यापूर्वीच दोषी
त्याचवेळी, हंसल मेहता यांनी शिल्पाला पाठिंबा देणाऱ्या आपल्या ट्विटमध्ये लिहिले, “जर तुम्ही तिच्यासाठी उभे राहू शकत नसाल तर किमान शिल्पा शेट्टीला एकटे सोडा आणि न्यायालयाला ठरवू द्या? तिला थोडा आदर आणि प्रायव्हसी द्या. हे दुर्दैवी आहे की सार्वजनिक जीवनात लोकांना न्याय मिळण्यापूर्वीच दोषी ठरवले जाते.”

वाईट काळात कोणीही नाही
हंसल मेहता यांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये लिहिले, की “हे मौन एक नमुना आहे. चांगल्या काळात सर्वजण एकत्र पार्टी करतात. मात्र, वाईट काळात सर्वजण शांत असतात, दूर राहतात. अंतिम सत्य काहीही असो, नुकसान आधीच झाले आहे.”

प्रायव्हसीवर हल्ला
हंसल मेहता यांनी पुढे एका थ्रेडमध्ये लिहिले, की “ही निंदा एक नमुना आहे. जर आरोप एखाद्या फिल्मी व्यक्तीवर असेल तर प्रायव्हसीवर हल्ला करणे, व्यापक निर्णय देणे, चारित्र हनन करण्यासाठी न्यूज चॅनेल्सचा बकवास ही सर्व मौनाची किंमत आहे.”

राज कुंद्रा आता न्यायालयीन कोठडीत
राज कुंद्राला शुक्रवार, 27 जुलै रोजी आणखी 14 दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्याचे आयटी प्रमुख रायन थोर्पे हेही अटकेत आहेत. त्याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 19 जुलै रोजी अटक केली होती.

शिल्पाला न्यायालयाचा दिलासा नाही
मुंबई पोलिसांच्या रिपोर्टवर आधारीत बातम्या या मानहानीकरक कश्या असू शकतात?, असा सवाल शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयानं शिल्पा शेट्टीला विचारला. तुम्ही एक सेलिब्रिटी आहात लोकांना तुमच्याबद्दल वाचायला आवडतं, म्हणून त्यावर लिहिलं जात. तुमच्या घरातील गोष्टी जेव्हा इतरांशी संबंधित असतात आणि त्या बाहेरच्या जगासमोर घडतात तेव्हा तुम्ही त्यावर बोलायची बंधनं घालायची मागणी कशी करू शकता?, शिल्पा शेट्टीबाबत लिहायला काही चांगलं नाही, तर तिच्याबाबतीत काहीच लिहू नका, ही मागणी तुम्ही कशी करू शकता?, असा प्रश्नांचा भडीमार करत शिल्पाचा समाचार घेत याचिकेत केलेल्या मागणीनुसार आम्ही तुम्हाला कोणताही अंतरिम दिलासा देऊ शकत नाही असं न्यायमूर्ती गौतम पटेल यांनी स्पष्ट केलं. तसेच या याचिकेत प्रतिवादी करण्यात आलेल्या सर्वांना 18 ऑगस्टपर्यंत तर शिल्पा शेट्टीला 26 ऑगस्टपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश देत याचिकेची सुनावणी 20 सप्टेंबरपर्यंत तहकूब केली.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#परषचय #चकसठ #महलन #कत #कळ #दष #ठरवयच #शलप #शटटचय #समरथनरथ #रच #चढढ

RELATED ARTICLES

आशिया खंडातील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर झळकलं दगडी चाळ 2 चं पोस्टर

मुंबई, 12 ऑगस्ट-   मराठी चित्रपटांची सध्या चांगलीच हवा दिसून येत आहे. नुकतंच 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चित्रपटाचं पोस्टर चक्क विमानावर झळकलं...

सर्वसामान्य दाम्पत्याची ‘असामान्य’ कहाणी; दत्तक मुलीचा आज सर्वानाच अभिमान

गांधीनगर, 12 ऑगस्ट : अनेकजण विरोध झुगारुन असे काही निर्णय घेतात की कालांतराने ते समाजासाठी एक आदर्श उदाहरण बनतात. ही माणसं समाजात आपली...

कोयना धरणाचे 6 वक्री दरवाजे दीड फुटांनी उचलले, 10 हजार 100 क्युसेकने नदीत पाण्याचा विसर्ग 

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी 2 हजार 147 फुटांवर गेली असून एकूण पाणीसाठा 85.31 टीएमसी झाला आहे....

Most Popular

डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्स : श्रीशंकरला सहावा क्रमांक

मोनॅको : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेता लांब उडीपटू मुरली श्रीशंकरला पदार्पणीय डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्समध्ये सहावा क्रमांक मिळवत निराशा केली. ७.९४ मीटर ही...

बिहारमधील सत्तांतराचा NDA ला फटका? आज निवडणूक झाल्यास मिळणार इतक्या जागा

मुंबई 12 ऑगस्ट: महाराष्ट्र आणि त्यानंतर बिहारमध्ये झालेल्या सत्तानाट्यानंतर इंडिया टुडे आणि सी-व्होटर यांनी मुड ऑफ द नेशन या नावाने एक सर्व्हे केला...

Health Tips: डोळे अधिक सक्षम आणि दृष्टी वाढवण्यासाठी आहारात या 3 गोष्टींचा समावेश करा, चष्म्याचे नो टेन्शन !

Health Tips: डोळे हा आपल्या शरीराचा सर्वात संवेदनशील आणि महत्त्वाचा भाग आहे. आपण फक्त आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. पण आजच्या काम करण्याचा सवईमुळे आणि...

Food For Kidney: किडनी निकामी होण्यापासून टाळायचे असेल तर, या पदार्थांना द्या प्राधान्य

मुंबई : Best Kidney Cleanse Remedies: मूत्रपिंड (Kidney) हा आपल्या शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. तो फिल्टर म्हणून काम करतो आणि शरीरातील...

सुपर चषक फुटबॉल : रेयाल माद्रिदला जेतेपद; अलाबा, बेन्झिमाच्या गोलमुळे एनट्रॅक फ्रँकफर्टवर मात

एपी, हेलसिंकी : डेव्हिड अलाबा आणि कर्णधार करीम बेन्झिमा यांनी केलेल्या गोलच्या बळावर स्पॅनिश संघ रेयाल माद्रिदने जर्मन संघ एनट्रॅक फ्रँकफर्टवर २-० अशी...