Saturday, August 13, 2022
Home मुख्य बातम्या पुणे पालिकेचा दणका! प्लास्टिक बंदी विरोधात पहिल्याच दिवशी वसूल केला 70 हजार...

पुणे पालिकेचा दणका! प्लास्टिक बंदी विरोधात पहिल्याच दिवशी वसूल केला 70 हजार रुपयांचा दंड


Pune Pmc News: 1 जुलै 2022 पासून “सिंगल-युज प्लास्टिक” च्या वापरावर बंदी घालण्यासाठी राज्यांना विनंती करणाऱ्या केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनंतर पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) अ‍ॅक्शन मोडवर आली आहे. शुक्रवारी (1 जुलै) “सिंगल-युज प्लास्टिक”च्या वापरावर दंड आकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुणेकरांना या नियमांचं पालन करावंच लागणार आहे. उल्लंघन करणार्‍यांकडून पहिल्याच दिवशी एकूण सुमारे 70,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

महानगरपालिकेने किरकोळ विक्रेते, भोजनालये आणि  ग्राहकांसह सर्व सिंगल-युज प्लास्टिक वापरणाऱ्यां  शिक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे. सिंगल-युज प्लास्टिक वापर याआधीच बंद केला आहे असा दावा शहरातील व्यापारी आणि भोजनालयांनी केला आहे. लहान व्यावसायिक त्याचा वापर करत आहेत, असंही त्यांनी सांगितलं आहे. शुक्रवारी 391 किलो प्लास्टिक कचरा जमा करण्यात आला किमान 14 ठिकाणी कारवाई केल्याची माहिती आहे.

गेल्या महिन्याच्या शेवटपर्यंत आम्ही रहिवासी आणि व्यवसाय मालकांना सिंगल-युज प्लास्टिकवरील संपूर्ण बंदीबद्दल जागरुकता मोहीम राबवली. शहरातील पालखी मिरवणुकीदरम्यानसुद्धा ही मोहीम राबविण्यात आली होती. या नियमांचं पालन न कराणाऱ्यांवर कारवाई करुन त्यांच्याकडून दंड वसूल करणार आहोत, अशी माहिती 
पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाच्या प्रमुख आशा राऊत यांनी दिली आहे.

या सगळ्या प्रकाराची पुनरावृत्ती होताना दिसल्यास 5,000 रुपये, 10,000 रुपये आणि 25,000 रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल, त्यानंतर एफआयआर दाखल केला जाईल. आम्ही यावर चर्चा करण्यासाठी एक बैठक घेऊ आणि शुल्क कमी करू, असंही त्या म्हणाल्या.

आम्हाला प्लास्टिक व्यतिरिक्त पिशवी वापरण्याची सवय झाली आहे. आम्ही कागदी किंवा कापडाच्या पिशवीचा वापर करतो. त्यामुळे बंदीचा आमच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. लहान खाद्य विक्रेते वापरु शकतात. लहान विक्रेते पुण्यात मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्यावर याचा परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे पर्यावरणाला त्रास होतो असं कृत्य लहान व्यापाऱ्यांनी देखील करु नये, असं व्यापारी संघटनेचे अध्यक्ष फत्तेचंद रांका म्हणाले.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#पण #पलकच #दणक #पलसटक #बद #वरधत #पहलयच #दवश #वसल #कल #हजर #रपयच #दड

RELATED ARTICLES

देशपांडे सिस्टर्समध्ये कोण आहे चप्पलचोर; गौतमी मृण्मयीचा नवा व्हिडिओ VIRAL

मुंबई 12 ऑगस्ट: मराठीमध्ये सध्या दोन बहिणी धुमाकूळ घालत असतात त्या म्हणजे मृण्मयी आणि गौतमी देशपांडे. या दोघी गेले अनेक दिवस धमाकेदार व्हिडिओच्या...

13th August 2022 Important Events : 13 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

13th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. श्रावण...

माहेरी जाताना रस्त्यातच बहिणीचं अनोखं रक्षाबंधन, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

जयपूर, 12 ऑगस्ट : देशभरात राखीपौर्णिमेचा सण आनंदात साजरा करण्यात आला. रक्षाबंधनाच्या नंतरही आज शुक्रवारी 12 ऑगस्ट रोजीही बहिणी आपल्या भावाला राखी बांधत आहेत....

Most Popular

Paytm New Feature: तुमची ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार? कितीला पोहचणार? आता लगेच समजणार

मुंबई: अनेकदा प्रवाशांना रेल्वे (Railway) प्रवासापुर्वी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. ट्रेनची वाट पाहत असताना ती नेमकी कोणत्या प्लॅटफॉर्म येईल याची माहिती नसते....

Pune : पाण्याच्या वेगवान प्रवाहात खेळणं तरुणाच्या अंगाशी, मावळच्या कुंडमळामध्ये तरूण वाहून गेला

<p>Pune :&nbsp; &nbsp;पाण्याच्या वेगवान प्रवाहात खेळणं तरुणाच्या अंगाशी... मावळच्या कुंडमळामध्ये तरूण वाहून गेला..नदीतील पाण्याचा प्रवाह वाढल्याने तरुणाचं शोध कार्य थांबवलं. तरीही तरुणांकडून स्टंटबाजी...

Safety Tips: स्मार्टफोनमध्ये Apps डाउनलोड करताना घ्या काळजी, अन्यथा अकाउंट कधी रिकामे झाले कळणारही नाही

नवी दिल्ली: Smartphone Apps: आजकाल काही धोकादायक Apps मुळे स्मार्टफोन युजर्सची सुरक्षा धोक्यात आली आहे. म्हणूनच, iPhone किंवा Android Users ना अॅप्स डाउनलोड...

अल्टिमेट खो-खो लीग : खो-खोपटू विजय हजारेची संघर्षगाथा..

संदीप कदम मुंबई : पानपट्टीचा व्यवसाय करणाऱ्या इचलकरंजीच्या सामान्य कुटुंबातील विजय हजारे पहिल्या अल्टिमेट खो-खो लीगमध्ये मुंबई खिलाडीज संघाचे नेतृत्व करणार आहे. प्रतिकूल परिस्थितीत...