प्रार्थनाने (Prarthana Behere husband) अभिषेक जावकरसोबत 2017 मध्ये विवाह केला होता. त्यांचं हे लग्न बरंच चर्चेत सुद्धा आलं होतं. आज प्रार्थना आणि अभिषेकासाठी खास दिवस आहे. कारण पाच वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी प्रार्थना आणि अभिषेक यांची भेट झाली होती. यानिमित्ताने एक पोस्ट शेअर (Prarthana Behere romantic post for husband) करत प्रार्थनाने एक क्रेझी रील शेअर केलं आहे. सध्या इन्स्टाग्रामवर एक फिल्टर फेमस होत आहे ज्यात शरीर असं विचित्र आणि विनोदी पद्धतीने हलताना दिसतं. त्यावर बरेच रीलसुद्धा येत आहेत. याच रीलचा वापर करत प्रार्थनाने अभिषेकसोबतचा विडिओ शेअर केला आहे. त्याला कॅप्शन देत ती असं म्हणते, “ तू होगा जरा पागल तुने मुझको है चुना… पाच वर्ष झाली आपल्याला पहिल्यांदा भेटून आणि rest is history”. प्रार्थनाची ही जब वी मेट स्टोरी गाजताना दिसत आहे.
(Prarthana Behere fans) त्याहून जास्त लक्ष वेधून घेत आहे ती म्हणजे एका युजरने प्रार्थनाच्या पोस्टखाली केलेली कमेंट. एक युजर असं म्हणतो, “या जन्मात प्रार्थना अभिषेकची आहे, पण पुढच्या जन्मात फक्त माझीच होणार. तोच सेम लुक, तोच चेहरे, तेच बोलके आणि मोहक डोळे घेऊन ती माझ्या आयुष्यात येणार. लव्ह यु प्रार्थना” प्रार्थनाच्या या फॅनने कमेंट करून अनेक चाहत्यांच्या मनातली गोष्ट बोलून दाखवली आहे.
हे ही वाचा- Maharashtrachi Hasyajatra: हास्यजत्रेच्या टीमची धमाल ट्रिप; 5 जुलैला होणार नव्या सिझनचा श्रीगणेशा!
प्रार्थनाच्या लुकचे, तिच्या भावसौंदर्याचे, मोहक डोळ्यांचे हजारो चाहते आहेत. आणि प्रार्थना कायमच आपल्या चाहत्यांची आवडती राहिली आहे. तिने सुद्धा या कमेंटची दखल घेऊन चाहत्याला रिप्लाय केला आहे.
प्रार्थना सध्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेमध्ये एका चांगल्या रोलमध्ये दिसत आहे. या मालिकेने सध्या चांगला ट्रॅक पकडला आहे. येणारं वर्ष तरी ती छोटा पडदा एकदम दणाणून सोडणार यात काही शंका नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]
#पढचय #जनम #पररथन #फकत #मझच #नवऱयसठ #लहललय #खस #पसटवर #फनच #भलतच #पररथन