Saturday, August 20, 2022
Home भारत पीटी उषा, इलैयाराजांसह 4 दिग्गज राज्यसभेत, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

पीटी उषा, इलैयाराजांसह 4 दिग्गज राज्यसभेत, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा


नवी दिल्ली, 6 जुलै : भारताची महान ऍथलीट पीटी उषा (PT Usha) यांची राज्यसभा खासदार (Rajya Sabha Nominated) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पीटी उषा यांच्यासह फिल्म कंपोजर आणि संगीतकार इलैयाराजा, वीरेंद्र हेगडे आणि व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनाही राज्यसभेवर पाठवण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narenrda Modi) ट्वीट करून याबाबत माहिती दिली.
‘पीटी उषा यांना खेळातल्या त्यांच्या कामगिरीमुळे ओळखलं जातं, पण मागच्या काही वर्षांमध्ये नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचं त्यांचं काम कौतुकास्पद आहे. त्यांची राज्यसभेवर नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन,’ असं ट्वीट पीटी उषा यांनी केलं आहे.

‘इलैयाराजा यांनी पिढ्यान पिढ्या लोकांना मंत्रमुग्ध केलं. विनम्र पार्श्वभूमीतून आलेल्या इलैयाराजा यांनी खूप काही मिवलं आहे. त्यांची राज्यसभेवर नियुक्ती झाल्यामुळे मला आनंद झाला आहे,’ असं दुसरं ट्वीट पंतप्रधानांनी केलं.

‘वीरेंद्र हेगडे यांनी सामाजिक सेवेमध्ये उत्कृष्ट कार्य केलं आहे. धर्मस्थळ मंदिरामध्ये मला प्रार्थना करण्याची संधी मिळाली. तसंच त्यांनी आरोग्य, शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रात केलेली भरीव कामगिरीही मी बघितली. संसदेची कार्यवाहीदेखील ते समृद्ध करतील,’ असं पंतप्रधान म्हणाले.

याशिवाय मोदींनी विजयेंद्र प्रसाद गारू यांचंही कौतुक केलं आहे. विजयेंद्र प्रसाद हे अनेक दशकांपासून रचनात्मक जगात काम करत आहेत. त्यांच्या रचना भारताची गौरवशाली संस्कृती दाखवतात, ज्याने जागतिक स्तरावर ओळख निर्माण केली आहे. राज्यसभेत नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन, असं मोदी म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Original Source Link.]

#पट #उष #इलयरजसह #दगगज #रजयसभत #पतपरधन #मदन #दलय #शभचछ

RELATED ARTICLES

मुंबईत 111, तर ठाण्यात 37 गोविंदा जखमी; काल दिवसभरात 88 गोविंदांवर उपचार करुन डिस्चार्ज

Dahi Handi Festival 2022 : यंदा तब्बल दोन वर्षांनंतर राज्यसभारत दहीहंडी (Dahi Handi) उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात...

शंख मुद्रा केल्याने मुलांच्या आत्मविश्वासात होते वाढ, ही आहे योग्य पद्धत

शंख मुद्रा करायला खूप सोपी आहे आणि त्याचा नियमित सराव केल्याने मुलांची एकाग्रता वाढते आणि त्यांचे मन शांत राहते. ही मुद्रा सर्व वयोगटातील...

Most Popular

तुम्हालाही रुद्राक्ष धारण करायला आवडते? मग या गोष्टींची घ्या विशेष काळजी

<!-- --><!-- -->Do you also like to wear Rudraksh? Then take special care of these things mhpj - तुम्हालाही रुद्राक्ष धारण...

20th August 2022 Important Events : 20 ऑगस्ट दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

20th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. आणि ऑगस्ट महिन्यातील आजचा दिवस म्हणजेच 20...

धक्कादायक! तुम्ही खात असलेल्या खेकडे आणि माशांचीही होतेय Corona test

मुंबई : चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतेय. दरम्यान यामध्येच आता कोविडचा प्रसार समुद्रातून येणाऱ्या मासे आणि खेकड्यांमुळे होत असल्याचा संशय...

भुतियाचा भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज

नवी दिल्ली : भारताचा माजी फुटबॉल कर्णधार बायच्युंग भुतियाने सध्या चर्चेत असलेल्या अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) निवडणुकीत थेट अध्यक्षपदासाठी शुक्रवारी उमेदवारी अर्ज...

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज नऊ वर्ष, प्रकरणात आतापर्यंत काय झालं? वाचा सविस्तर…

Dr. Narendra Dabholkar Murder Case : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर (Dr. Narendra Dabholkar) यांच्या...

Star Pravahवर रंगणार धम्माल म्युझिकल शो; ‘ही’ मालिका होणार बंद

मुंबई, 19 ऑगस्ट : टेलिव्हिजन विश्वात सध्या स्टार प्रवाह ही वाहिनी प्रेक्षकांची लाडकी वाहिनी ठरली आहे. स्टार प्रवाहवर सुरू असलेल्या मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस...