Friday, August 12, 2022
Home लाईफस्टाईल पावसाळ्यात साखरेला ओलाव्यापासून वाचवण्यासाठी वापरा या टीप्स

पावसाळ्यात साखरेला ओलाव्यापासून वाचवण्यासाठी वापरा या टीप्स


मुंबई, 02 जुलै : पावसाळा (Rainy Season) खूप आनंद घेऊन येणारा ऋतू असतो. अनेकांना हवाहवासा वाटणारा हा पावसाळा काही गोष्टींमुळे त्रासदायक देखील ठरतो. पावसाळ्यात स्वयंपाकघरात ठेवलेले अनेक खाद्यपदार्थ ओलाव्यामुळे (Moisture In Monsoon) खराब होऊ लागतात. यात साखरेचाही समावेश असतो. पावसामुळे निर्माण होणाऱ्या आर्द्रतेमुळे साखर ओली आणि चिकट (Moisture In Sugar) होऊ लागते. पावसाळ्यात साखर ओली होणे अनेकांसाठी त्रासदायक ठरते. एवढंच नाही तर पावसाळ्यात साखरेमध्ये मुंग्या देखील होऊ लागतात.

त्यामुळे अशी साखर वापरता येत नाही आणि काही वेळा ती अधिक खराब (Sakharetil Ardrata) झाल्याने फेकून द्यावी लागू शकते. अशा स्थितीत पावसाळ्यातील या ओलाव्यापासून घरातील साखर (Protect Sugar From Moisture) कशी सुरक्षित ठेवावी याविषयी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगत आहोत. या टिप्स केवळ साखर ओली (Sakharetil Olava) होण्यापासून वाचवणार नाहीत तर मुंग्यांना साखरेपासून दूर ठेवण्यास देखील मदत करतील.

या टिप्स वापरून साखरेला ओलाव्यापासून ठेवा दूर 

साखरेसोबत ठेवा लवंग : पावसाळ्यात ओलाव्यापासून साखरेला वाचवण्यासाठी साखरेच्या डब्यात सात-आठ लवंगा ठेवा. त्यामुळे साखरेत ओलावा येणार नाही आणि साखरेला मुंग्या देखील होणार नाहीत. तुम्हाला जर लवंग साखरेत उघडी ठेवायची नसेल तर ती सुती कपड्यात बांधून साखरेत ठेवू शकता.

काय सांगता! लोकांना सकाळी झोपेतून उठवण्याच्या कामाचे महिन्याला मिळतात 26 लाख रूपये

साखरेसोबत ठेवा तांदूळ : साखरेतील ओलावा टाळण्यासाठी एका कापडात तांदूळ गुंडाळून साखरेच्या डब्यात ठेवा. हे साखरेला ओलाव्यापासून वाचवण्यासाठी मदत करेल. तसेच तुम्ही प्लॅस्टिकच्या डब्यातून साखर काचेच्या बरणीत हलवत असाल तर त्याआधी साखरेत थोडे तांदूळ टाका. हे तांदूळ साखरेमध्ये आधीपासून असलेला ओलावा शोषून घेतील. जेणेकरून साखर काचेच्या बरणीत हलवताना त्यासोबत ओलावा बरणीत जाणार नाही.

कितीही भांडलात तरी नातं कधीच तुटणार नाही; प्रत्येक कपलने फॉलो करावेत हे रूल्स

काचेच्या भांड्यात ठेवा साखर : बहुतेक लोक अनेक घरगुती वस्तू प्लास्टिकच्या डब्यात किंवा बॉक्समध्ये ठेवण्यास प्राधान्य देतात. परंतु पावसाळा येण्यापूर्वी प्लास्टिकच्या डब्यात ठेवलेली साखर काचेच्या बरणीत हलवणे अधिक योग्य ठरते. पावसाळ्याच्या दिवसात प्लास्टिकच्या डब्यात ओलावा येऊ शकतो. त्यामुळे साखर खराब होते. पावसाळ्यात साखर काचेच्या बरणीत ठेवल्यास त्यात मुंग्या येण्याची समस्याही दूर होईल.

Published by:Pooja Jagtap

First published:

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#पवसळयत #सखरल #ओलवयपसन #वचवणयसठ #वपर #य #टपस

RELATED ARTICLES

आशिया खंडातील दुसऱ्या सगळ्यात मोठ्या होर्डिंगवर झळकलं दगडी चाळ 2 चं पोस्टर

मुंबई, 12 ऑगस्ट-   मराठी चित्रपटांची सध्या चांगलीच हवा दिसून येत आहे. नुकतंच 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान चित्रपटाचं पोस्टर चक्क विमानावर झळकलं...

पालिकेच्या वॉर्ड पुनर्रचनेत बदल, शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार 

Shivsena : शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर मुंबई महानगर पालिकेच्या (mumbai municipal corporation) वॉर्ड पुनर्रचनेत बदल करण्यात...

जगातील सर्वात प्राचीन भाषा अशी ओळख असलेल्या संस्कृत दिनाचा इतिहास काय? जाणून घ्या सविस्तर

World Sanskrit Day 2022 : हिंदू दिनदर्शिकेनुसार श्रावण (Shravan 2022) महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी संस्कृत दिवस साजरा केला...

Most Popular

पुणे, कोल्हापूरसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात यलो अलर्ट

Maharashtra Rain : सध्या राज्यात जोरदार पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आले आहेत....

मुंबई इंडियन्सची मोर्चेबांधणी सुरु, पाहा कोणत्या पाच खेळाडूंशी केला करार?

केपटाऊन, 11 ऑगस्ट: आयपीएलमधली सर्वात लोकप्रिय फ्रँचायझी मुंबई इंडियन्सनं आता परदेशातल्या टी20 लीगमध्येही आपला संघ उतरवण्याचं ठरवलं आहे. संयुक्त अरब अमिरात (UAE) आणि...

Nokia मोबाईलची पुन्हा धमाकेदार एन्ट्री! एकदम तगडा 5G Smartphone, मोठा बॅटरी बॅकअप आणि जबरदस्त लूक

मुंबई : Nokia Smartphone : नोकिया बाजारात पुन्हा धमाका करण्याची तयारी करीत आहे. नोकिया नेक्स्ट सीरीजचा फोन आणत आहे. हा  5G Smartphone असणार...

2023 मध्ये बेबी पावडर उत्पादनावर बंदी आणणार, जॉनसन अँड जॉनसन कंपनीचा मोठा निर्णय, ‘हे’ आहे कारण

Johnson and Johnson Baby Talc : जॉनसन अँड जॉनसन (Johnson and Johnson) कंपनीने बेबी पावडर उत्पादन बंद करण्याचा मोठा...

वयाच्या 50 नंतरही राहाल निरोगी आणि फिट; आहार आणि व्यायामाच्या या टिप्स फॉलो करा

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : जेव्हा आपले वय 50 वर्षांपेक्षा जास्त असेल तर आरोग्याची काळजी घेणे खूप महत्त्वाचे असते. योग्य आहार न घेतल्याने...