Monday, July 4, 2022
Home लाईफस्टाईल पावसाळ्यात आजारी पडताच घेता अँटिबायोटिक्स, वेळीच व्हा सावध! ही सवय ठरू शकते...

पावसाळ्यात आजारी पडताच घेता अँटिबायोटिक्स, वेळीच व्हा सावध! ही सवय ठरू शकते घातक


मुंबई, 23 जून : हल्ली आपल्याला कोणताही शारीरिक त्रास जास्त वेळ सहन करण्याची सवय नाही. किंबहुना आता आपल्याकडे इतके सहज पर्याय उपलब्ध असतात की आपल्याला कोणत्याही शारीरिक त्रासापासून त्वरित सुटका मिळू शकते. याचे सरावात मोठे उदाहरण म्हणजे अँटिबायोटिक्स (Antibiotics) किंवा पेनकिलरचे (Painkiller) सेवन. हल्ली थोडासाही त्रास झाला कि आपण लगेच अँटिबायोटिक्स घेतो. पावसाळ्यात तर सर्दी खोकला (Monsoon Health Problems) हे खूप सामान्य होणारे आजार आहेत. या दिवसांमध्ये या आजारांसोबतच आपले अँटिबायोटिक्स घेण्याचे प्रमाणही (Antibiotics Over Dose) वाढते. मात्र असे केल्याने अनेक दुष्परिणाम देखील होऊ शकतात.

आज आम्ही तुम्हाला अँटिबायोटिक्सचा जास्त प्रमाणात वापर केल्यास काय दुष्परिणाम (Antibiotics Side Effects) होतात याबद्दल माहिती देणार आहोत. हेल्थ लाइननुसार, असे केल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आणि आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दिसू शकतात. विशेषत: लहान मुलांना जास्त अँटिबायोटिक्स देणे टाळा. मुलांची रोगप्रतिकारक शक्ती (Weak Immunity) आधीच कमकुवत असते आणि इतके अँटिबायोटिक्स सहन करण्याची त्यांची क्षमता नसते. प्रत्येक छोट्या मोठ्या त्रासावर अँटिबायोटिक्स घेतल्याने त्यामुळे नुकसानच जास्त होते.

अँटिबायोटिक्स अधिक प्रमाणात वापरण्याचे दुष्परिणाम
– पावसाळ्यात लहान मुलांना सर्दी होण्याचे प्रमाण वाढते. यावर उपाय म्हणून मुलांना वारंवार अँटिबायोटिक्सची औषधं दिली जात असतील. तर मुलांमध्ये अतिसाराचा (Diarrhea) धोका लक्षणीयरीत्या वाढतो आणि त्यांना अधिक तीव्र जुलाब देखील होऊ शकतो.
– पोटात चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रकारच्या बॅक्टेरियाचा समतोल राखणे गरजेचे आहे. अँटीबायोटिक्स जास्त प्रमाणात घेतल्यास ते पोटातील चांगले बॅक्टेरिया नष्ट करू लागतात. यामुळे पचनाशी संबंधित समस्या वाढू शकतात.

फक्त वाईट सवय समजू नका; माती, खडू असं नको ते खाणं म्हणजे आहे एक आजार

– जर अँटीबायोटिक्स वापरून अ‍ॅलर्जीक प्रतिक्रिया दिसून येत असतील तर त्या मोठ्या प्रमाणात न घेता अल्प प्रमाणात घ्याव्यात (Antibiotics Limited Dose) आणि डॉक्टरांना त्याऐवजी एखादा पर्याय विचारावा.
– शरीरात चांगल्या बॅक्टेरियाच्या कमतरतेमुळे, बुरशीजन्य संसर्गासारख्या (Fungal Infections) आजरांचा धोका देखील लक्षणीय वाढू शकतो. यीस्ट संसर्ग (Yeast Infection) देखील दिसू शकतो.

ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवेल या झाडाची साल; खाण्याची पद्धतही समजून घ्या

– पचनक्रिया मंदावणे, उलट्या, मळमळ, पोट फुगणे, भूक न लागणे किंवा पोटात जास्त दुखणे यांसारखी पचनाशी संबंधित लक्षणे दिसू शकतात.
– या सर्व समस्या टाळण्याचा एकमेव उपाय म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याने अँटिबायोटिक्स घेणे. स्वतः कोणतेही अँटिबायोटिक घेऊ नका.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित केलेली नाही. [Source Link.]

#पवसळयत #आजर #पडतच #घत #अटबयटकस #वळच #वह #सवध #ह #सवय #ठर #शकत #घतक

RELATED ARTICLES

4th July 2022 Important Events : 4 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

4th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

लातूरची सून टीना डाबीच्या अडीच महिन्याच्या संसारानंतर Ex नवऱ्याचीही लगीनघाई

नवी दिल्ली, 3 जुलै : Athar Amir khan Second marriage : आयएएस टीना डाबी (Tina Dabi) यांच्या दुसऱ्या लग्नाची जोरदार चर्चा होती. टीना डाबी...

तरुणीमुळे दोन मित्रांमध्ये पडली फूट; वाद इतका वाढला की, जिवलग मित्रावर झाडल्या..

यमुनानगर, 3 जुलै : मित्रांमध्ये भांडणाच्या घटना होत (Fighting in Friends) असतात. मात्र, तरीसुद्धा मैत्री ही काय राहते. मात्र, हरियाणा राज्यातील पंचकुला (Pandhkula...

Most Popular

Diabetes: मधुमेह का होतो? त्याचा शरीरावर कसा परिणाम होतो? जाणून घ्या

Diabetes: मधुमेह म्हटलं की सर्वांनाच घाम फुटतो. कारण मधुमेह अनेक आजारांना निमंत्रण देतो. तसेच उपचारादरम्यान मधुमेह असेल तर अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे...

Sunil Prabhu Vs Deepak Kesarkar : विधिमंडळ वर्चस्वासाठी शिवसेनेत ‘सामना’, दोन्ही बाजूंकडून दावा

<p>विधिमंडळ वर्चस्वासाठी शिवसेनेत 'सामना', दोन्ही बाजूंकडून परस्परांविरोधात दावा.&nbsp;</p> अस्वीकरण: ही कथा किंवा बातमी संगणक प्रोग्रामद्वारे स्वयं-एकत्रित केली जाते आणि आमच्या वेबसाइट/पोर्टलद्वारे तयार किंवा संपादित...

3rd July 2022 Important Events : 3 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

3rd July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व...

भारत-इंग्लंड कसोटी सामना : कर्णधार बुमराची अष्टपैलू चमक ; भारताच्या पहिल्या डावात ४१६ धावा; इंग्लंडची ५ बाद ८४ अशी अवस्था

बर्मिगहॅम : भारताचा नवनिर्वाचित कर्णधार जसप्रित बुमराने शनिवारी इंग्लंडविरुद्धच्या प्रलंबित पाचव्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसावर आपल्या अष्टपैलू खेळाची छाप पाडली. बुमराने फलंदाजीत विश्वविक्रमी...

सक्रिय राजकारणात येणार का? सचिन खेडेकर स्पष्ट बोलले…

मुंबई: 'कोण होणार करोडपती' हा शो सध्या चर्चेत आला आहे. यंदाही कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेते सचिन खेडेकर सांभाळत आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी...

Captain Miller Teaser : धनुषच्या ‘कॅप्टन मिलर’चा टीझर आऊट

Captain Miller Teaser Out : दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष (Dhanush) पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. धनुषच्या...